Ranbir Kapoor : ८३५ कोटींच्या ‘रामायण’ चित्रपटाची सर्वात मोठी अपडेट!

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!
‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ दादासाहेब फाळके यांचं जीवन आजपर्यंत चित्रपटात सखोलपणे मांडण्याचा निर्णय घेत आमिर खान (Amir Khan) आणि राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. दादासाहेब फाळके यांचा बायोपिक लवकरच ही जोडी प्रेक्षकांसाठी घेऊन येणार असल्याची महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी ‘पीके’ आणि ‘३ इडियट्स’साठी एकत्रित आलेली ही अभिनेता-दिग्दर्शकाची जोडी महत्वपूर्ण बायोपिकसाठी एकत्र येणार हा आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे. (Bollywood news)

दरम्यान, आजपर्यंत हिंदीत दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या जीवनावर आधारित किंवा त्यांनी चित्रपटसृष्टी भारतात कशी तयार केली यावर एकही हिंदी चित्रपट आला नव्हता. त्यामुळे आता आमिर खान आणि राजकूमार हिरानी यांनी हा विडा उचलला असून अडचणींचा सामना, आव्हानं झेलून दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टी कशी उभारली याचा इतिहास हिंदीत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. दरम्यान, हा बायोपिक स्वातंत्र्य संग्रामाच्या पार्श्वभूमीवर घडणारी एका कलाकाराची विलक्षण संघर्षमय कहाणी मांडणार आहे. ज्यांनी शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठ्या स्थानिक चित्रपटसृष्टीची पायाभरणी केली होती. (Indian cinema)

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे चित्रिकरण ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होणार आहे. सध्या आमिर खान त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’च्या प्रदर्शनात व्यस्त आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खान लवकरच या चित्रपटासाठीतयारी सुरू करणार आहेत. या भव्य आणि महत्वपूर्ण बायोपिकसाठी लॉस एंजलिसमधील व्हीएफएक्स स्टुडिओंनी त्या काळातील युगदर्शक डिझाइन्स आधीच एआयच्या साहाय्याने तयार केली आहेत. (Father Of Indian Cinema)
==============
हे देखील वाचा : Sholay :’शोले’ची ५० वर्ष पुर्ण; प्रेक्षकांसाठी खास रि-रिलीज होणार चित्रपट
==============
तसेच, या चित्रपटाच्या लेखनावर राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज हे चार लेखक गेले चार वर्षे झाले काम करत आहेत. विशेष म्हणजे, दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसळकर यांनी या प्रकल्पासाठी आपला पूर्ण पाठिंबा दिला असून त्यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यातील अनेक खास आठवणी आणि प्रसंग शेअर केले आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया उभारणाऱ्या दादासाहेब फाळकेंचा गौरवशाली इतिहास लवकरच हिंदीत मोठ्या पडद्यावर साकारला जाणार आहे. यापूर्वी मराठीच परेश मोकाशी यांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट साकारत दादासाहेब फाळकेंचं जीवन आणि त्यांच्या चित्रपटांचा प्रवास या चित्रपटातून मांडला होता. (Entertainemnt news)
