
‘फुलवंती’नंतर २ वर्षांनी Prajakta Mali हिचं कमबॅक!
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शो ची सुत्रसंचालक आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) २०२४ मध्ये आलेल्या ‘फुलवंती’ (Phulwanti Movie) चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात अभिनयासह तिने निर्माती म्हणूनही चित्रपटाची धुरा सांभाळली होती. २ वर्ष कुठल्याही चित्रपट, मालिका किंवा सीरीजमध्ये प्राजक्ता न दिसल्यामुळे ती कुठे गायब झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला. आता मात्र, याचं उत्तर समोर आलं असून लवकरच प्राजक्ता माळी एका वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) हा देखील बराच काळ अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर दिसला नाही. आणि तो आणि प्राजक्ता माळी एकत्र ‘देवखेळ’ (Devkhel Web Series) या मराठी वेब सीरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. ‘रानबाजार’ नंतर प्राजक्त सीरीजमध्ये काम करताना दिसणार आहे. तर, अंकुश याची ही अभिनेता म्हणून पहिलीच सीरीज असणार आहे.
================================
================================
दरम्यान, अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांनी याआधी २०२२ मध्ये ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आणि झी ५ वरील ‘देवखेळ’ या सीरीजमध्ये दोघे प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकणार आहेत. तसेच, दुसरीकडे अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ हा चित्रपट देखील याच वर्षात रिलीज होणार आहे. (Marathi Web Series 2026)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi