Suraj Chavan : “माझ्याच विचारांमध्ये खोट असेल”; ‘झापूक झुपूक’बदद्ल केदार

Govinda वर चित्रित एका सॅड सॉंगच्या निर्मितीचा भन्नाट किस्सा!
नव्वदच्या दशकामध्ये अभिनेता गोविंदा याची प्रचंड मोठी चलती होती. कॉमिक सेन्स, अनोख्या डान्स स्टेप्स आणि गाणी यामुळे गोविंदा या दशकात प्रचंड लोकप्रिय ठरला होता. त्याच्यावर पिक्चराईज झालेली गाणी आज देखील खास आठवले जातात. ‘मै तो रस्ते से जा रहा था मै तो भेल पुरी खा रहा था’ , ‘अखियो से गोली मारे’, ‘मय से मीना से ना साकी से दिल बहल जाता है आपके आ जाने से’,’ हुस्न है सुहाना’, ‘सोना कितना सोना है…’ अशी अनेक गाणी आहेत जे ऐकता क्षणी आपल्यापुढे गोविंदाचा चेहरा येतो. संगीतकार कुणीही असो म्हणजे अन्नू मलिक असो, नदीम श्रवण असो, आनंद मिलिंद असो ..सर्व गोविंदा स्टाईलची असायची. या सर्व गाण्यांना गोविंदाने आपलाखास एक गोविंदा टच दिला आहे . (Govinda Movies)

गोविंदाची सगळी गाणी फील गुड ,मस्ती भरी आनंदाची आणि डान्स नंबर्स होती. गोविंदा वर चित्रीत सॅड सॉंग खूप कमी आहेत. आपल्याला चटकन आठवत देखील नाहित. पण जेव्हा असे सॅड सॉंग बनवायची वेळ आली तेव्हा संगीतकारांना खूप मोठा प्रश्न पडायचा. कारण गोविंदाच्या डोळ्यातच शरारत होती त्यामुळे या सॅड सॉंग मध्ये तो कसा अॅक्ट करेल असा प्रश्न सगळ्यांना असायचा. गोविंदावर चित्रित एक सॅड सॉंग बनवताना संगीतकाराला चक्क १९६१ साली प्रदर्शित झालेल्या ‘आर के फिल्म’च्या ‘जिस देश मे गंगा बहती है’ या चित्रपटाचा उपयोग झाला होता. तो कसा काय? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे. (Untold stories)

गोविंदाच्या एका सिनेमात मात्र अशी सिच्युएशन आली. सिनेमा होता मनोज अगरवाल यांचा ‘हद कर दी आपने’. १४ एप्रिल २००० रोजी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात गोविंदा सोबत राणी मुखर्जी होती. या सिनेमांमध्ये एका दर्द भरे गाण्याची सिच्युएशन होती. जेव्हा दिग्दर्शक मनोज अग्रवाल यांनी संगीतकार आनंदराज आनंद यांना या सिच्युएशनला एक सॅड सॉंग बनवायला सांगितले त्यावेळेला ते म्हणाले,” मला या धर्म संकटात टाकू नका कारण गोविंदावर सॅड सॉंग पब्लिक कसं एक्सेप्ट करेल?” त्यावर दिग्दर्शक म्हणाले,” गोविंदा ऍक्टर म्हणून खूप चांगला आहे आणि त्या व्यक्तिरेखेला जर सिनेमांमध्ये सॅड सॉंग गायचे असेल तर आपल्याला गाणे बनवावेच लागेल!” आनंदराज आनंद विचारात पडले आता जेव्हा दिग्दर्शक सांगतात तेव्हा गाणं बनवावेच लागणार होते. (Entertainment Tadaka)
===========
हे देखील वाचा – एका गॉगलमुळे बिग बींचा चित्रपट आला होता आयटीच्या रडारवर; काय होता हा किस्सा?
===========
एका मुलाखतीत आनंदराज आनंद यांनी सांगितले की,”त्या रात्री मी राज कपूरचा १९६१ सालचा ‘जिस देश मे गंगा बहती है’ हा चित्रपट पाहत होतो. हा सिनेमा पाहताना माझ्या लक्षात आलं की यात एक गाणं आहे ‘मेरा नाम राजू घराना अनाम..’ हे गाणं ऐकल्यानंतर माझ्या डोक्यात ट्यूब पेटली आणि म्हटलं की या चित्रपटातील जर आपण राजू हा शब्द घेऊन एखादं गाणं केल तर चालून जाईल.” गोविंदाचा चित्रपटातील अवतार हा राज कपूर प्रमाणेच भोळा भाबडा लागवी असायचा. आनंदराज आनंद यांनी लगेच त्यावर विचार करायला सुरुवात केली आणि त्यांच्या डोक्यात शब्द आले ‘ओय राजू प्यार ना करियो डरियो दिल टूट जाता है…’ दुसऱ्या दिवशी हे शब्द त्यांनी दिग्दर्शकाला ऐकवले. त्यांना देखील शब्द आवडले. (Latest Bollywood News)

आता कम्प्लीट गाणं लिहिण्यासाठी ते आनंद बक्षी यांच्याकडे गेले. आनंद बक्षी त्या काळातील एक मोठे गीतकार होते. त्यांना तर असं सांगू शकत नव्हते की गाण्याची पहिली ओळ तयार आहे. म्हणून त्यांनी सिच्युएशन सांगितली आणि त्याला एक सोल्युशन देखील सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने विचार केला. आनंद बक्षी यांनी पॉज घेऊन सांगितले,” मला तुमची पहिली ओळ आवडली. आपण हीच ओळ घेऊन गाणे बनवूया. त्या पद्धतीने आनंद बक्षी यांनी संपूर्ण गाणे तयार केले. आनंदराज आनंद खूष झाले त्यांनी स्वत: हे गाणे गायले. आता पिक्चारायाजेशनची वेळ आली तेव्हा गोविंदाने गाण्यातील भाव अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या अभिनयात आणले. (Entertainment)
================================
=================================
गोविंदावर चित्रित गाण्यांमध्ये सॅड सॉंगची संख्या अतिशय कमी आहे त्यात हे गाणं नक्कीच टॉपचे सॅड सॉंग असू शकते. आनंदराज आनंद यांनी गोविंदाच्या अनेक चित्रपटांना संगीत दिले होते. ‘परदेसी बाबू’, ‘जिस देश मी गंगा राहता है’, ‘हीरो नंबर १’, ‘जोडी नंबर १’, ‘हद कर दी आपने’… या काळात गोविंदाच्या सिनेमांना संगीत देणारे अनेक संगीतकार होते पण प्रत्येक जण गाणी देताना गोविंदाच्या इमेजला पूरक ठरतील अशीच गाणी दिली. आनंदराज आनंद यांनी सॅड सॉंग देताना मात्र एक वेगळा प्रयोग केला आणि त्यासाठी त्यांना उपयोगी पडला आर के फिल्मचा ‘जिस देश मे गंगा बहती है’.(Bollywood Untold stories)