Rajendra Kumar : दिग्दर्शकाच्या नावा शिवाय “लव्ह स्टोरी” सुपरहिट

Amitabh Bachchan : ‘कभी-कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण; वाचा खास किस्सा
“कभी कभी मेरे दिल मैं खयाल आता हैं…”, या ओळी ऐकल्या की डोळ्यांसमोर केवळ अमिताभ बच्चन आणि रेखा यांचाच चेहरा उभा राहतो. यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘कभी कभी’ या चित्रपटाला रिलीज होऊन आज २७ फेब्रुवारी २०२५ ला ४९ वर्ष पुर्ण झाली. पण आजही चित्रपटाची कथा, गाणी रिलेट होतातच. जुनं ते सोनं म्हणतात ते उगाच नाही यावर आता हळू हळू ठाम विश्वास बसू लागलाय. कारण, नवी पिढी आजचे चित्रपट त्यातील कथा , गाणी याकडे आकर्षित होण्यापेक्षा किंवा ती गाणी गुणगुण्यापेक्षा जुनी गाणीचं लूपवर ऐकत असतात किंवा त्याच जुन्या गाण्यांवर रिल्स करत असतात. असो.. आज ‘कभी कभी’ चित्रपटाला ४९ वर्ष पुर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी सांगितलेला एक किस्सा जाणून घेऊयात… (Amitabh Bachchan)
Amitabh Bachchan,शशी कपूर, राखी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘कभी कभी’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी १९७६ साली रिलीज झाला होता. ७०-८०च्या दशकात शुट केल्या जाणाऱ्या चित्रपटांना बऱ्याच अडचणींचा सामना खरंतर आजच्या तुलनेत करावा लागत होता. याचीच एक मनोरंजक गोष्ट अमिताभ बच्चन यांनी `कौन बनेगा करोडपती`शोमध्ये सांगितली होती. तर किस्सा असा होता की कभी कभी चित्रपटाचे शुटींग कलाकारांना त्यांच्याच कपड्यामध्ये करावं लागत होतं. हो. कारण, त्याकाळी costume designer हे क्षेत्र फारसं प्रगत झालं नसल्यामुळे कलाकारांना बऱ्याचवेळा आपल्याच कपड्यांमध्ये शुट करावं लागत होतं. (Bollywood tadaka)

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) याचा किस्सा सांगताना म्हणाले की, ” ‘दीवार’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं ज्यात अॅक्शन, फाइट सीन आणि इंटेन्स ड्रामा होता. तो चित्रपट पूर्ण केल्यानंतर, मला दोन दिवसांनी ‘कभी कभी’च्या शूटिंगसाठी काश्मीरला जावं लागलं. दीवार चित्रपटाच्या अगदी विरुद्ध ‘कभी कभी’ चित्रपटाचं कथानक होतं; कारण तो रोमँटिक चित्रपट होता, ज्यात सुंदर फुलं, टेकड्यांवरील थंडगार वारे आणि एक रोमॅंटिक वातावरण होतं. त्यामुळे ‘दीवार’ नंतर, ‘कभी कभी’च्या पोशाखाबद्दल मी यश चोप्रा यांना विचारलं की ‘या चित्रपटात मी कसे कपडे घातले पाहिजे?’ त्यांचं उत्तर होतं, ‘तुझ्याकडे जे काही आहे तेच घाल, ते सर्व चांगले दिसेल.’ आणि म्हणूनच, चित्रपटात मी जे कपडे घालले आहेत, ते माझ्या स्वतःच्या कपाटातील माझे कपडे होते”. (re-release movies)
==================
हे देखील वाचा : ‘कभी कभी’ चे टायटल सॉंग अमिताभ बच्चन गाणार होते?
==================
‘कभी कभी’ चित्रपटाने रोमॅंटिक चित्रपटांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे यात शंकाच नाही. मुळात दमदार कलाकारांचा अभिनय, त्यात सुपरहिट गाणी आणि काय हवं? १९७६ साली रिलीज झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर ४ कोटींची कमाई केली होती. खरं तर ७०-८० च्या दशकात बॉक्स ऑफिस हा शब्दचं फारसा लोकांना माहित नव्हता. प्रेक्षकांची तुफान गर्दी आणि किती आवडे चित्रपट थिएरमध्ये राहिला यावरुन तो चित्रपट हिट होता की फ्लॉप होता हे गणित मांडलं जात होतं. पण आजही अगदी २१व्या दशकातही (Amitabh Bachchan) अमिताभ बच्चन, राखी यांच्या जोडीचा ‘कभी कभी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या आवडत्या लिस्टमध्ये नक्कीच आहे. त्यामुळे जुने चित्रपट रि-रिलीज करण्याच्या यादीत यश चोप्रा यांचा ‘कभी कभी’ चित्रपटही असेल तर नक्कीच हरकत नसेल. कारण, याच निमित्ताने आपल्या पालकांसोबत आपण एकत्रित रोमॅंटिक चित्रपट कुटुंबासोबत थिएटरमध्ये एकत्रित पाहण्याची मजा घेऊ शकतो. (Bollywood classics)