Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”

Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!

Rajinikanth  आणि मिथुन चक्रवर्ती ३० वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार?

Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

गब्बर अभिनेता

 गब्बर अभिनेता
कलाकृती तडका माझी पहिली भेट

गब्बर अभिनेता

by दिलीप ठाकूर 27/07/2020

रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले” (रिलीज १५ ऑगस्ट १९७५) चा फस्ट डे फर्स्ट शो सुरु झाला….

सलिम जावेदची बंदिस्त पटकथा आणि दमदार संवाद असलेला हा चित्रपट जस जसा पुढे सरकला तस तशी प्रेक्षकांना गब्बरसिंगची (अमजद खान) प्रचंड दहशत वाटू लागली. शर्ट पॅन्टमधला डाकू ही कल्पना नवीनच होती. तर त्याची ठाकूर बलदेवसिंगच्या (संजीवकुमार) कुटुंबाची निर्घृण हत्या करणे आणि ठाकूरचेही दोन्ही हात अतिशय रानटीपणाने तलवारीने कापणे हे तर अंगावर शहारे आणणारे होते…. संपूर्ण पडदाभर गब्बरसिंगचे रानटी कौर्य पसरले होते. 

तत्कालिक समिक्षकांनी ‘हा रक्तपाती सिनेमा आहे’ असा कौल दिला. प्रेक्षकांत फारशी काहीच प्रतिक्रिया नव्हती, त्यामुळे ‘शोले’ फ्लॉप झाला अशीच कुजबुज सुरु झाली होती. पण ती एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता पसरली आहे याची कोणालाही कल्पना आली नाही. 

 साधारण दीड दोन आठवडे झाले आणि ‘शोले’ ची क्रेझ वाढू लागली. सत्तरच्या दशकात अशी सूडकथा नवीन नव्हतीच, पण या चित्रपटाचा कॅनव्हास थक्क करणारा होता. विशेषतः मुंबईतील मेन थिएटर मिनर्व्हात ७० एमएमचा विशाल पडदा आणि स्टीरिओफोनिक साऊंड सिस्टीम यांचा प्रभाव जास्त होता (तत्पूर्वी, हिंदी चित्रपटात पांछी दिग्दर्शित ‘अराऊंड द वर्ल्ड’ हा पडद्यावर आलेला एकमेव ७० एमएमचा चित्रपट प्रेक्षकांनी नाकारला होता)

गब्बरसिंगचा टेरर अथवा भीती हे या चित्रपटाचे विशेष वैशिष्ट्य ठरत होते. रसिकांच्या किमान दोन पिढ्या विविध गेटअपने आणि कुटील डावपेच, छद्मी हास्य, जहरी नजर अशी व्हीलनगिरी करीत असलेल्या प्राणला घाबरत वाढली. त्यानंतर अजित, प्रेमनाथ, प्रेम चोप्रा, डॅनी डेन्झोपा, रणजित, मदन पुरी अशा व्हीलनचे राज्य सुरु झाले होते आणि अशातच अमजद खान अवतरला तोच हिंसेवर विश्वास ठेवणारा क्रूरकर्मा गब्बरसिंगच्या रुपात! 

खरं तर रमेश सिप्पीने गब्बरसिंगच्या भूमिकेसाठी अगोदर डॅनी डेन्झोपाचे नाव निश्चित केले होते. पण त्याचवेळी साधारणपणे अशाच ‘स्टोरी ‘वरच्या नरेन्द्र बेदी दिग्दर्शित ‘खोटे सिक्के’ या चित्रपटात तो अशीच व्यक्तिरेखा साकारत असल्याने त्याने ‘शोले’ नाकारला. पण या चित्रपटाच्या पहिल्या सिटींगला तो हजर असल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. शत्रूघ्न सिन्हा खलनायकीकडून हीरोगिरीकडे वळला असल्याने त्यानेही नकार दिल्याने ‘गब्बर कोण’ हा मोठा प्रश्न होता.

तेव्हा जावेद अख्तर यांच्या पाहण्यात ‘ये मेरे वतन के लोगो’ हे नाटक पाहण्यात आले आणि त्यांनी अमजद खानचे नाव सुचवले. तोपर्यंत अमजद खानची ओळख म्हणजे एकेकाळचा खलनायक जयंत यांच्या दोन मुलांपैकी एक अशीच होती. दुसरा मुलगा इम्तियाझ खान तोपर्यंत व्हीलनगिरीत वाटचाल करीत होता. अमजद त्यावेळी हिंदी रंगभूमीवर कार्यरत होता आणि चेतन आनंद दिग्दर्शित ‘हिन्दुस्तान की कसम’ (१९७४) या चित्रपटात त्याने छोटीशी भूमिका साकारली होती. गब्बरसिंगचा दबदबा वाढत गेला तस तशा अमजद खानबद्दलच्या काही गोष्टी समजल्या. त्याने वयाच्या ११ व्या वर्षी ‘नाझनीन’ (१९५१) या चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली. ‘अब दिल्ली दूर नहीं’ (१९५७), ‘माया’ (१९६१) अशा काही चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्यात. त्याची भूमिका असलेला ‘लव्ह अँण्ड गॉड’ हा चित्रपट रखडलाय वगैरे वगैरे. एक यश अशा अनेक गोष्टींचा शोध घेत असते गब्बरसिंगच्या भूमिकेसाठीचे कपडे अमजद खानने चोरबाजारातून विकत घेतले….

‘शोले’ च्या यशात त्याच्या विशिष्ट पद्धतीने लिहिलेल्या आणि प्रत्येक व्यक्तिरेखेच्या स्वभावानुसार व्यक्त होत असलेल्या संवादांची खूप मोठा वाटा होता. अनेक प्रेक्षकांनी त्यासाठीच पुन्हा पुन्हा थिएटरची वारी केली. 

      गब्बरसिंगचेही अनेक डायलॉग गाजले,

कितने आदमी थे,

     

 यहासे पचास पचास कोस दूर गावमें जब बच्चा रात को रोता है तो मॉ कहेती है बेटे सोजा… सोजा नही तो गब्बरसिंग आ जाएगा…

      तेरा क्या होगा कालिया…

      बहुत याराना लगता है…

‘शोले’ च्या संवादांची रेकॉर्ड निघाली, घराघरात ती पोहोचलीच पण रेडिओच्या दुकानाबाहेरही हे संवाद ऐकायला गर्दी वाढत जाई… आणि ऐकतानाही गब्बरसिंगचे विकृत विकट हास्य, भेदक नजर, नीच प्रवृत्ती डोळ्यासमोर यायची अथवा आजही येते. हे म्हणजे अमजद खानने त्या व्यक्तिरेखेला दिलेला न्याय. असा क्रूरकर्मा खलनायक अधिकाधिक जहाल करणे हे तसे सोपे नसते. सगळी सहानुभूती नायक, सहनायक अर्थात पॉझिटीव्ह व्यक्तिरेखांकडे जाते आणि प्रेक्षकांच्या शिव्या अथवा व्देष या व्हीलनकडे जातो. तो पचवून अमजद खान ‘स्टार ‘ झाला आणि जणू गब्बरसिंग ‘हीरो’ झाला. 

हे सगळे होतानाच गब्बरसिंगची आता भीती न वाटता, त्याचे हळूहळू का होईना पण आकर्षण वाढू लागले. अमजद खानने या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचे विशेष कौतुक वाटू लागले. आता ‘गब्बरसिंगच्या दृष्टिकोना’तून ‘शोले’ पाहिला जाऊ लागला…..

अमजद खान ‘स्टार’ झाला आणि अर्थातच त्याच्याकडे अक्षरशः चित्रपटांची रांग लागली. हे होतच असते म्हणा. अशातच ‘जमानत’ नावाचा चित्रपट आला, त्यात अमजद खानला पाहून एक कैदी घाबरुन म्हणतो, ये देखो गब्बर आया…. खरं तर ही अमजद खानच्या अभिनयाला दाद होती. पण त्यातून त्याच्या लोकप्रियतेचा कसा वापर केला होता हे लक्षात येते. चरस, देस परदेस, नास्तिक, सत्ते पे सत्ता, चंबल की कसम, गंगा की सौगंध … अमजद खान सातत्याने हिंदी चित्रपटात दिसू लागला. ‘शोले’ नंतर आलेल्या मल्टी स्टार कास्ट चित्रपट आणि हिंसक थीम यात अमजद खान फिट्ट बसला.

खूप मोठ्या प्रमाणावर त्याने विविध प्रकारचा व्हीलन साकारला (स्मगलर, वगैरे). पण काही काळाने काही सकारात्मक भूमिकाही केल्या. उदाहरणार्थ, याराना, लावारीस वगैरे वगैरे पण मोठ्या प्रमाणावर चित्रपटातून भूमिका साकारण्याचा त्याचा झपाटा कायम होता. बरसात की रात, राम भरोसे, अपना खून, भूख, कस्मे वादे, मुकद्दर का सिकंदर, राम कसम, अहिंसा, रॉकी, सुहाग, ज्वालामुखी, प्यारा दुश्मन, चेहरे पे चेहरा, बगावत, देशप्रेमी, कालिया, हिम्मतवाला, जानी दोस्त, कुर्बानी, लव्ह स्टोरी, चमेली की शादी वगैरे वगैरे बरेच काही चित्रपट केले त्याने! कधी व्हीलन साकारला, कधी पॉझिटीव्ह भूमिका केल्या, तर कधी चरित्र भूमिका….

अमजद खानने पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारतानाही शक्य तेथे काही वेगळे केले. 

जुगल किशोर दिग्दर्शित ‘दादा ‘ या चित्रपटात त्याने शीर्षक भूमिका साकारलीय. एक प्रकारे तो या चित्रपटाचा ‘हीरो’ च. अमजदसाठीच तेव्हा प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला आणि मुंबईत इंपिरियल थिएटरमध्ये रौप्यमहोत्सवी यशस्वी ठरला. 

राज एन. सिप्पी दिग्दर्शित ‘इन्कार ‘मधील अमजदचा व्हीलन डेंजरस होता. एका लहान मुलाचे अपहरण करणारा हा अतिशय धोकादायक व्हीलन होता. दारुच्या गुत्त्यावर हेलन ‘ओ… मुंगळा मुंगळा’ असे फक्कडबाज नृत्य करीत असतानाही हा क्रूरकर्मा राज सिंह अजिबात विचलित होत नाही….

 सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेल्या एकमेव हिंदी चित्रपट ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटात अमजद खानने वाजीद अली शाह ही व्यक्तिरेखा साकारलीय. मुन्शी प्रेमचंद यांच्या साहित्यावर आधारित हा चित्रपट आहे. गुलजार दिग्दर्शित ‘मीरा ‘ या चित्रपटात त्याने राजा अकबर साकारला तर ‘उत्सव ‘ या चित्रपटात वात्सयान साकारला. ‘द परफेक्ट मर्डर ‘ या इंग्रजी चित्रपटाही त्याने भूमिका साकारली. अमजद खानने आपल्या कारकिर्दीत अशा काही वेगळ्या भूमिका साकारत आपल्या गब्बरसिंगच्या लोकप्रियतेच्या बाहेर येण्याचा खूप प्रयत्न केला. पण आपल्याकडे एक खणखणीत यशस्वी चित्रपट त्यातील कलाकाराला अनेकदा तरी कायमची ‘इमेज ‘ चिकटवतो. कधी दिग्दर्शकच त्या कलाकाराची इमेज पुन्हा पुन्हा पडद्यावर आणतो तर कधी प्रेक्षकांनाच त्या कलाकाराने तशाच भूमिकेत वावरावे असे वाटते. कधी कधी प्रचंड यश फसवे ठरते ते हे असे. अमजद खानने चक्क कॉमेडी भूमिकाही साकारल्या. जितेंद्र आणि जयाप्रदा यांची भूमिका असलेल्या ‘सिंहासन’ (मराठी वेगळा) या चकचकीत पोशाखी चित्रपटात अमजद खानने चक्क स्री वेष धारण केला. 

आपल्या दादा कोंडके यांनी ‘अंधेरी रात मे दिया तेरे हाथ में ‘ या चित्रपटात अमजद खानला मूळ ‘तुमचं आमचं जमलं’ मध्ये अशोक सराफने साकारलेली ममद्या खाटीक ही भूमिका दिली. दादानी आपल्या भोर येथील स्टुडिओत आपल्या या चित्रपटाचे शूटिंग असताना मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकाराना आवर्जून शूटिंग कव्हरेजसाठी आमंत्रित केले होते तेव्हा अमजद खानच्या भेटीचा आणि मुलाखतीचा योग आला. तेव्हा त्याने ‘आपणास वारंवार गब्बरसिंगची आठवण करुन दिली जाते’ असा खेद व्यक्त केला. आपली ती भूमिका पडद्यावर आल्यावर आपले पुढचे आयुष्य सुरु झाले हे फारसे कोणी विचारात न घेता पुन्हा पुन्हा ‘रामगढचे दिवस, शोलेचे यश, गब्बरसिंगची दहशत ‘ यावरच बोलायला भाग पाडतात हे आपणास फारसे रुचत नाही म्हटलं. 

राजू मावानी दिग्दर्शित आणि अजित देवानी दिग्दर्शित ‘रामगढ के शोले ‘मधील ड्युप्लीकेट देव आनंद, अमिताभ बच्चन, अनिल कपूर आणि गोविंदा यांच्यासोबत भूमिका म्हणूनच त्याने एन्जॉय केली. ‘शोले’ चा गब्बरसिंग आपली शिक्षा पूर्ण करुन जेलबाहेर येतो तोच त्याला हे चौघे ड्युप्लीकेट किडनॅप करतात आणि मग एकच धमाल उडते अशी या चित्रपटाची कॉन्सेप्ट आहे. अमजद खानने या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक मुलाखती देताना आपण हलक्यफुलक्या भूमिका करु इच्छितो म्हटलं होते. 

आपल्या अशा एकूणच बिझी कारकिर्दीत त्याने ‘चोर पोलीस’ (१९८३) आणि ‘अमीर आदमी गरीब आदमी’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले, पण त्याला त्यात विशेष प्रभाव दाखवता आला नाही आणि मग लहान मोठ्या भूमिका साकारत त्याची वाटचाल सुरु राहिली. 

या एकूण वाटचालीत एकदा तो अपघातातून वाचला, पण जबरा जखमी झाल्याने बराच काळ त्याने इस्पितळात उपचार घेतले. शक्ती सामंता दिग्दर्शित ‘द ग्रेट गॅम्बलर ‘च्या गोव्यातील शूटिंगवरुन मुंबईत येत असताना त्याच्या गाडीला मोठा अपघात झाला होता. 

 पण अमजद खानला आयुष्य तसे फार मिळाले नाही. त्याचा जन्म १२ नोव्हेंबर १९४० चा आणि वयाच्या ५१ व्या वर्षी २७ जुलै १९९२ रोजी घरी असताना दुपारचा चहा प्यायला आणि अचानक आलेल्या ह्रदयविकाराच्या धक्क्याने अमजद खानचे निधन झाले. 

 अनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारलेला हा गुणी अभिनेता ‘शोले’चा क्रूरकर्मा गब्बरसिंग म्हणून आजही लोकप्रिय आहे. एका प्रचंड यशाने त्याला विलक्षण उंचीवर नेले आणि त्या स्थानावरही त्याने आपल्यातील अष्टपैलू अभिनेत्याला अधिकाधिक वाव देण्याचा नक्कीच प्रयत्न केला. अगदी गब्बरचा धाक आणि लोकप्रियता आपली सावली बनली आहे याची कल्पना असूनही त्याने ते केले. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat Bollywood Topics Celebrity News Celebrity Talks Entertainment Sholey
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.