‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Lakhat Ek Amcha Dada मालिका संपल्यानंतर अभिनेता नितीश चव्हाणची भावुक पोस्ट, म्हणाला ‘मला सख्खी बहिण नाही पण…’
‘लाखात एक आमचा दादा’ या लोकप्रिय मालिकेनं नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. प्रत्येक वेळी जसं होतं, तसंच या मालिकेच्या शेवटीही कलाकार भावुक झाले. कारण कोणतीही मालिका म्हणजे फक्त काम नसतं, ती एक कुटुंबासारखी नाती जोडणारी गोष्ट असते. आणि ही नाती पडद्यावरच नाही, तर आयुष्यभर टिकतात, हे पुन्हा एकदा दिसून आलं. या मालिकेतले कलाकारही सोशल मीडियावरून आपले अनुभव, आठवणी शेअर करत आहेत. विशेषतः मुख्य कलाकार नितीश चव्हाण याची भावनिक पोस्ट सध्या चर्चेत आहे.(Lakhat Ek Amcha Dada)

त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “सूर्यकांत शंकरराव जगताप उर्फ सूर्या दादा, आता सगळ्यांचा निरोप घेतोय, पण ‘सूर्या’ मित्रा, तू या नितीशला खूप काही दिलंस. तू नवं कुटुंब दिलंस, नवी ओळख दिलीस, नवी ऊर्जा दिलीस, आणि सगळ्यात खास म्हणजे गोड बहिणी दिल्यास. मला सख्खी बहीण नसल्यामुळे बहिणीचं आयुष्य, तिची जबाबदारी काय असते, हे मला माहीत नव्हतं. पण या मालिकेमुळे मला ते सगळं कळालं आणि अनुभवता आलं.”

त्याने पुढे अस ही लिहिलं आहे की, “गिरीश ओक सर, तुम्ही आमच्यासाठी केवळ वरिष्ठ कलाकार नव्हता, तर मित्र होता. म्हणूनच आम्ही मोकळेपणाने काम करू शकलो. माझ्या गोड बहिणींनो, तुम्ही चौघी नसतात तर हा सूर्या साकारलाच गेला नसता. माझ्या दोन आधारस्तंभांनाही महेश जाधव आणि स्वप्नील कानसे खूप खूप प्रेम.” नितीशच्या या भावनिक पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Lakhat Ek Amcha Dada)
==================================
हे देखील वाचा: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ गाजवल्यानंतर Mdhavi Nimkar पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणयासाठी सज्ज !
==================================
दरम्यान, या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर ‘लागीर झालं जी’ नंतर नितीशचा झी मराठीवरील हा भारी कमबॅक ठरला. या मालिकेचं लेखन स्वप्नील चव्हाण आणि विशाल कदम यांनी केलं, तर किरण दळवी यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली होती. निर्मिती ‘वज्र प्रोडक्शन’कडून करण्यात आली होती. ही कथा एका भावाची होती जो आपल्या बहिणींचं आयुष्य घडवण्यासाठी, त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नेहमी तयार असतो. आणि त्यामुळेच “सूर्या” हा पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलं.