Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Abhinay Berde : आई मुलाच्या नात्याची आजची गोष्ट सांगणाऱ्या ‘उत्तर’चा टीझर रिलीज!
नातेसंबंधांवर आधारित कथा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो यात शंकाच नाही… असंच एक अतुट नातं असतं आई आणि मुलाचा… अभिनय बेर्डे आणि रेणूका शहाणे यांच्या ‘उत्तर’ या आगामी चित्रपटातून आई-मुलाचं आजच्या पिढीतलं नातं प्रेक्षकांसमोर येणार आहे… विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने लेखक क्षितीज पटवर्धन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत… आई- मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणाऱ्या उत्तर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
उत्तर ‘ या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटातअभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत आहे तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. ऋता दुर्गुळे हीयात यात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात आपल्याच घरातील आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची आगळीवेगळी गोष्ट अनुभवता येणार आहे…

तंत्रज्ञानाच्या या युगात संवादाची साधने जरी वाढली असली तरी माणसांचा आपआपसांतील संवाद कमी होत चालल्याची चिंता आपण अनेकदा व्यक्त करतो. ‘उत्तर’च्या टिझरमध्येही अशाच प्रकारचा आई मुलामधला संवाद बघायला मिळतोय. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलासोबत आईचा फोनवरील खुमासदार संवाद यात ऐकायला मिळतो. ज्यात आईच्या काळजीच्या प्रश्नांना कंटाळलेला मुलगा फोन ठेवू का ? असं विचारतो त्यावर “इनकमिंगला पैसे पडल्यासारखा बोलतोस” अशी आईची प्रतिक्रिया पण दिसते. थोडक्यात, फास्ट फुड, फास्ट वाय फाय, सगळं काही इन्स्टंट, रेडिमेड हवं, असा विचार करणाऱ्या आजच्या पिढीला थोडा ठहराव देणाऱ्या आईची ही गोष्ट असावी , असा अंदाज आहे.
आजवर ‘डबलसीट’, ‘फास्टर फेणे’, ‘धुरळा’ सारख्या सुपरहिट चित्रपटांचं लेखन करणाऱ्या शिवाय हिंदीमध्येही ‘सिंघम २’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं आणि ‘ताली’सारख्या संवदेनशील वेबसिरीजचं लेखन करणाऱ्या क्षितिज पटवर्धन यांनी ‘उत्तर’ बद्दल बोलताना म्हटलं की, ” ‘आई’ हे सगळ्यात गृहीत धरलेलं, त्यामुळेच जवळचं असूनही दुर्लक्ष होणारं नातं आहे. तिचा फक्त ‘व्यक्ती’ म्हणून विचार करणारी आणि ‘आई आणि मूल’ या नात्याचा नव्याने विचार करायला लावणारी कलाकृती करायची, यातून ‘उत्तर’ हा सिनेमा जन्माला आला.”
================================
================================
झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर व जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या १२ डिसेंबर २०२५ रोजी झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi