
Aamir Khan : बाझीची ३० वर्ष
रुपेरी पडद्यावर (वा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमात) अभिनेत्यांनी स्त्रीरुप धारण करुन गीत संगीत व नृत्य सादर करण्याची आपली एक परंपरा आहे. त्यात मनोरंजन आहे, तीदेखील एक अभिनव शैली. (त्याचे हंसे होवू नये अशी कसोटीही आहे.) मनमोहन देसाई दिग्दर्शित “किस्मत” मधील कजरा मोहब्बत वाला या गाण्यावर विश्वजीत स्री रुपात नाचला यापासून प्रकाश मेहरा दिग्दर्शित “लावारीस” मध्ये अमिताभ बच्चन मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है या गाण्यापर्यंत उदाहरणे अनेक.(Aamir Khan)
राजकमल कलामंदिर (युवा विभाग) निर्मित व सचिन पिळगावकर दिग्दर्शित “अशी ही बनवाबनवी” मधील सचिन पिळगांवकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांची स्त्री रुपे आजही सोशल मिडियात लाईक्स मिळताहेत. याच लोकप्रिय रुपात आमिर खानही. आणि त्यालाही तीस वर्ष पूर्ण होत आहेत. (Aamir Khan)

सलिम अख्तर निर्मित, आफताब पिक्चर्स बॅनरखालील आणि आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित “बाझी” या चित्रपटात हा फंडा पाह्यला मिळाला. मुंबईत हा चित्रपट १४ एप्रिल १९९५ रोजी प्रदर्शित झाला. त्याला जेमतेम यशावर समाधान मानावे लागले. या चित्रपटात आमिर खानने (Aamir Khan) ख्रिश्चन युवतीच्या माॅडर्न फॅशनेबल रुपात “डोले डोले” या गाण्यावर भन्नाट क्लब डान्स केला आहे. गाणे ऐकताना/ पाहताना कम सप्टेंबर या इंग्लिश गाण्याची चाल पटकन आठवेल. पार्श्वगायन कविता कृष्णमूर्तीचे असून संगीत अन्नू मलिकचे आहे. (Bollywood tadka)
आमिर खानच्या अनेक गोष्टींतील ही एक रंगतदार गोष्ट. काहीशीच जमलेली. आपला चित्रपट अधिकाधिक मनोरंजक करण्यासाठी आमिर खानने हेदेखील करुन दाखवले. हे गाणे पाहताना स्त्री रुपातील आमिर खान (Aamir Khan) रविना टंडनची आठवण देतो. हे गाणे आणि त्यातील आमिर खानचं रुपडं फारसे गाजले मात्र नाही. (Box office collection)
“बाझी“चे लेखन आशुतोष गोवारीकर, नीरज वोरा व नौशिक मेहता यांचे आहे. चित्रपटाचे संवाद संतोष सरोजचे आहेत तर संकलन जावेद सय्यद यांचे आहेत. छायाचित्रण तेजा यांचे आहे. आशुतोष गोवारीकर चित्रपटातून लहान मोठ्या भूमिका साकारत असतानाच “पहला नशा” या चित्रपटाव्दारे दिग्दर्शनात उतरला. त्याचे हे सकारात्मक पाऊल होते. या चित्रपटाचा यश प्राप्त झाले नाही तरी तो थांबला नाही. त्यानंतरचा त्याचा चित्रपट “बाझी” (नंतरच्या काळात अनेक चित्रपट. काही दर्जेदार तर काही फसलेले.) (Aamir Khan)

आमिर खानने (Aamir Khan) ॲक्शन हीरो साकारलाय. इन्स्पेक्टर अमर दामजी राठोड ही व्यक्तिरेखा त्याने साकारलीय. तोच ज्युली ब्रगेन्झा रुप घेतो. ममता कुलकर्णी पत्रकार संजना राॅय या भूमिकेत आहे. यांच्यात प्रेम आहे. परेश रावल मुख्यमंत्री चतुर्वेदी उर्फ चौबे या भूमिकेत आहे. यासह या चित्रपटात आशिष विद्यार्थी, मुकेश रिशी, अवतार गिल, मुश्ताक खान, हैदर अली, रझा मुराद, अपराजिता, सतीश शहा, असरानी, दयाशंकर पांडे, दिनेश आनंद, कुनिका असे बरेच कलाकार आहेत. सर्व प्रकारचा मनोरंजनाचा मसाला भरलेला असा हा “बाझी“. (Bollywood mix masala)
त्याची चर्चा दोन कारणास्तव झाली (त्यात तत्थ किती हे कधीच स्पष्ट झाले नाही. सिनेमाचे जग म्हणजे कशा ना कशाची कुजबुज होणारच) आमिर खान (Aamir Khan) ममता कुलकर्णी यांच्यात मैत्री वाढतेय असे फिल्मी किस्से होते. एकत्र काम करताना ते स्वाभाविक होतेच असं मानले जात नाही आणि दुसरी गाजलेली गोष्ट, आमिर या चित्रपटाच्या संकलनात विशेष रस घेतोय. (या वाक्याचा सूर असा की तो हस्तक्षेप करतोय. आपला चित्रपट चांगला होण्यासाठी तसे तो करत असेल तर त्यात वावगं ते काय?)

“बाझी“च्या निर्मितीतून एक चांगली गोष्ट घडली. आशुतोष गोवारीकर व आमिर खान (Aamir Khan) यांना एकमेकांचे स्वभाव, कामाची पद्धत, चित्रपट या माध्यम व व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन याची जाणीव होत होत गेली आणि मग त्यातूनच आमिर खानने आमिर खान प्राॅडक्सन्स या आपल्या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली आणि त्या निर्मिती संस्थेचा पहिला चित्रपट “लगान” (२००१) पडद्यावर आणला.
==========================================
हे देखील वाचा : Chupke Chupke : निखळ मनोरंजन, खुसखुशीत विनोदाचा आस्वाद
==========================================
या क्लासिक मनोरंजक चित्रपटाने ऑस्करच्या विदेशी चित्रपट विभागात नामांकन प्राप्त केले आणि तेव्हापासून आशुतोष गोवारीकर व आमिर खान (Aamir Khan) यांना जवळपास सर्वच स्तरावर सिरीयसली घेवू लागले… त्यांनी त्यात “बाजी” मारली. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला “बाझी” एकदा पाह्यला काहीच हरकत नाही. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित एक मसाला चित्रपट म्हणून एन्जाॅय करता येईल.