‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
……आणि रफीचा हा शिष्य मोठा गायक बनला!
‘मलिका-ए-तरन्नूम’ नूरजहां हिच्यासोबत मोहम्मद रफी(Mohammed Rafi) यांनी एक गाणं गायलं होतं. गाण्याचे बोल होते ‘यहा बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है…’ चित्रपट होता १९४७ सालचा ‘जुगनू’ पडद्यावर दिलीप कुमार आणि नूरजहां यांनी हे गाणं साकारलं होतं. या सिनेमाला हिंदुस्थानात प्रचंड लोकप्रियता लागली होती. रफी(Mohammed Rafi) सोबत नूरजहां यांचे हे एकमेव गाणं होतं कारण १९४७ मध्ये झालेल्या भारताच्या फाळणीमुळे नूरजहां पाकिस्तानात निघून गेली. पण या गाण्याची जादू मात्र कायम राहीली.
या गाण्यामुळे भारतातील एक बारा-तेरा वर्षाचा मुलगा रफीचा(Mohammed Rafi) प्रचंड चाहता होता. दिवस-रात्र तो हे गाणे ऐकत होता. गुणगुणत होता. तेंव्हाच त्याने ठरवले आपण रफीसारखे गायक व्हायचे. त्याची इच्छा झाली की आपण एकदा प्रत्यक्ष रफी यांना भेटावे, त्यांना सांगावे तुमचे गाणे मला खूप आवडते. मला गाणे शिकवा. नूरजहां तर आता भारतात नाहीये त्यामुळे किमान गायकाला तरी भेटावे अशी त्याची इच्छा होती म्हणून त्याच्या वडिलांना त्याने आपली इच्छा बोलून दाखवली.
वडिलांनी त्यांच्या ड्रायव्हरला सांगितले या मुलाला रफीची भेट घालून दे. मोहम्मद रफी(Mohammed Rafi) त्यावेळी भेंडी बाजारच्या जवळ राहत होते. तो काळ मोठा कठीण होता. फाळणीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडले होते अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये भेंडी बाजारसारखे एरियात लहान मुलाला घेऊन जाणे ड्रायव्हरला योग्य वाटलं नाही. पण त्या मुलाने खूपच हट्ट धरल्यामुळे तो रफीकडे घेऊन गेला.
घराचे दार वाजवल्यानंतर एक लुंगी आणि बनियन घातलेले गृहस्थ बाहेर आले त्या मुलाने त्या व्यक्तीला सांगितले की, ”मला रफी साहेबांना भेटायचे आहे मला त्यांची गाणी प्रचंड आवडतात.” त्या बारा वर्षाच्या लहानग्या मुलाचे ते निरागस बोलणे ऐकून रफीने त्यांना आत बोलावले आणि त्या मुलाला सांगितले, ”मी स्वतः रफी(Mohammed Rafi) आहे. बोल काय पाहिजे तुला?” आता मात्र तो लहानगा मुलगा थोडासा घाबरला त्यावर रफी म्हणाले, ”घाबरू नकोस तुला गायची आवड आहे का?” त्यावर तो मुलगा गडबडला. आता गायला सांगतात की काय? म्हणून खोटेच म्हणाला, ”नाही तसे नाही. माझा मोठा भाऊ चांगले गातो.” त्यावर रफी म्हणाले, ”उद्या तुझ्या मोठ्या भावाला आणि वडिलांना घेऊन तू ये.”
त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो मुलगा आपल्या वडिलांना घेऊन रफी(Mohammed Rafi) साहेबांकडे गेला आणि सांगितले “काल मी जरा घाबरलो होतो. नर्व्हस होतो. त्यामुळे तुम्हाला खोटं सांगितलं. खरं तर माझा मोठा भाऊ नाही तर मीच गाणी गातो. आणि मला तुमचा शिष्य व्हायचे आहे!” एका दमात त्याने सांगून टाकले. रफीला त्या मुलाचा इनोसंटनेस खूप आवडला त्यांनी त्या मुलाला आपला शागीर्द बनवले आणि त्या मुलाची रफीकडे व्यवस्थित शिकवणी सुरू झाली. पुढे हा मुलगा रफीच्या तालमीत चांगला तयार झाला.
======
हे देखील वाचा : प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा..!
======
१९५७ साली मर्फी सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये तो भारतात पहिला आला आणि नंतर त्याला हिंदी सिनेमात मोठा ब्रेक मिळाला. एका पाठोपाठ एक चांगली गाणी त्याची येत गेली आणि रफीचा हा शिष्य एक मोठा गायक बनला. आज रफी(Mohammed Rafi) नाही आणि त्यांचा शिष्य देखील नाही पण या शिष्याच्या गाण्यांचा एक चाहता वर्ग नक्कीच आहे. विशेषतः भारताच्या स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिन या शिष्याने गायलेल्या गाण्यांनी आज देखील आपला देश राष्ट्र प्रेमाने भारावला जातो. तुमच्या लक्षात आला का हा रफीचा शिष्य? हा गायक होता महेंद्र कपूर!
साठ आणि सत्तरच्या दशकात तो प्रमुख गायक होता. नीले गगन के तले धरती का प्यार (हमराज), चलो इकबार फिर से अजनबी बन जाये हम दोनो (गुम्रराह) बीते हुये लम्हो कि कसक(निकाह), संसार कि हर शय का इतना हि फसाना है (धुंद), लाखो है यहा दिलवाले (किस्मत),कब तलक शम्मा जली (पेंटर बाबू) हि त्यांची गाणी आणि मां शेरोवाली हि भक्ती गीते खूप गाजली. रफीचा(Mohammed Rafi) हा शिष्य मोठा गायक बनला!