‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
आणखी एक कियारापट
कोरोनाच्या भीतीचा विळखा चित्रपट सृष्टीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. आता काही प्रमाणात चित्रपटगृह खुली झाली असली तरी तिथे जाऊन नवीन चित्रपट पहाण्यापेक्षा प्रेक्षकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला अधिक पसंती दिली आहे. मात्र त्यातही काही निर्मात्यांनी मोठ्या पडद्यावरच चित्रपट प्रदर्शित करण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात सूरज पे मंगल भारी हा चित्रपट पहिला चित्रपट ठरला. या चित्रपटाला मिळालेले संमिश्र यश पहाता 11 डिसेंबरला आणखी एक चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे, तो म्हणजे इंदू की जवानी. सध्याच्या आघाडीच्या नायिकांमध्ये समावेश असलेल्या कियारा आडवाणीचा हा लक्ष्मी नंतरचा अजून एक महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. कियाराचा सध्या फॅनफऑलोअर मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मिडीयावरही ती चांगलीच ॲक्टीव्ह आहे. शिवाय इंदू की जवानी हा सबकुछ कियारा असाच चित्रपट आहे. त्यामुळे कियाराच्या लोकप्रियतेचा फायदा चित्रपटाला होईल अशी आशा निर्मात्यांना आहे.
बंगाली लेखक आणि चित्रपट निर्माते अबीर सेनगुप्ता दिग्दर्शित इंदू की जवानी हा बॉलिवूडमधला पहिलाच चित्रपट. पण कोरोनामुळे आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक महिने चित्रपट लटकला होता. अलिकडेच चित्रपटाचे अगदी मोजके राहिलेले चित्रिकरण पूर्ण करुन तो थेट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्याचे उद्दीष्ट निर्मात्यांनी ठेवलं आहे.
निखिल आडवाणी, निरंजन अयंगर, आणि रायन स्टीफेन चित्रपटाचे निर्माते आहेत. कियाराची यात प्रमुख भूमिका आहे. आदित्य सैल हा तिचा सहकलाकार म्हणून दिसणार आहे. सध्या कियारानं आपल्या सोशल अकाऊंटवरुन इंदू की जवानीचा ट्रेलर रिलीज केलाय. आणि त्याला तिच्या चाहत्यांचा चांगलांच प्रतिसाद मिळतोय. चित्रपट गाजियाबादमध्ये रहाणा-या इंदू गुप्ता या तरुणीभोवती फिरतो. सुंदर असलेली इंदू आपल्यासाठी योग्य जोडीदार शोधत असते. मात्र तिला अपयश मिळते. अशावेळी तिची मैत्रिण तिला एका डेटींग ॲपची माहिती सांगते. या ॲपमधून इंदू आपल्यासाठी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करते. ॲपच्या माध्यमातून तिच्यापर्यंत एक पाकिस्तानी तरुण पोहचतो. त्याचवेळी शहरात अतिरेकी आल्याची बातमीही येते. या सर्वांत जो घोळ होतो तो पडद्यावर पहाण्यासारखा आहे. चित्रपटात मल्लिका दुआ, मनिष चौधरी,राजेश जैस, अमित बिमरोट यांच्याही भूमिका आहेत.
हे हि वाचा : केवळ त्याच्या ४५ मिनिटांचा अभिनय आणि डायलॉगसाठी लोकं दामिनी हा सिनेमा आजही पूर्ण बघतात.
इंदू की जवानीमधील हसीना पागल दिवानी या गाण्यानं आधीच टॉपटेन गाण्यांच्या यादीत आपला नंबर लावला आहे. त्यात कियारा अतिशय सुंदर दिसतेय. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तिचा अभिनय कसा आहे, हे पहाता येईल. अक्षय कुमारच्या लक्ष्मी नंतर कियारा आडवाणीचं नाव अधिक चर्चेत आलं आहे. कियाराकडे सध्या मोठ्या बॅनरचे चांगले चित्रपट आहेत. जुग जुग जियो चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. तर शेरशहा आणि भूल भुलैया 2 या तिच्या चित्रपटांचे चित्रिकरण सुरु आहे.
सौजन्य : युट्युब