Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Abhishek Bachchan ऐश्वर्या राय सोबतच्या घटस्फोटावर स्पष्टच बोलला; “तुम्ही माझं आयुष्य…”
बॉलिवूडमधल्या कलाकारांचं ब्रेकअप, पॅचअप किंवा घटस्फोट हे कायमच चर्चेतील विषय असतात… गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल बोललं जात होतं.. पण घरातल्या लग्नकार्यात दोघांनी एकत्र उपस्थिती दाखवत आणि कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्याने साडी नेसून भांगात कुंकू भरुन लोकांची तोंडंच बंद केली होती… आत्तापर्यंत ऐश्वर्या किंवा अभिषेक दोघांपैकी कुणीच घटस्फोटांच्या बातम्यांबद्दल प्रतिक्रिया देत नव्हते… मात्र, पहिल्यांदाच आता अभिषेक बच्चन याने एका मुलाखतीत याबद्दल वक्तव्य केलं आहे…(Abhishek Bachchan and Aishwerya Rai Divorce News)

अभिषेक बच्चनने ‘ई-टाइम्स’ दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटांच्या चर्चांवर तो कधीच काही का बोलला नाही, यावर स्पष्ट व्यक्त होत म्हटलं आहे की, “याआधी लोकं माझ्याबद्दल जे काही बोलायचे, त्याचा माझ्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. आज माझं कुटुंब आहे. त्यामुळे अशा अफवांचा त्रास होतो. जर मी काही स्पष्टीकरण दिलं, तर लोकं ते वेगळ्या पद्धतीनं इतरांना सांगतात. कारण- नकारात्मक बातम्या विकल्या जातात”.(Bollywood News)

पुढे अभिषेक म्हणाला, “तुम्ही माझं आयुष्य जगत नाही. ज्या लोकांना मी उत्तरदायी आहे, त्यांना तुम्ही उत्तरदायी नाही आहात. जी लोकं अशी नकारात्मकता पसरवतात, त्यांनी त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार वागलं पाहिजे. माझ्यावर याचा फारसा परिणाम होत नाही. पण, यामध्ये कुटुंबाला त्रास सहन करावा लागतो.”(Latest Entertainment News)

पुढे एका पोस्टचा उल्लेख करत अभिषेक म्हणाला, “एकदा मी एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर एकानं अश्लील कमेंट केली होती. ती कमेंट पाहिल्यानंतर माझा मित्र सिकंदर खेरला वाईट वाटलं. त्यानं त्याचा पत्ता दिला आणि कमेंट करणाऱ्याला सांगितलं की, हिंमत असेल, तर समोरासमोर येऊन हे बोलून दाखव. स्क्रीनवर एखाद्याबद्दल वाईट गोष्टी लिहिणं खूप सोईचं आहे. कारण- त्यामध्ये तुम्ही समोरच्याला दिसत नाही हे तुम्हाला माहीत असतं. तुम्ही एखाद्याला दुखावत आहात. जरी त्यांना हे सवयीचं झालं असलं तरी अशा पद्धतीच्या ट्रोलिंगचा त्यांच्यावर मानसिक परिणाम होतो. जर माझ्याबद्दल तुम्ही एखादी गोष्ट सोशल मीडियावर बोलणार, लिहिणार असाल, तर ते माझ्या तोंडावर येऊन बोला, असं मला वाटतं. पण, माझ्या तोंडावर येऊन बोलण्याची त्या व्यक्तीची हिंमत होणार नाही.”

================================
हे देखील वाचा: Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद
=================================
दरम्यान, सध्या अभिषेक बच्चन ‘कालिधर लापता’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे… तसेच ऐश्वर्या आणि अभिषेक (Aishwerya Rai) यांनी एकत्रित केलेल्या चित्रपटांबदद्ल बोलायचं झालं तर त्यांनी ‘गुरु’, ‘रावण’, ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘कुछ ना कहो’, ‘उमराव जान’, ‘धुम २’ चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.(Abhishek-Aishwerya Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi