Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ashok Saraf : “सुंदर आणि नाजुक अशी कॉमेडी असली पाहिजे”

 Ashok Saraf : “सुंदर आणि नाजुक अशी कॉमेडी असली पाहिजे”
मिक्स मसाला

Ashok Saraf : “सुंदर आणि नाजुक अशी कॉमेडी असली पाहिजे”

by रसिका शिंदे-पॉल 29/03/2025

आत्ताच्या काळात कोणत्याही व्यक्तीवर, घटनेवर विनोद केला तर नक्कीच महागात पडू शकतं. कधी कुणाच्या भावना दुखावतील याचा काही नेम नाही. पण, एक काळ मराठी चित्रपटसृष्टीत केवळ विनोदी कलाकारांनी आपल्या निखळ विनोदामुळे गाजवला होता. यात दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांसारख्या दिग्गजांनी आपल्या निखळ विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता मात्र तसं चित्र राहिलेलं नाही. त्यामुळे सध्याच्या स्टॅडअप कॉमेडीबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आपलं मत मांडलं आहे. (Marathi movies)

लवकरच अशोक सराफ (AShok Saraf) आणि वंदना गुप्ते यांचा ‘अशी ही जमवाजमवी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने अशोक सराफ यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या  मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले की, ‘आम्ही जी कॉमेडी करतो ती लोकांना पटेल का? या विचारानेच करतो. निदान मी तरी करतो. हे लोकांना पटणार आहे किंवा नाही याचा विचार करावाच लागतो. कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार निराळा असतो. आज मी जे करत आहे ते काही लोकांना आवडत नसेल सुद्धा किंवा काही लोकं जे करतात ते मलासुद्धा आवडणार नाही, असं होऊ शकतं. त्यामुळे ते एकमेकांना आवडू शकेल, हा अंदाजच असतो”.

===========================

हे देखील वाचा: Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द

===========================

पुढे ते म्हणाले (AShok Saraf) की, “हा अंदाज खरा ठरवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याकडून केला जातो आणि तो करायलाही पाहिजेच असं मला वाटतं. आम्ही बाकी कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. भूमिका आणि पात्राचा विचार अधिक केला जातो. तुमची भूमिका किंवा तुमचं पात्र काय म्हणतंय? हे जास्त महत्त्वाचं असतं. त्या पात्राला अनुसरून तुमची कॉमेडी असली पाहिजे. एखाद्या गंभीर भूमिकेसाठी काहीतरी वेगळीच कॉमेडी असेल तर त्याला काही एक अर्थ नसतो. आपल्याबरोबर कोण आहे हेसुद्धा विचारात घेतलं पाहिजे. त्याला योग्य वाटेल अशी कॉमेडी केली पाहिजे. कॉमेडी वाटते तितकी सोप्पी नाही. लोकांना वाटतं की, कॉमेडी सहज केली जाते, पण तसं नाहीये. लोकांना हसवणं फार कठीण आहे आणि सतत हसवणं हेही कठीण आहे. तसंच कॉमेडीचा प्रभाव शेवटपर्यंत ठेवणं हे त्याहून कठीण आहे. त्यामुळे कॉमेडी विचाराने आणि लोकांना विचारात घेऊनच केली पाहिजे”. (Bollywood news)

कॉमेडी कशी असावी याबद्दल बोलताना (Ashok Saraf) ते म्हणाले की, “मी केलेली कॉमेडी ही सर्व वयोगटातील लोकांना आवडणारी आहे. त्यामुळेच माझे लहानांपासून मोठयांपर्यंत सगळेच चाहते आहेत. मी घाणेरडं काही बोलत नाही की, जेणेकरून लोकांना वाटेल हे काय आहे, अशी कॉमेडी मला पसंत नाही आणि मी ती करतच नाही. असं काही असेल तर आम्ही ते काढूनच टाकतो. स्वच्छ, सुंदर आणि नाजुक अशी कॉमेडी असली पाहिजे”. (Entertainment news)

अशोक सराफ यांच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ‘अशी ही जमवाजमवी’, ‘पुन्हा एकदा साडे माड़े तीन’ या चित्रपटातून भेटायला येणार आहेत. याशिवाय त्यांचं आणखी एक नाटक यावं अशी इच्छा देखील प्रेक्षक व्यक्त करत आहेत. (Ashok Saraf movies)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashok saraf Bollywood Bollywood Chitchat Bollywood trending news Celebrity Celebrity News Entertainment Marathi Movie standup comedy
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.