Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूर्यासह कलाकारांची मांदियाळी!

Ananya Pandey : अक्षय कुमरच्या ‘केसरी २’ मधील अनन्याचा लूक व्हायरल
यंदाचं वर्ष हे अक्षय कुमारचं आहे असं दिसतंय. गेल्या काही वर्षात कथानकाच्याबाबतीत अक्षय कुमारने वेगवेगळे प्रयोग केले खरे पण ते फारसे यशस्वी झाले नाही. अक्षयचे विनोदी आणि अॅक्शन चित्रपट प्रेक्षकांना फार आवडतात. त्यामुळे जानेवारी २०२५ मध्ये आलेला ‘स्काय फोर्स’ प्रेक्षकांनी आवडीने पाहिला. आता लवकरच तो ‘केसरी २’ (Kesari 2) चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटात आर माधवन आणि अक्षय कुमारसोबत अनन्या पांडे (Anandnya Pandey) दखील विशष भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मिडीयावर चित्रपटातील तिचा लूक व्हायरल झाला आहे. (Entertainment updates)

अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘केसरी २’ (Kesari 2) चित्रपट जालियनवाला बाग गोळीबार या ऐतिहासिक प्रकरणावर आधारित आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असूनयात अक्षय कुमार वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान चित्रपटातील अनन्याचा पांडेचा लूकही समोर आला असून यात ती पांढऱ्या साडीमध्ये हातात फाईल्स घेऊन दिसत आहे. आता अक्षय कुमार वकिल असल्यामुळे त्याच्या विरोधी वकिल ती असेल असा अंदाज बांधला जात आहे. (Bollywood news)
===========================
हे देखील वाचा: Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
===========================
दरम्यान, ‘केसरी चॅप्टर २’च्या निमित्ताने पहिल्यांदाच अनन्या पांडे अक्षय कुमार आणि आर माधवन (R. Madhavan) यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. इतकंच नाही तर अक्षय आणि माधवनही पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार असल्यामुळे चाहते उत्सुक आहेत. केसरी चॅप्र २ चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतीय स्वातंत्र्यसेनानी बॅरिस्टर सी. शंकरन यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षय त्यांचीच भूमिका साकारत आहे. 9Bollywood upcoming movies 2025)