Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

Aamir Khan : ऑगस्टमध्ये ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’वर काम सुरु करणार; कास्टिंगबद्दलही आली अपडेट
आमिर खान आणि जिनिलिया देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेला सितारे जमीन पर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला… या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आमिरने त्याच्या आगामी महाभारत चित्रपटाबद्दल भाष्य केलं होतं…महाभारत हा आमिर खान याच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट असेल अशा चर्चा सुरु झाल्या होत्या… मात्र, आमिरनेच त्या चर्चांना पुर्णविराम दिला होता… आता आमिर खान यानेच महाभारत चित्रपटाबद्दल आणि कास्टिंगबद्दल महत्वाचं विधान केलं आहे…

आमिर खान याने नुकत्याचं एका मुलाखतीत ‘महाभारत’ चित्रपटावर ऑगस्टमध्ये काम सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. आमिरने बऱ्यावेळा महाभारत हा प्रोजेक्ट त्यांच्यासाठी फार खास असल्याचं म्हटलं आहे… त्याने या मुलाखतीत महाभारत हा केवळ काही तासांमध्ये मांडण्यासारखा विषय नसून यावर एक सीरीज लवकरच येणार आहे असं म्हटलं आहे… पुढे तो असं देखील म्हणाला की,’महाभारत’ची कथा माझ्या रक्तात आहे. कोणीही त्याबद्दल काहीही करू शकत नाही. मला ते सांगावेच लागेल. यामुळं मी यावर काम करत आहे.”
==================================
हे देखील वाचा: Dashavatar : दिलीप प्रभावळकर नव्या अवतारात; ‘दशावतार’ या थरारक सिनेमातून रंगणार कोकणच्या गाथा !
==================================
पुढे महाभारत चित्रपटापटातील कास्टिंगविषयी विचारले असता आमिर म्हणाला की,”मी या चित्रपटात कोणताही प्रसिद्ध चेहरा घेण्याचा विचार करत नाही. माझ्यासाठी सर्व पात्र स्टार आहेत. मला आता नवोदित चेहरे हवे आहेत.” त्यामुळे सितारे जमीन पर चित्रपटाप्रमाणेच महाभारत चित्रपटात नवखे कलाकार असणार यावर तुर्तास तरी शिक्का मोर्तब झाला आहे…त्यामुळे एकीकडे नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे आता लवकरच प्रेक्षकांना ‘महाभारत’ ही मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi