Mrunmayee Deshpande : ‘मना’चे श्लोक’चा भन्नाट टीझर प्रदर्शित

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?
९०चं बॉलिवूडचं दशक गाजवणारा सुपरस्टार म्हणजे आमिर खान (Aamir Khan). मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख इंडस्ट्रीत निर्माण करणारा आमिर गेल्या काही वर्षांमध्ये सिलेक्टिव्ह भूमिका किंवा चित्रपट करताना दिसतोय. लवकरच त्याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. पण लवकरच मिस्टर परफेक्शनिस्ट बॉलिवूडमधून एक्झिट घेणार असल्याचं संकेत त्यानेच एका मुलाखतीमध्ये दिले आहेत. ‘महाभारत’ (Mahabharat) जो त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे तोच त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो अशी हिंट देखील आमिरने दिली आहे. जाणून घेऊयात नक्की आमिर खान काय म्हणाला? (Entertainment latest news)

आमिर खान (Aamir khan) याने नुकतीच राज शमानी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘सितारे जमीन पर’ नंतर त्याचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या ‘महाभारत’वर लक्ष केंद्रित करेल असं म्हटला आहे. आमिर चित्रपटाबद्दल म्हणाला की, ” ‘महाभारत’ हा प्रोजेक्ट माझं एक स्वप्न आहे. ‘सितारे जमीन पर’ नंतर मी लगेच ‘महाभारत’ या माझ्या पौराणिक चित्रपटाचं काम सुरु करणार आहे. ‘महाभारत’ हा एक भव्य चित्रपट असून तो केल्यानंतर कदाचित माझ्याकडे काही करण्यासारखं उरणार नाही. कारण, या चित्रपटाची कथा जगात जे काही आज अस्तित्वात आहे ती महाभारतात पाहायला मिळेल”.

आमिर याने (Aamir Khan) या मुलाखतीमध्ये एक कलाकार असल्यामुळे मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे असं देखील म्हटला आहे. मात्र, महाभारत हा प्रोजेक्ट केल्यानंतर मला असंही वाटू शकतं की यानंतर मला दुसरं काहीही करायचं नाही, त्यामुळे खरंच आमिरचा सिनेसृष्टीतील त्याच्या करिअरमधील ‘महाभारत’ (Mahabharat movie) शेवटचा चित्रपट ठरु शकण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. (Bollywood trending news)
================================
हे देखील वाचा: Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!
=================================
१९८८ साली आलेल्या ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून आमिरच्या अभिनयाचा प्रवास सुरु झाला होता. मात्र, आमिरने बालकलाकार म्हणून १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘यादों की बारात’ या चित्रपटात काम केलं होतं. अभिनयात आपलं नशीब आजमावल्यानंतर आमिर खान याने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही नाव कमावलं आहे. ऑस्करच्या यादीत समाविष्ट झालेल्या ‘लगान’ (Lagaan) चित्रपटाची निर्मिती आमिर खान यानेच केली होती. याशिवाय, ‘तारे जमीन पर’ चित्रपटाचं दिग्दर्शन करुन त्याने नवा पायंडा पाडला होता. ‘लाल सिंह चड्डा’ (२०२२) चित्रपटानंतर ‘सितारे जमीन पर’ (Sitare Zameen Par) चित्रपटातून आमिरने कमबॅक केलं असून हा चित्रपट २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Amir Khan movies)