पन्नासच्या दशकात दिलीप कुमारवर होणार होता ॲसिड अटॅक!
सिनेमातील कलावंत आणि त्यांचे चाहते यांचे परस्परांसोबत असलेले नाते हे फार वेगळे असते. चाहत्यांचे पराकोटीचे प्रेम आपल्या लाडक्या कलावंतावर असतं. आपल्या त्या आवडत्या कलावंताची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या बंगल्या समोर ते तासंतास उभे असतात. कलावंताना देखील आपल्या फॅन्सचे प्रेम म्हणजे उर्जादायक वाटत असते. या पराकोटीच्या प्रेमातूनच मात्र कधी कधी विचित्र गोष्टी घडत असतात. (acid attack)
अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर पन्नासच्या दर्शकांमध्ये एकदा ॲसिड अटॅक होणार होता आणि हा अटॅक करणार होता त्यांचाच एक सो कॉल्ड फॅन! त्या काळात ही मोठी ब्रेकिंग न्यूज झाली होती. आजही आपण त्या काळातील न्यूज पेपर्स पाहिली तर ही बातमी ठळकपणे आपल्याला त्यात दिसते. काय होता हा नेमका किस्सा आणि हा चाहता का दिलीपकुमार ॲसिड अटॅक (acid attack) करणार होता?
हा किस्सा साधारणता १९५५ सालचा आहे. त्या काळात सोशल मीडिया नव्हता. मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे कलाकारांचे फॅन्स त्यांना पत्र पाठवत असत. या पत्रांमधून ते कलाकारांसोबत आपल्या भावना शेअर करत असत. कलाकारांना देखील हा आपला फॅन मेल खूप आवडत असे. एखादा चित्रपट आवडला नाही तर चाहते आपल्या नाराजीचा सूर देखील आपल्या पत्रातून व्यक्त करत असायचे. कधी कधी हे फॅन्स आपल्या वैयक्तिक आयुष्यतील प्रश्न देखील आपल्या आवडत्या कलाकारांसोबत शेअर करत. एक हेल्दी रिलेशन त्यातून निर्माण होत असे. त्यामुळे कलाकारांना देखील कायम आपल्या फॅन्सच्या पत्राचा इंतजार असायचा.
===========
हे देखील वाचा : …जेव्हा अभिनेता प्राण यांनी वीस फूट उंचावरून खाली उडी मारली!
===========
दिलीपकुमारला त्या काळात एक पत्र आले होते. या पत्रात त्याने चक्क ॲसिड अटॅक करण्याची धमकी दिली होती. हे पत्र दिल्लीहून एका सो कॉल्ड फॅनने पाठवले होते. त्यात त्याने असे म्हटले की, ”मी तुमच्यावर लवकरच ॲसिड अटॅक करून तुमचा चेहरा विद्रूप करून टाकणार आहे.” हा ॲसिड अटॅक (acid attack) करण्यामागची त्याने तीन कारणे दिली होती. पहिले कारण म्हणजे दिलीप कुमारने एक मुस्लिम असून देखील हिंदू नाव घेतले होते. दुसरे कारण दिलीप कुमार मुस्लिम मुलींसोबत संबंध ठेवून त्यांच्याशी लग्न करत नाहीत.(हा इशारा कदाचित मधुबाला बाबत असावा!) आणि तिसरे कारण असे होते की त्याने यापूर्वी देखील पत्र पाठवून त्या व्यक्तीला पाकिस्तानला जाण्यासाठी मदत करावी असे सांगितले होते.
पण दिलीप कुमारने मदत केली नाही. दिलीप कुमारने या पत्राची सुरुवातीला फारशी दखल घेतली नाही. पण जेव्हा त्याच्या घरच्यांनी आणि मित्रांनी यातील सिरीयस नेस सांगितला तेव्हा त्यांनी बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या पाली हिल या बंगल्याच्या भोवती सुरक्षा वाढवली. दिलीप कुमारच्या गाडीत आता पोलीस कर्मचारी दिसू लागले. दिलीप कुमार जिथे जिथे जाईल तिथे पोलीस कर्मचारीसोबत असायचे.
पण नंतर दिलीप कुमारला ते थोडेसे त्रासदायक वाटू लागले आणि काही महिन्यानंतर त्यांनी सांगितलं, ”आता काही होत नाही. तुम्ही तुमची सुरक्षा काढून घेतली तरी चालेल.” असे म्हणून पोलीस बंगल्याच्या बाहेर पडू लागले. पण त्याच वेळी तिथे ती व्यक्ती ऍसिड (acid attack)ची बॉटल घेऊन दबा धरून थांबली होती. पोलिसांनी लगेच त्या व्यक्तीच्या मानगुटीला पकडले आणि पोलीस चौकीवर नेले. दिलीप कुमारला तिथे बोलावण्यात आले. तो मुलगा काहीच बोलायला तयार नव्हता. तो सारखा रडत होता. पोलिसांनी त्याला पोलीस हिसका दाखवला तरी तो सारखा रडत होत. त्याने पब्लिसिटीसाठी हे काम केले असावे असे पोलिसांना वाटले.
===========
हे देखील वाचा : भारत भूषण यांच्या घरासमोर कुणी ठिय्या आंदोलन केले?
===========
ही बातमी दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे १३ मे १९५५ च्या वर्तमानपत्रात छापून आली होती. या बातमीमुळे तत्कालीन बॉलीवूडमध्ये मोठ्या तणावाचे वातावरण झाले. पण दिलीप कुमारने वातावरण नॉर्मल करण्यासाठी दुसऱ्या दिवशीच मद्रासला चक्क रेल्वेने जाण्याचा निर्णय घेतला आणि दिलीप कुमार रेल्वेने दुसऱ्या दिवशी मद्रासला रवाना झाले. काही पत्रकार त्यांना भेटण्यासाठी रेल्वे स्थानकावर गेले होते. गंमत म्हणजे दिलीप कुमारच्या आत्मचरित्रात या ऍसिड अटॅक (acid attack)चा काहीही उल्लेख नाही हे आश्चर्यच!