Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

Lalit Prabhakar : ‘प्रेमाची गोष्ट २’ मधून पुन्हा रंगणार ‘ओल्या सांजवेळी’ची जादू!
दिग्दर्शक सतीश राजवाडे यांचा ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला होता. या चित्रपटातील ‘ओल्या साजं वेळी’ हे गाणं अत्यंत लोकप्रिय झालं. संगीतप्रेमींच्या ओठांवर गुणगुणलं जाणारं हे गाणं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत ताजं आहे. आता ‘प्रेमाची गोष्ट २’ या बहुप्रतीक्षित सिक्वेलमधून हेच गाणं एका नव्या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटात ललित प्रभाकर आणि रुचा वैद्य यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रेमाची गोष्ट १ मधील लोकप्रिय गाणं ‘ओल्या साजंवेळी’ पुन्हा एकदा चित्रपटात दिसणार आहे.
दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात, ” ‘ओल्या साजंवेळी’ या गाण्यावर अविनाश–विश्वजीत यांनी अप्रतिम काम केले आहे. ‘प्रेमाची गोष्ट २’ ही कथा नवी, तरुणाईला साजेशी आणि ताजेपणाने भरलेली असल्यामुळे त्यांनी गाण्याला दिलेला नवा अंदाज त्याला अधिक उठावदार बनवतो. प्रेक्षकांना पुन्हा एकदा या गाण्यातून प्रेमाची गोड अनुभूती मिळेल, याची मला पूर्ण खात्री आहे.”
================================
हे देखील वाचा : Dilip Prabhavalkar : ‘कांतारा’ चित्रपटाची Vibe देणारा ‘दशावतार’!
================================
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात भाऊ कदम, स्वप्नील जोशी, ललित प्रभाकर, ऋचा वैद्य व रिधिमा पंडित हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या २२ ऑक्टोबर रोजी अनुभवायला मिळेल.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi