
Amitabh And Jaya Bachchan : घरच्यांचा होकार पण भटजींनीच लग्न लावायला दिलेला नकार!
भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक कलाकारांनी इंडस्ट्रीतीलच कलाकारांशी लग्नगाठ बांधली आहे.. यापैकीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन….(Amitabh and Jaya Bachchan) बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार यांनी १९७३ मध्ये लग्न केलं… पण तुम्हाला माहित आहे का या दोघांचं लग्न लावण्यास चक्क भटजींनीच नकार दिला होता… आता असं का झालं होतं याचा रंजक किस्सा जाणून घ्या…(Bollywood news update)
जया भादुरी यांचा जन्म बंगाली कुटुंबात झाला… पुढे अभिनयाचं फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्या अभिनयाची सुरुवात १९६३ साली ‘महानगर’ या चित्रपटापासून केली… १९८९ मध्ये जया बच्चन यांचे वडील तरुण भादुरी यांनी इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडियासाठी एक लेख लिहिला होता. यात त्यांनी जया आणि अमिताभ (Amitabh and Jaya Bachchan) यांच्या लग्नाचा खास किस्सा लिहिला होता.. (Bollywood gossips)

तरुण यांच्या लेखानुसार अमिताभ बच्चन यांनी एके दिवशी जया बच्चन यांच्या आईला फोन करून लग्नाबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांना मुंबईला बोलावलं गेलं. दुसऱ्याच दिवशी जया यांचे कुटुंबीय मुंबईत आले. जया बच्चन यांच्या वडिलांचे मित्र मलबार हिल्समध्ये राहत होते. तिथेच त्यांच्या मुलीच्या लग्नाची तयारी करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचे लग्न गुप्त ठेवण्यात आले होते.(Entertainment news)
===============================
हे देखील वाचा: Balasaheb Thackeray बाळासाहेब ठाकरेंनी अमिताभ बच्चनपासून ते संजय दत्तपर्यंत ‘या’ सर्व कलाकारांना केली मदत
===============================
पुढे त्यांनी असं लिहिलं आहे की, ते नास्तिक आहेत पण त्यांच्या पत्नीची इच्छा होती की जयाचं लग्न बंगाली रितीरिवाजानुसार व्हावं. आधी त्यांना लग्नासाठी भटजी सापडले नाहीत. मग मोठ्या कष्टाने एक भटजी सापडले पण ते दोघांचे लग्न लावायला तयार नव्हते. अमिताभ बच्चन बंगाली ब्राह्मण नसल्याचं कारण सांगत त्यांनी लग्न न लावण्यासाठी सांगितलं. मात्र, नंतर सर्वांनी भटजींची समजूत घातली आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि जया यांचा विवाह सर्व विधींनुसार संपन्न झाला. लग्नानंतर अमिताभ लंडनला गेले आणि परत आल्यावर भोपाळमध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडलं. (Bollywood wedding stories)

जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर आत्तापर्यंत, ‘सिलसिला’, ‘उपहार’, ‘अभिमान’, ‘कोरा कागज’, ‘नौकरी’, ‘हजार चौरासी की मां’, ‘फिजा’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कल हो ना हो’ सारख्या सदाबहार चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आणि जया आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र ‘कभी खुशी कभी गम’, ‘शोले’ (Sholya), ‘अभिमान’, ‘मिली’, ‘एक नजर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. (Jaya Bachchan movies)