Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Amjad Khan यांच्या मध्यवर्ती भूमिकेतील ‘हा’ सिनेमा सुपर डुपर हिट ठरला होता!
सत्तरच्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये ॲक्शन फिल्म चा मोठा बोल वाला होता. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांना त्या काळात प्रचंड मोठे यश मिळत होते. या काळात काही बी ग्रेड सिनेमे देखील याच पठडी चे बनत होते. त्यांना तसे माफक यश मिळत होते. पण सिनेमाचा एकूणच जॉनर हा ॲक्शन मुव्हीचा होता. मात्र १९७९ साली एका बी ग्रेड सिनेमाने प्रचंड मोठे यश मिळाले होते. बजेटच्या जवळपास पाचपट कमाई या चित्रपटाने केली. या चित्रपटाच्या निर्माते दिग्दर्शक यांना देखील एवढ्या मोठ्या यशाची अपेक्षा केली नव्हती. त्यानी या सिनेमाच्या प्रमोशन वर काहीच खर्च केला नव्हता. पण हा सिनेमा संपूर्ण देशभर प्रचंड गाजला विशेषतः मुस्लिम बहुल बेल्ट मध्ये या सिनेमाने रौप्य महोत्सवी यश मिळवले. या सिनेमाच्या एका गाण्यावर तर प्रेक्षक पडद्यावर पैशांची उधळण करत असत. कोणता होता तो सिनेमा आणि काय होती नेमकी स्टोरी?

निर्माता दिग्दर्शक जुगल किशोर यांनी अमजद खान यांना मध्यवर्ती भूमिकेमध्ये ठेवून ‘दादा’ हा चित्रपट निर्माण केला होता. या चित्रपटात अमजद खान, विनोद मेहरा, बिंदिया गोस्वामी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. गुन्हेगारी प्रवृत्तीचा पण गरिबांना मदत करणारा मसीहा रॉबिन हूड टाईप शोषितांचा पाठराखा अशी भूमिका अमजद खान यांनी सिनेमात केली होती. चित्रपटाचा सर्व फोकस त्याच्यावरच होता. निर्मात्याने एक बी ग्रेड सिनेमा बनवला होता. जो भारत्तातील ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रेक्षक त्या काळी एन्जॉय करायचे. पण सिनेमाला अनपेक्षित असे व्यापक यश मिळाले.
==========
हे देखील वाचा : बॉबी सिनेमाच्या शूटिंगच्या वेळी नशीब बलवत्तर म्हणून प्राण यांचे प्राण वाचले!
==========
मेट्रो सिटीत देखील ‘दादा’ जबरा चालला. या चित्रपटातील गाणी पाच गीतकारांनी लिहिली आणि सर्वच गाणी प्रचंड हिट झाली. सिनेमा लोकप्रिय होण्यासाठी त्याचे संगीत कारणीभूत ठरले. या सिनेमाला उषा खन्ना यांनी संगीत दिले होते. या चित्रपटात सुमन कल्याणपुर यांनी एक गाणे गायले होते ‘अल्ला हो करम करना मौला तू रहम करना..’ हे गाणं त्या काळात इतकं प्रचंड गाजलं होतं की बऱ्याच मुस्लिम शाळांमधून हे गाणं प्रार्थना गीत म्हणून देखील गायलं जात होतं! या गाण्यात जुन्या काळातील अभिनेत्री विजय चौधरी यांचे बऱ्याच दिवसांनी दर्शन झाले होते. गाण्यातील भाव, अल्ला प्रती असणारी श्रद्धा आणि विश्वास यामुळे या गाण्याला मुस्लिम बहुल पट्ट्यामध्ये प्रचंड यश मिळालं. निझाम सर्किट मध्ये तर हा सिनेमा तुफान गाजला. हे गाणं जेव्हा सुरू व्हायचं तेव्हा अनेक जण पडद्यावर पैसे फेकत असे.
कित्येक जण तर धुंद होऊन त्यावर ताल धरत असत. सुमन कल्याणपुर यांनी गायलेलं हे अखेरच्या काळातील लोकप्रिय हिंदी गाणे असावे कारण यानंतर १९८१ साली आलेल्या मनमोहन देसाई यांच्या ‘नसीब’ या चित्रपटातील ‘जिंदगी इम्तिहान लेती है…’ हे त्यांचं अखेरचा लोकप्रिय हिंदी चित्रपट गीत ठरलं.हे गाणं लिहिलं होतं असद भोपाली यांनी. या चित्रपटात आणखी एक प्रचंड लोकप्रिय झालेले गाणं होतं. हे गाणं गायलं होतं येसुदास यांनी. गीताचे बोल होते ‘दिल के तुकडे तुकडे करके मुस्कुराके चल दिये…’ हे गाणं त्या काळात इतकं गाजलं की त्या वर्षीच्या फिल्म फेअर अवॉर्ड सोहळ्यामध्ये या गाण्याला बेस्ट प्लेबॅक सिंगर चा पुरस्कार मिळाला! या चित्रपटात मोहम्मद रफी आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात एक कव्वाली सदृश्य गाणं होतं.
================================
हे देखील वाचा: अभिनेता अशोक कुमार यांनी चाळीस दशकात घेतली होती फेरारी कार!
=================================
‘पर्दे मे परदे मे कोई बैठा है पर्दा करके’ या गीताचे गीतकार होते असद भोपाली. तसेच रफी, शैलेंद्र सिंग , हेमलता, दिलराज कौर यांच्या आवाजामध्ये ‘गड्डी जांदी ये छलांगा मारदी हे पंजाबी गाणं पण होतं. हे गाणं ‘रवींद्र जैन’ यांनी लिहिलं होतं. यात सुमन कल्याणपुर यांनी गायलेलं एक मुजरा गीत देखील होते’ हमने माना हमपे साजन जोबनावा भरपूर है’ एकूणच टोटल मसाला पॅकेज असे या चित्रपटाचे वर्णन होतं. या सिनेमात पल्लवी जोशी हिने बालकलाकाराची भूमिका केली होती ती देखील खूप अॅप्रिसिएट केली गेली. चरित्र अभिनेत्याला नायक करून सिनेमा हिट करून दाखवण्याचे कसब दिग्दर्शक जुगल किशोर यांना जमलं. अमजद खान यांना सर्वोत्कृष्ट सहनायकाचा फिल्म फेअर मिळाला. दिग्दर्शक जुगल किशोर दुर्दैवाने त्यांचा हा शेवटचा चित्रपट ठरला. कारण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच त्यांचे निधन झालं.

हा चित्रपट ऐंशी च्या दशकामध्ये पुन्हा पुन्हा प्रदर्शित होऊन त्याने चांगला धंदा केला. दक्षिणेत हैदराबाद आणि उत्तरेत या चित्रपटाला प्रचंड मोठी यश मिळालं. अवघ्या 65 लाखात बनलेल्या या चित्रपटांने तब्बल तीन कोटी रुपयांचा बिजनेस केला. आपण जेव्हा सिनेमा चा इतिहास बघतो त्यावेळेला अशा काही अनपेक्षित पणे यशस्वी झालेल्या चित्रपटांची देखील नोंद घ्यावी लागते. कारण हे सिनेमे डार्क हॉर्स सारखे असतात. जेव्हा सिनेमा बनतात त्यावेळेला याच्याकडून अपेक्षा यशाची फारशी केली जात नाही पण पब्लिक हा शेवटी सगळ्यांचा बाप असतो आणि तोच ठरवत असतो कोणता चित्रपट चालणार आणि कोणता चित्रपट चालणार नाही.