
Aishwerya Rai : ९० च्या दशकातील मनिषा-ऐश्वर्याची गाजलेली कॅट फाईट!
बॉलिवूडमधील कॅटफाईट्सच्या काही नव्या नाहीत. रवीना टंडन-करिश्मा कपूर, बिपाशा बासू-करीना कपूर, श्रीदेवी-जया प्रदा अशा अनेक अभिनेत्रींचं एकमेकांशी पटत नव्हतं. त्यांच्या भांडणाचे अनेक किस्से आपल्याला माहित देखील असतील. पण, मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) हिच्याबद्दल सलमान प्रकरणापलिकडे फारसं काही ऐकल्याचं आठवत नाही. तिच्याच बाबतीतला एक भन्नाट किस्सा जाणून घेऊयात. अभिनेत्री मनिषा कोईराला (Manisha Koirala) आणि ऐश्वर्या राय यांच्यात एकेकाळी इतकं कडाक्याचं भांडण झालं होतं की विश्वसुंदरी घरी जाऊन ढसाढसा रडत होती. काय घडलं होतं जाणून घ्या…. (Aishwerya Rai-bachchan)
तर, मनिषा कोईराला (Manisha Koirala) आणि ऐश्वर्या राय यांच्यात लव्ह टायअॅंगल वरुन भांडण झालं होतं. मनिषाने तिच्या ब्रेकअपसाठी ऐश्वर्याला जबाबदार ठरवून चांगलंच सूनावलं होतं. मनिषा मॉडेल राजीव मूलचंदानी याला डेट करत होती. आणि ते रिलेशनशिपमध्ये असताना मनिषाला राजीवकडे ऐश्वर्याला लिहिलेली काही प्रेमपत्र साडली होती. त्यावरुनच मनिषाने ऐश्वर्याला जबाबदार ठरवून तिला आरोपी केलं होतं. त्यानंतर ऐश्वर्याचं राजीव मूलचंदानी सोबत नाव जोडलं गेलं आणि त्याबद्दल फार वाईट वाटल्यामुळे ऐश्वर्या घरात जाऊन तासंतास रडत बसायची. (Entertainment masala)

दरम्यान, ऐश्वर्यावर मनिषाने केलेल्या या आरोपावर तिने मौन सोडत म्हटलं होतं की, “१९९५ मध्ये ‘बॉम्बे’ चित्रप पाहिल्यानंतर मी मनिषाच्या कामाचं कौतुक करण्यासाठी आणि तिला शुभेच्छा देण्यासाठी तिला फुलांचा गुच्छ पाठवणार होते. १ एप्रिलला मला राजीवने फोन केला आणि त्यालाही मी मनिषाच्या कामाबद्दल सांगितलं. तेव्हा त्यानं मला सांगितलं की, वृत्तपत्र वाचलं नाही का? तेव्हा मला मनिषानं केलेल्या आरोपांबद्दल समजलं आणि तो माझ्यासाठी मोठा धक्का होता”. (Bollywood update)
पुढे ऐश्वर्या म्हणाली होती की, ९ महिन्यांपूर्वी जर का हे घडलं होतं तर मनिषा महिने गप्प का होती? ती माझ्याशी का बोलली नाही. पण खरं सांगते सुरुवातीच्या काळात मला मनिषाच्या या प्रकरणामुळे खुप त्रास झाला होता. मी वेड्यासारखा पडले होते”. कालांतराने तो किस्सा दोघी अभिनेत्री विसरल्या खऱ्या पण तरीही नसलेल्या लव्ह ट्रायअॅंगलमध्ये अडकल्यामुळे ऐश्वर्याचा तीळपापड मात्र नक्कीच झाला. (Bollywood gossip)
============
हे देखील वाचा : Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?
============
दरम्यान, ऐश्वर्या राय हिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर ऐश्वर्याने १९९७ मध्ये ‘Iruvar’ या तमिळ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्याच वर्षात ‘और प्यार हो गया’ या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडचा प्रवास सुरु केला. त्यानंतर ‘ताल’, ‘जोश’, ‘देवदास’, ‘मोहब्बतें’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘उमरा-ओ-जान’, ‘रावण’, ‘पोन्नियन सेलवन’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका तिने साकारल्या. (Aishwerya rai Films)