Amitabh Bachchan : नेपोटिझमवरून बिग बींनी घेतली अभिषेकची बाजू,म्हणाले..

Ranbir Kapoor : ‘अॅनिमल’मधील त्या सीनसाठी रणबीर कसा तयार झाला?
चित्रपटांच्या या ग्लॅमरस जगात आपलं फेम टिकवून ठेवण्यासाठी बऱ्यावेळा कलाकारांना आऊट ऑफ द बॉक्स जाऊन काही भूमिका कराव्या लागतात. स्त्री कलाकार असेल तर तिला हॉट सीन्स देणं किंवा मग बोल्ड फोटोशूट करणं असं काहीसं करावं लागतं. आणि पुरुष कलाकार असेल तर मग तगडे अॅक्शन सीन्स देणं किंवा कायमस्वरूपी लक्षात राहील असा खलनायक साकारणं; जे अभिनेता अर्जून कपूर याने ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात खलनायक साकारुन आत्तापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिकांपेक्षा हटके भूमिका साकारत प्रेक्षकांसह मेकर्सनाही स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडलं होतं. अगदी त्याचप्रमाणे ‘अॅनिमल’ चित्रपटात Ranbir Kapoor ने साकारलेलं कॅरेक्टर आजवरच्या त्याचा रोमॅंटिक आणि क्यूट भूमिकांच्या पलीकडे जाऊन प्रचंड Aggresive होतं जे प्रेक्षकांनाही भावलं. या चित्रपटात रणबीरने जो न्यूड सीन दिला होता त्याबद्दल दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी एक जबरदस्त किस्सा सांगितला आहे. जाणून घेऊयात… (Animal Movie)
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना अभिनित ‘अॅनिमल’ या चित्रपटाचा समावेश झाला. २०२३ साली आलेल्या या चित्रपटाने रणबीर कपूरची एक वेगळीच अभिनयाची छाप त्याच्या चाहत्यांच्या मनावर उमटवली. अॅनिमलमधील Violence हा जितका चर्चेचा विषय ठरला होता तितकीच चर्चा रणबीरच्या न्यूड वॉकची झाली. संदीप वांगा यांनी कोमल नाहता यांना दिलेल्या मुलाखतीत या न्यूड सीनसाठी रणबीरने एका क्षणात होकार दिला होता असं सांगितलं. (Bollywood Movie update)

Sandeep Reddy Vanga म्हणाले की, “सुरुवातीला रणबीरचा तो न्यूड सीन त्याला प्रोस्थेटिक्स लावून करणार होतो. ठरल्याप्रमाणे रणबीरचं माप घेऊन प्रोस्थेटिक्स त्याच्या मांड़ीला लावण्यात आले, पण त्या प्रोस्थेटिक्समुळे रंगीत तालीम करताना रणबीरला नीट चालताच येत नव्हतं. तो सीन तर शूट करायचा होताच. मग मी शेवटी रणबीरला सांगितलं की तुला आऊट ऑफ फोकस ठेवून हा सीन शूट करावा लागेल आणि आश्चर्याची बाब म्हणजे क्षणार्धात रणबीरने होकार दिला. मुळात तो इतका मोठा स्टार असल्यामुळे या सगळ्या गोंधळात तो वैतागणं अपेक्षित होतं किंवा प्रोस्थेटिक्स शिवाय तो न्यूड सीन देणार नाही असं मला वाटलं होतं. पण त्याने दिग्दर्शक म्हणून माझा कायम मान राखला आणि त्या सीनसाठी होकार दिला”. (Untold Stories)

“अॅनिमल चित्रपटाच्या शुटींगदरम्यान रणबीरने मला इतकंच सांगितलं होतं की दिग्दर्शक म्हणून तु जे सांगशील ते मी करेन आणि चित्रपट चांगला व्हावा यासाठी तुला जे हवं आहे ते तु कर मी तुला सपोर्ट करेन. आणि त्यामुळेच आमच्या दिग्दर्शक आणि अभिनेता या बॉंन्डमुळे रणबीर त्या सीनसाठी लगेचच तयार झाला”, असं देखील वांगा म्हणाले.(Ranbir Kapoor)
============
हे देखील वाचा : Crazxy Movie Review : सोहम शहाचा ‘क्रेजी’ आहे तरी कसा?
============
दिग्दर्शक आणि अभिनेत्यामध्ये जर असा बॉंड असेल तर नक्कीच एकापेक्षा एक सरस चित्रपट नक्कीच येऊ शकतील यात शंका नाही. ‘अॅनिमल’ चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं असून या चित्रपटाचा दुसरा भाग ‘अॅनिमल पार्क’ कधी येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. (Animal Park Movie)