
Akshay Khanna : “तर मला इंडस्ट्रीला रामराम करायला आवडेल”
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केल्यामुळे छावा चर्चेत आहेच पण त्यातही अभिनेता अक्षय खन्ना (AKshay Khanna) याने साकारलेल्या औरंगजेबामुळेही चित्रपटाबद्दल बरंच बोललं जात आहे. ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असूनही स्टारकिड अक्षय खन्ना फारसे लाईमलाईटमध्ये दिसले नाहीत. यावर स्वत: अक्षय यांनी भाष्य केलं असून अशाच चर्चा असतील तर मला इंडस्ट्रीतून बाहेर राजूला आवडेल असं वक्तव्य केलं आहे. नेमकं काय म्हणाले खन्ना वाचाच… (Entertainment trending news)
८०-९० चं चित्रपटसृष्टीचं दशक गाजवणारे लोकप्रिय अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांचा मुलगा अक्षय खन्ना अनेक चित्रपटात दिसला. पण जसं आजच्या स्टारकिड़्सना हाईप केलं जातं तितं अक्षय खन्ना यांना केलं गेलं नाही. विशेष म्हणजे अक्षय कधीच बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये फारसे दिसले नाहीत. यावर आपलं परखड मत मांडणारी त्यांनी एक मुलाखत सध्या व्हायरल झाली आहे.

यात अक्षय म्हणतात, “तुम्ही किंवा इतर कोणीही मला सांगितलं की, मी माझा स्वभाव बदलावा. वारंवार मला कोणत्याही पार्टीत, मुलाखतीत, वादात सहाभागी होऊन काही ना काही कारणाने फक्त चर्चेत राहायवं लागेल. आणि मी केलं नाही तर मी फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर फेकला जाईल. यावर मी असं म्हणेन की, अशी परिस्थिती असेल तर मला इंडस्ट्रीतून बाहेर जायला आवडेल. सतत चर्चेत राहण्यापेक्षा मला इंडस्ट्रीला रामराम ठोकायला जास्त आवडेल. कारण मी या गोष्टींसाठी स्वतःला नाही बदलू शकत. मी जसा आहे तसा आहे”. (Bollywood gossip)

दरम्यान, अक्षय खन्ना (Akshay Khanna) यांनी औरंगजेबाची भूमिका साकारण्यापूर्वी लेखकाडे एकच अट ठेवली होती ती म्हणजे, मी औरंगजेब दिसलो पाहिजे आणि त्याप्रमाणे अभिनय आणि वेशभूषा या दोघांच्या संमिश्रणामुळे अक्षय खन्नाने चित्रपटात त्याची उत्तम कामगिरी केली आहे.
===========================
हे देखील वाचा: Akshay khanna : छावा सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हता पहिली पसंती
===========================
अक्षय खन्नाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर अक्षयने आजवर ‘ताल’, ‘दिल चाहता है’, ‘गांधी माय फादर’, ‘हलचल’, ‘हंगामा’, ‘दृश्यम २’, दीवार’ (Deewaar), ‘कार्गिल’, ‘आ अब लौट चले, ‘मोहब्बत’, ‘बोर्डर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आणि सध्या अक्षय ‘छावा’ (Chhaava movie) चित्रपटातील औरंगजेबाच्या भूमिकेमुळे विशेष चर्चेत आहेत. (Bollywood movies)