
राजेश खन्ना यांच्या ‘या’ सिनेमाच्या मुहूर्ताची क्लॅप Amitabh Bahchan यांनी दिली होती
एकेकाळी हिंदी सिनेमाच्या मुहूर्त (फिल्मी भाषेत मोहरत) ला फार महत्त्व असायचे. हा एक पब्लिसिटी फंडा असायचा. त्या निमित्ताने मीडियाला मुहूर्ताच्या प्रसंगाला बोलावलं जायचं. मोठ्या थाटामाटात समारंभ साजरा व्हायचा. पार्ट्या व्हायच्या. सत्तरच्या दशकामध्ये तर मोहरतला महत्त्व असायचे. त्यामुळे प्रत्येक निर्माता दिग्दर्शक आपल्या चित्रपट मुहूर्ताच्या बातमीनेच पब्लिकच्या मनात घर करून बसण्याचा असा त्यांचा प्रयास असायचा. मीडियातील प्रत्येक सिने पत्रकाराला आवर्जून तिथे बोलावलं जायचं. पण कधी कधी कलाकारांच्या इगो पायी हे मुहूर्ताचे शॉट घेणं लांबायचं. यातून सुद्धा अनेक गॉसीप्स कथांचा जन्म व्हायचा.

कृष्णा शहा यांच्या ‘शालीमार’ या अतिभव्य चित्रपटाचा मुहूर्ताची कथा आजही बॉलीवूडमध्ये चवीने सांगितले जाते. आज याच काळातील एका चित्रपटाच्या मुहूर्ताची कथा मी सांगत आहे. हा चित्रपट होता सुलतान अहमद दिग्दर्शित ‘धरम काटा’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य असं होतं त्याला संगीतकार नौशाद संगीत देत होते आणि हा एक मल्टीस्टारर सिनेमा होता. या चित्रपटाचा मोहरत १९७८ मध्ये झाला होता. चित्रपट बनायला बरीच वर्षे लागली आणि १३ ऑगस्ट १९८२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिग्दर्शक सुलतान अहमद हे महान दिग्दर्शक के. असिफ यांचे असिस्टंट होते. त्यांच्या ‘लव अँड गॉड’ आणि ‘ सस्ता पानी महंगा खून’ या चित्रपटाच्या वेळी ते त्यांचे सहाय्यक होते.

‘धरम कांटा’ हा मल्टीस्टार चित्रपट… या चित्रपटात राजेश खन्ना , जितेंद्र , राजकुमार, वहिदा, रीना रॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा सिनेमा मोठ्या स्केलवर बनत होता. कारण सुलतान अहमद यांचा यापूर्वीचा ‘गंगा की सौगंध’ हा अमिताभ आणि रेखा यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता . त्यामुळे ते एका मेगा प्रोजेक्ट वर काम करत होते. खरंतर त्यांना ‘धरम कांटा’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनाच घ्यायचे होते पण अमिताभ बच्चन यांना त्या काळातील बिझी शेड्युलमध्ये ते शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या चित्रपटाच्या मुहूर्ताला क्लॅप देण्यासाठी अमिताभ बच्चन यांना निमंत्रित केले होते. मुहूर्ताचा शॉट राजेश खन्नावर घ्यायचा होता. राजेश खन्ना माजी सुपरस्टार आणि अमिताभ बच्चन त्या काळातला सुपर स्टार . यांच्यातील कोल्ड वॉर त्यावेळी खूप चर्चेत होते. त्यामुळे या मुहूर्ताला हे दोघे कसे रिऍक्ट करतात यात बद्दल मीडियामध्ये चर्चा होती.
=============
हे देखील वाचा : Saraswati Devi : कोणत्या संगीतकार महिलेला आपले नाव बदलून संगीत द्यावे लागले?
=============
अमिताभ बच्चन वेळेच्या बाबतीत खूप पार्टिक्यूलर . त्याच्या उलट राजेश खन्ना. कधीच कुठल्याही शेड्युलला ते वेळेत पोहोचयचे नाही. किमान या सिनेमाच्या मुहूर्ताच्या वेळी त्यांनी वेळेवर पोहोचावे म्हणून सुलतान यांनी त्यांना वारंवार विनंती केली होती! आता मुहूर्ताच्या दिवशी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्यापैकी आधी कोण पोहोचतो याची उत्सुकता होती. त्यामुळे दोघेही आपापल्या सूत्रांकडून कोण आधी पोहोचतो माहिती घेत होते! (नशीब त्या काळात मोबाईल नव्हता!) उशिरा पोहोचणार्याचं महत्त्व जास्त असत असा एक स्टॅंडर्ड गैरसमज त्या काळात पसरलेला होता! त्यामुळे राजेश खन्ना कुठल्याही परिस्थितीत अमिताभ बच्चन यांच्यानंतर येण्याचा प्रयत्न करत होता आणि तसेच अमिताभ बच्चन देखील! त्यामुळे पहले आप पहले आप … सर्व मीडिया सर्व कलाकार खोळंबून बसले होते. दिग्दर्शक सुलतान अहमद मात्र हतबध्द झाले. ते दोघांनाही फोन करून त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करत होते.
===============
हे देखील वाचा : Saraswati Rane : जब दिलको सताये गम तू छेड सखी सरगम
===============
यामध्ये तीन-चार तासाचा अवधी उलटून गेला. शेवटी अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना एकाच वेळी सेटवर आले. सुलतान अहमद यांनी लगेच मुहूर्ताचा शॉट घ्यायची तयारी केली. अमिताभ बच्चन यांनी क्लॅप दिली आणि सुलतान अहमद यांचा भांड्यात जीव पडला. अमिताभ बच्चन फारसं कोणाशी न बोलता सेटवरून तडक बाहेर पडले. यानंतर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. राजकुमार, राजेश खन्ना सर्वच बिझी आणि अहंकारी स्टार . त्यामुळे चित्रपटाचं चित्रीकरण लांबत गेलं आणि तब्बल चार वर्षांनंत हा चित्रपट पूर्ण झाला. यातील संगीतामुळे हा चित्रपट यशस्वी झाला. ‘ये गोटेदार लहंगा’ हे आशा भोसले आणि रफी यांनी गायलेले गाणे त्या काळात प्रचंड गाजले होते. चित्रपट देखील चांगला बनला होता.