ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
२६ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बॉबी देओलच्या ‘या’ सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल येणार
26 वर्षांपूर्वी 1998 मध्ये ‘सोल्जर‘ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बॉबी देओल आणि प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत होते. बॉबीने विकी नावाची व्यक्तिरेखा साकारली, जो ड्रग माफियाकडून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतो. या भूमिकेत बॉबी खूप चांगला दिसला होता आणि प्रेक्षकांना त्याचा चित्रपट आवडला ही होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग बनणार आहे. ‘सोल्जर’चे दिग्दर्शन अब्बास-मस्तान यांनी केले होते. हा पहिला चित्रपट होता ज्यासाठी बॉबीने अब्बास-मस्तान या जोडीसोबत काम केले होते. तसेच रमेश तौरानी या चित्रपटाचे निर्माते होते. आणि तेच आता त्याच्या सिक्वेलबद्दल बोलले आहेत. आहे. नुकताच पश्मिना रोशन आणि जिब्रान खान अभिनीत ‘इश्क विश्क रिबाउंड‘ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. रमेश तौरानी या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाबाबत चर्चा करताना ते कोणत्या चित्रपटांचे सिक्वेल आणणार आहे यावर चर्चा झाली आणि त्यावेळी सोल्जर सिनेमाचे नाव पुढे आले.(Soldier Movie Sequel Update)
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत रमेश तौरानी म्हणाले की, सोल्जर 2 वर काम सुरू आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल असेही ते म्हणाले. याशिवाय ‘भूत पोलिस’च्या सिक्वेलवरही काम सुरू आहे. ते ‘रेस 4’ही बनवत आहे. त्याची स्क्रिप्ट तयार आहे. ‘सोल्जर’ हा 1998 मध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. रिपोर्टनुसार, हा चित्रपट 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता आणि त्याने जगभरात 37.79 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटात राखी गुलजार, फरीदा जलाल, जॉनी लीव्हर, सुरेश ओबेरॉय, दलीप ताहिल यांसारखे स्टार्सही पहायला मिळाले होते.
आता, ‘एनिमल’ सिनेमा रिलीज झाल्यानंतर बॉबी देओल चांगलाच लोकप्रिय झाला आहे. सध्या तो अनेक मोठ्या चित्रपटांचा भाग आहे. साऊथ सुपरस्टार सूर्याचा ‘कंगुवा‘, पवन कल्याणचा ‘हरी हरा वीरा मल्लू‘, राम चरणचा RC16 आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये तो आपल्याला दिसणार आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ‘स्टारडम‘ या डेब्यू सिरिजमध्ये ही तो दिसणार आहे.(Soldier Movie Sequel Update)
=============================
=============================
बॉबी देओलनेही काही दिवसांपूर्वी ‘सोल्जर-२’मध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण या सिनेमाला चांगल्या कथेची गरज आहे. एखादी चांगली कथा सापडली तर त्यावर काम केले जाईल. त्याचबरोबर आपला मुलगा या चित्रपटातून पदार्पण करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. अरमान देओल या चित्रपटातून पदार्पण करू शकतो, अशी चर्चा होती.