
बिग बॉसचा विजेता Suraj Chavan च्या लग्नानंतर ‘छोटा पुढारी’ ही चढणार बोहल्यावर; व्हिडिओमुळे चर्चेला उधाण
Bigg Boss मराठी सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) याचं दणक्यात लग्न झाल्यानंतर, आता त्याच सीझनमधील आणखी एक प्रसिद्ध स्पर्धक म्हणजेच घनश्याम दरोडे (Ghanshyam Darode) , ज्याला ‘छोटा पुढारी’ म्हणून ही ओळखले जाते, त्याचा लग्नाच्या तयारीला लागल्याची माहिती समोर येत आहे. घनश्यामने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे त्याच्या चाहत्यांमधे लग्नाच्या तयारीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.(Ghanshyam Darvade wedding)

हा व्हिडीओ हळदीच्या विधीचा आहे, ज्यात घनश्याम पारंपरिक पद्धतीने एका पाटावर बसलेला दिसतो आहे आणि त्याची आई त्याला प्रेमाने हळद लावत आहे. व्हिडीओमध्ये दिलेल्या कॅप्शनमध्ये घनश्यामने लिहिल आहे की, “नवरदेव झालो ना राव… हळद लागली एकदाची… माझं पण ठरलं बरं का… यायला लागतंय!” यावरून असं लक्षात येतं की घनश्यामला आपल्या जीवनाच्या नवा टप्प्याची सुरुवात करण्याची तयारी सुरू झाली आहे.

व्हिडीओच्या शेवटी, घनश्याम शेरवानी आणि बुट घेण्यासाठी दुकानात फिरताना ही दिसत आहे , ज्यामुळे खरच त्याच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला तुफान प्रतिसाद मिळाला असून, अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स ही केल्या आहेत. एक युजरने लिहिल आहे , “किती फूटाची आहे नवरी?” तर दुसऱ्याने मस्करीत लिहिल करत, “बाळ आता मंडपात येणार!” अशी कमेंट केली आहे. काही युजर्सने तर कायद्याचे पालन करण्याची सूचनाही दिल्या आहेत , “अरे घनश्या, बालविवाह करू नकोस रे!” अशी ही एकाने कमेंट इशारा दिला आहे. (Ghanshyam Darvade wedding)
===============================
हे देखील वाचा: ‘प्रश्न मला नाही, सूरजला विचारा’, Suraj Chavanवर DP दादाचा संताप, व्हिडिओ पोस्ट करत सांगितले कारण…
===============================
घनश्यामने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याच्या नव्या जीवनाची सुरुवात अतिशय उत्साही होत आहे अंदाज दिला आहे. त्याच्या या अनोख्या आणि मजेदार व्हिडीओमुळे, ‘बिग बॉस मराठी ५‘ च्या आठवणी ही पुन्हा ताज्या झाल्या आहेत. आता घनश्यामचं खरं लग्न कधी आणि कसं होईल, हे लवकरच समजणार आहे, परंतु तो यासाठी तयार आहे का? हे माहित नाही.