
Amir Khan : “ ‘महाभारत’ या ड्रीम चित्रपटात ‘ही’ भूमिका करायला आवडेल”
बऱ्याच वर्षांनंतर आमिर खानचे (Amir khan) चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बॅक टु बॅक झळकू लागले आहेत. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट येणार असून त्या पाठोपाठ लाहोर १९४७ देखील प्रदर्शित होणार आहे. अशातच मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ड्रीम प्रोजेक्ट ‘महाभारत’ (Mahabharat) लवकरच सुरु होणार अशी चिन्ह दिसत आहेत. ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटाच्या अपयशाने आमिरला प्रचंड धक्का बसला होता. पण त्यानंतर पुन्हा एकदा जोमाने उभं राहात त्याने ‘महाभारत’ प्रोजेक्टचीही हिंट दिली आहे. इतकंच नाही तर या चित्रपटात त्याला कोणती भूमिका करायला आवडेल हे देखील आमिरने सांगितलं आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल….(Entertainment news)

‘एबीपी न्यूज’च्या कार्यक्रमात आमिर खान म्हणाला की, ‘महाभारत प्रोजेक्ट हे माझं स्वप्न आहे. मात्र हा कठिण प्रोजेक्ट आहे. ‘महाभारत’ हा भव्य चित्रपट किंवा प्रोजेक्ट करताना कुठलीही चूक होऊ नये असं मला वाटतं. म्हणूनच मी खूप लक्ष देऊन यावर काम करत आहे. माझा पुढचा चित्रपट रिलीज झाल्यावर मी ‘महाभारत’ प्रोजेक्टवर काम करणार आहे. मी यासाठी माझं बेस्ट काम देईन. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे त्यामुळे मी याविषयी अधिक काही बोलणार नाही.” (Mahabharat movie)

दरम्यान, ‘महाराभारत’ इतकं मोठं आहे की एका भागात नक्कीच ते सामावलं जाणार नाही. त्यामुळेच ‘महाभारत’ चित्रपट २ भागांमध्ये तयार होईल असं आमिरने सांगितलं होतं. शिवाय दोन्ही भागांना स्वतंत्र दिग्दर्शक असणार आहेत. तसेच, महाभारत चित्रपटात आमिरला (Amir Khan) भगवान श्रीकृष्णाची भूमिका करायला आवडेल असं देखील त्याने म्हटलं आहे. आता नेमके कोणते कलाकार यात असणार, कधी चित्रपट येणार याची वाट सगळेच पाहात आहेत. (Entertainment tadaka)
================================
हे देखील वाचा: Ajinkya Deo In Ramayana Movie: Ranbir Kapoor स्टारर ‘रामायण’मध्ये अजिंक्य देव साकारणार महत्त्वाची भूमिका
=================================
दरम्यान, ‘महाभारत’ (Mahabharat) किंवा ‘रामायण’ (Ramayan) या पौराणिक कथांवर आधारित कुठलाही चित्रपट जर का येणार असेल तर तो नक्कीच एका भागात दाखवला जाऊ शकत नाही. लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट येणार असून तो देखील दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा पहिला भव्य पौराणिक चित्रपट असेल यात शंकाच नाही. चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम आणि साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Bollywood news)