‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

‘सेट सोडलास तर बघ…’ वडील ॲडमिट असतानाही अडवलं, शिवीगाळ; अभिनेत्याने प्रसिद्ध मालिका सोडल्याचे धक्कादायक कारण…
स्टार प्रवाहवरील ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता आदिश वैद्य अचानक बाहेर पडला होता. ही मालिका उत्तम सुरू असताना त्याने घेतलेला हा निर्णय अनेक प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा विषय ठरला आहे. मात्र, आदिशने या निर्णयामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीत बोलताना आदिश म्हणतो, “जर सेटवर कुणी आरडाओरडा करत असेल, शिवीगाळ करत असेल, किंवा मानसिक, शारीरिक पातळीवर त्रास देत असेल, तर अशा वेळी प्रश्न तुमच्या ‘सेल्फ रिस्पेक्ट’चा असतो. अशा परिस्थितीला मी ना एक अभिनेता म्हणून, ना एक माणूस म्हणून कधी सामोरा गेलो आहे. माझ्या करिअरमध्ये मला नेहमी चांगले लोक भेटले मग ते हिंदी असो किंवा मराठी इंडस्ट्री. तिथं सगळं काम परस्पर आदराने आणि प्रेमाने होतं. माझा स्वभावही तसाच आहे मी इतरांच्या सन्मानाची काळजी घेतो आणि स्वतःच्या सन्मानाचीही.”(Actor Adish Vaidya)

आदिश म्हणाला की , “की त्या काळात मी एकाच वेळी दोन शो करत होतो. त्यामुळे कधी त्या सेटवर, तर कधी या सेटवर अशी सतत धावपळ सुरू होती. मला जेव्हा या मालिकेसाठी घेतलं, तेव्हाच ठरलं होतं की दोन्ही कामं मॅनेज होतील. सकाळी सातपासून रात्री बारा वाजेपर्यंत मी सलग दोन्ही शोसाठी काम करत होतो. खरं सांगायचं तर हे काही सोपं नव्हतं. पण या सगळ्याचा ताण प्रोडक्शनमधल्या एका व्यक्तीने वैयक्तिक पातळीवर घेतला. आणि तिथूनच सगळं बिघडलं. त्याचा इगो क्लॅश झाला ‘मला नाही भेटणार तुझे डेट्स मॅनेज करायला’ अशा गोष्टी बोलल्या गेल्या. पण माझा मुद्दा साधा होता. तुम्ही मला ज्या अटींवर घेतलं, त्या मी प्रामाणिकपणे पाळत होतो. आदिशने सकाळ प्रीमियर ला दिलेल्या मुलाखतीत पुढे अस ही सांगितलं की, “काही लोकांना जबाबदारीचं ओझं पेलता येत नाही, आणि मग त्या ताणाचा राग इतरांवर काढतात. त्या व्यक्तीने मला सरळ सांगितलं, ‘मी सांगितल्याशिवाय सेट सोडून जायचं नाही. गेलास तर मग मी बघतो काय करायचं!’

तेव्हाच माझ्या आयुष्यात एक कठीण प्रसंग सुरू होता. माझे वडील लिलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते. परिस्थिती खूप अवघड होती. मला फक्त तीन तासांसाठी हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक होतं. म्हणून मी एक दिवस आधीच त्या व्यक्तीला सांगितलं होतं, ‘मी पहिला सीन करून घेतो, नंतर शिफ्ट वाढवली तरी चालेल, पण मला तीन तासांसाठी जावं लागेल.’ पण तिथेच त्या व्यक्तीला संधी मिळाली मला डावलायची. मुद्दाम त्रास द्यायचा हेतू होता. सीन चालू असताना तो थेट मध्येच शॉट थांबवून आरडाओरडा करू लागला. एवढंच नाही, तर फिजिकलीही खूप जवळ येऊन उभा राहिला, धमकावल्यासारखं. माझ्यासोबत असं पहिल्यांदाच घडलं होतं.,“अशा प्रकारचं वर्तन म्हणजे मर्यादा ओलांडणं आहे. इंडस्ट्रीत एखादा कलाकारावर शारीरिक पातळीवर धावून जाणं हे मी कधी कल्पनेतही पाहिलं नव्हतं. या सगळ्या प्रकरणाबाबत अजून माझं चॅनेलशी बोलणं झालेलं नाही, पण मला त्यांना सर्व स्पष्ट सांगायचं आहे.(Actor Adish Vaidya)
============================
हे देखील वाचा: Bigg Boss Kannada चे 5 कोटी खर्चून बांधलेलं घर सील; नेमकं असं झाल तरी काय?
============================
मी मालिका सोडण्यामागचं खरं कारण हेच आहे, त्या वेळी कोणीच माझ्यासाठी उभं राहिलं नाही. फक्त एवढं जरी कोणी म्हटलं असतं की, ‘हो, तो व्यक्ती चुकीचा वागला’, आणि पुढे असं पुन्हा होणार नाही याची खात्री दिली असती, तर मी थांबलो असतो. पण उलट मला शांत राहायला सांगितलं गेलं. अस ही तो म्हणाला. आदिश वैद्यच्या अभिनय प्रवासाकडे पाहिलं तर त्याने अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली खास छाप निर्माण केली आहे. ‘झिंगदी नॉट आईट’, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘सवी की सवारी’, ‘पुष्पा इम्पॉसिबल’, ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘बॅरिस्टर बहू’ या मालिकांमधील त्याचे काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. प्रत्येक भूमिकेतून त्याने अभिनयाची विविध रूपं दाखवत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.