Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

संगीतकार ओ पी नय्यर आणि अभिनेता दिग्दर्शक Guru Dutt!

Bigg Boss Marathi 6: ‘मी तिच्या आयुष्यातून निघालो तरचं…’ घराबाहेर येताच

Bigg Boss Marathi 6: ‘हो, मला रुचिता आवडते’, अखेर विशालने

Yashraj Studio, टेक्नॉसॅव्ही आणि फोकस्ड

Rahul Deshpande : डोंबिवलीमध्ये रंगणार ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’!

बिग बॉसच्या घरातून Rakhi Sawant हिची हकालपट्टी की नवा ट्विस्ट?

Jai Somnath Teaser: ‘मंदिरे पाडता येतात, श्रद्धा नाही!’, Sanjay Leela

“त्याच्या ज्ञानावर ट्रोल करा…एकाला तरी जमेल का?”; पिळगांवकरांच्या ट्रोलर्सला Ashok

Apurva Nemlekar Wedding: अपूर्वा नेमळेकरचा जीवनसाथी तनुज गोवळकर नेमका आहे

अमिताभ बच्चनच्या ‘दोस्ताना’ सिनेमात Starughan Sinha ची एन्ट्री कशी झाली?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6: ‘मी तिच्या आयुष्यातून निघालो तरचं…’ घराबाहेर येताच आयुषने सांगितलं तन्वीसोबतच्या दुराव्याचं खरं कारण…

 Bigg Boss Marathi 6: ‘मी तिच्या आयुष्यातून निघालो तरचं…’ घराबाहेर येताच आयुषने सांगितलं तन्वीसोबतच्या दुराव्याचं खरं कारण…
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6: ‘मी तिच्या आयुष्यातून निघालो तरचं…’ घराबाहेर येताच आयुषने सांगितलं तन्वीसोबतच्या दुराव्याचं खरं कारण…

by Team KalakrutiMedia 17/02/2026

‘बिग बॉस मराठी ६’ (Bigg Boss Marathi 6) मधील अलीकडच्या ’वर झालेल्या एलिमिनेशनने घरातील समीकरणेच बदलून टाकली. आयुष संजीव (Aayush Sanjeev) आणि करण सोनवणे (Karan Sonawane) या दोघांचा प्रवास इथेच थांबला. घराबाहेर पडल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत आयुषने मात्र अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या विशेषतः तनवीसोबतच्या नात्याबाबत.घराच्या सुरुवातीच्या आठवड्यांत आयुष आणि तनवी यांची मैत्री प्रेक्षकांना ठळकपणे जाणवत होती. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत, चर्चा करत आणि गेमस्ट्रॅटेजी शेअर करताना दिसत होते. मात्र शेवटच्या काही दिवसांत त्यांच्या नात्यात स्पष्ट अंतर दिसू लागलं.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Update

याबाबत बोलताना आयुषने सांगितलं की, सुरुवातीला दोघांच्याही वेगवेगळ्या मित्रमंडळी होती. त्याचं स्वतःचं ग्रुपशी घट्ट नातं होतं आणि तो अनेकांमध्ये आपली ऊर्जा विभागत होता. पण तनवीचा ग्रुप तुटल्यानंतर तिच्यासाठी आयुषच मुख्य आधार बनला. इथूनच समीकरण बदलू लागलं. आयुषच्या मते, तनवीकडून येणारी भावनिक अपेक्षा वाढू लागली होती. पंचिंग बॅग टास्कदरम्यान त्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. त्याच्या म्हणण्यानुसार, तो ज्या पद्धतीने मैत्रीकडे पाहत होता, त्याच तीव्रतेने तनवी त्या नात्याकडे पाहत होती. ही असमानता पुढे गैरसमजांना कारणीभूत ठरू शकते, अशी त्याची भावना होती. म्हणूनच त्याने स्वतःहून एक पाऊल मागे घेतलं. त्याच्या शब्दांत, “कधी कधी दूर जाणं हेच समोरच्याच्या भल्यासाठी योग्य असतं.”

Bigg Boss Marathi 6 Update

Aashiqui 2चा संदर्भ देत आयुषने सांगितलं की, जसं त्या चित्रपटात नायक शेवटी नायिकेच्या भल्यासाठी तिच्या आयुष्यातून दूर होतो, तसाच निर्णय त्याने घेतला. त्याला वाटलं की तो बाजूला झाल्यावर तनवीला नव्या नात्यांची आणि ग्रुपची संधी मिळेल.आयुष घरातून बाहेर पडल्यावर तनवीचं राकेश आणि दिपालीसोबतचं बॉण्डिंग अधिक मजबूत झालं, हेही त्याने नमूद केलं. त्याच्या मते, त्याने घेतलेला निर्णय तिघांसाठी फायदेशीर ठरला. नात्यात अंतर आलं असलं तरी आयुषने तनवीच्या खेळाचं कौतुक केलं. ती एक सक्षम आणि हुशार स्पर्धक असल्याचं सांगत त्याने तिला टॉप ३मध्ये पाहतो, असं स्पष्ट केलं. (Bigg Boss Marathi 6)

============================

हे देखील वाचा: Bigg Boss Marathi 6: ‘हो, मला रुचिता आवडते’, अखेर विशालने दिली प्रेमाची कबुली, पण दिपालीच्या टोमण्याने रुचिता भडकली!

============================

घरातील नाती, रणनीती आणि भावनिक गुंतागुंत यामुळे ‘बिग बॉस मराठी ६’चा खेळ अधिकच रंगतदार होत आहे. आयुषच्या या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांना घरातील पडद्यामागची बाजू समजली असली, घराबाहेर आल्यानंतर तन्वी  यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aayush elimination Aayush emotional statement Aayush interview aayush sanjeev Aayush Tanvi rift BB Marathi latest episode BBM6 Drama bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi Eviction Bigg Boss Marathi News Celebrity Entertainment Entertainment News Marathi Marathi reality show updates Tanvi Tanvi friendship controversy
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.