…आणि धर्मेंद्र यांनी परस्परांच्या सिनेमाच्या मुहूर्ताला उपस्थित राहून क्लॅप दिली!
जे. ओम प्रकाश दिग्दर्शित ‘आप की कसम’ (Aap ki kasam) हा सुपरहिट सिनेमा १७ एप्रिल १९७४ या दिवशी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात राजेश खन्ना, मुमताज आणि संजीव कुमार यांच्या प्रमुख भूमिका होत्या. राजेश खन्नाच्या सुपरहिट चित्रपटाच्या यादीत या सिनेमाचा समावेश होतो. राजेश खन्ना आणि संजीव कुमार यांचा हा एकमेव चित्रपट आहे. हे दोघे साठच्या दशकाच्या सुरुवातीला मुंबईमध्ये रंगमंचावर काम करत होते. तिथे या दोघांमध्ये एक सुप्त संघर्ष असायचा. त्यामुळेच कदाचित हे दोघे या एकमेव चित्रपटात एकत्र आले असावेत. (Aap ki kasam)
या सिनेमातील दोघांच्या एटीट्यूड बद्दल खूप काही आजही बोललं जातं,लिहिलं जातं. यातला किती भाग खरा आणि किती खोटा हे माहिती नाही पण दोघांमध्ये फारसं सख्य नव्हतं ही गोष्ट खरी आहे. आज आपण या सिनेमाच्या मुहूर्ताच्या वेळी कोणता अभिनेता उपस्थित होता आणि त्याचे या सिनेमाशी काय कनेक्शन होते ते पाहू. ‘आप की कसम’ (Aap ki kasam) या चित्रपटाचा मुहूर्ताचा शॉट देताना ज्यांनी क्लॅप दिली होती तो अभिनेता कोण? आपल्या हिंदी सिनेमांमध्ये मुहूर्ताच्या शॉटला खूप महत्त्व आहे अगदी गुरुजींकडून शुभ दिवस शोधला जातो त्या दिवसातील शुभ मुहूर्ताची वेळ ठरली जाते. त्या वेळेला विधिवत पूजा होते आणि शुभ समयी पहिला शॉट घेतला जातो. हा शॉट ज्यांच्यावर घेतला जातो ते तर महत्त्वाचे असतातच पण हा शॉट देताना जी व्यक्ती क्लॅप देते ती देखील तितकीच महत्त्वाची असते. (Aap ki kasam)
‘आप की कसम’ (Aap ki kasam) या चित्रपटाच्या मुहूर्ताला क्लॅप दिली होती अभिनेता धर्मेंद्र यांनी. धर्मेंद्रचा खरंतर या सिनेमाशी काही संबंध नव्हता पण जे.ओम प्रकाश यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते. धर्मेंद्रने जे. ओम प्रकाश यांच्या सोबत आई मिलन कि बेला (१९६४), आये दिन बहारके (१९६६), आया सावन झूम के (१९६९), आसपास (१९८०) या सिनेमात काम केले होते. धर्मेंद्र आणि राजेश खन्ना हेदेखील चांगले मित्र होते.या दोघांचे एकत्रित सिनेमे तसे कमी आहेत. या दोघांचा पहिला एकत्रित सिनेमा होता ‘खामोशी’(१९६९) पण यात या दोघांचा एकत्र शॉट एकही नव्हता. (Aap ki kasam)
ऐंशीच्या दशकात, राजपूत, धरम और कानून, मुहोब्बत कि कसम हे सिनेमे आले. ‘आप कि कसम’ (Aap ki kasam) या सिनेमाच्या मुहूर्ताला उपस्थित राहून धर्मेंद्र यांनी क्लॅप दिली आणि गमंत म्हणजे याचवर्षी प्रदर्शित झालेल्या धर्मेंद्रच्या ‘दोस्त’ या सिनेमाच्या मुहूर्त प्रसंगी सुपरस्टार राजेश खन्ना उपस्थित होता आणि त्यानेच ‘दोस्त’ या सिनेमाला क्लॅप दिली होती. अशा रीतीने दोघांनी एकमेकाच्या सिनेमाला क्लॅप देवून फिट्टम फाट केली. ‘दोस्त’ सिनेमाच्या मुहूर्ताला राजेश खन्ना उपस्थित राहण्याचे दुसरे कारण म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक दुलाल गुहा यांच्या या आधीच्या सिनेमाचा म्हणजेच ‘दुश्मन’ चा नायक राजेश होता.
दुलाल गुहा दिग्दर्शित ‘दोस्त’ या चित्रपटात धर्मेंद्र, हेमामालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. आज हा चित्रपट विस्मृतीत गेला असला तरी ‘गाडी बुला रही है सिटी बजा रही है’ हे गाणं आजही अंताक्षरीच्या वेळी हमखास आठवले जाते. या दोन्ही सिनेमातील आणखी एक छोटे कनेक्शन या दोन्ही सिनेमाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती! जे. ओम प्रकाश यांनी १९६० सालच्या ‘आस का पंच्छी’ या सिनेमापासून आपल्या फिल्मयुग या चित्रसंस्थे मार्फत चित्रनिर्मिती सुरु केली. (Aap ki kasam)
============
हे देखील वाचा : राजेश खन्ना आणि अमिताभ या दोन सुपरस्टार्सला अक्षरशः डांबून शूटिंग पूर्ण केले!
============
१९७४ सालचा ‘आप की कसम’ (Aap ki kasam) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा होता. त्यांच्या साठी ‘अ’ हे अक्षर खूप लक्की होते. त्यामुळे त्यांच्या सर्व सिनेमांची नावे ‘अ’ या अद्याक्षराने सुरु होत होती. सत्तरच्या दशकात त्यानी अनेक सिनेमे दिग्दर्शित केले. गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आंधी’ या सिनेमाची निर्मिती जे.ओम प्रकाश यांचीच होती. जे. ओम प्रकाश यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी ७ ऑगस्ट२०१७ रोजी अखेरचा श्वास घेतला.आजच्या तरुण पिढीला जे.ओम प्रकाश यांची ओळख सांगायची तर ऋतिक रोशन याचे ते आजोबा होते. (Aap ki kasam)