Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

जेव्हा Nagraj Manjule यांचा राष्ट्रीय पुरस्कार चोरीला गेला होता…

मराठी नाटक पाहून भारावली Tabu, कलाकारांचं केलं तोंडभरून कौतुक!

Karishma Kapoor ने ‘दिल तो पागल है’ मध्ये माधुरी दीक्षितसोबत

Aranya Movie Teaser: हार्दिक जोशीच्या ‘अरण्य’ सिनेमाचा दमदार टीझर रिलीज प्रदर्शित

Bigg Boss 19: सलमान खानच्या ‘बिग बॉस 19’ चे घर

Dastak : राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मदनमोहन यांचा चित्रपट

Dada Kondke : “मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन…”

Vidya Balan नाही तर ‘या’ अभिनेत्री असत्या ‘परिणीता’मधील लोलिता!

Rajinikanth  आणि मिथुन चक्रवर्ती ३० वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार?

Kareena Kapoor : ‘जब वी मेट’ चित्रपटात ‘गीत’च्या भूमिकेत लागलेली

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Apne Rang Hazar : ‘अपने रंग हजार’ची ५० वर्ष; रंगत आली नाही हो….

 Apne Rang Hazar : ‘अपने रंग हजार’ची ५० वर्ष; रंगत आली नाही हो….
कलाकृती विशेष

Apne Rang Hazar : ‘अपने रंग हजार’ची ५० वर्ष; रंगत आली नाही हो….

by दिलीप ठाकूर 26/04/2025

सुपर नि सुपर्ब हिट पिक्चरचीच नायक नायिका यांची जोडी घेऊन आणखीन एक चित्रपट निर्माण करायचा ही खेळी प्रत्येक वेळी यशस्वी ठरेलच असे नाही. चित्रपट रसिक पडद्यावर कलाकार पाहायला नव्हे तर चित्रपटाकडून पैसा वसूल मनोरंजनाची अपेक्षा ठेवतात. त्यांना गोष्ट पाहायची असते. आजच्या ग्लोबल युगात कन्टेन्ट महत्वाचा. (Bollywood classic movies)

‘अनहोनी’ ( १९७३) हा रहस्यरंजक म्युझिकल चित्रपट सुपर हिट ठरल्यावर दिग्दर्शक रवि टंडनने त्याच चित्रपटातील संजीवकुमार व लीना चंदावरकर या जोडीला घेऊन आपल्याच किंग्ज प्राॅडक्सन्स या बॅनरखाली ‘अपने रंग हजार’ या चित्रपटाची निर्मिती केली. विशेष उल्लेखनीय गोष्ट, ‘अनहोनी’ मधील कामिनी कौशल ( त्यात नायिकेची आई होती, आता नायकाच्या आईच्या भूमिकेत. काही बदल हवाच. ), बिंदू, असरानी, पेंटल, मॅकमोहन, रणवीर राज या चित्रपटात पुन्हा. याशिवाय डॅनी डेन्झोपा, हेलन, गुरबचन सिंग, जानकीदास, सुधीर, सत्येन कप्पू इत्यादी. (Apne Rang Hazaar movie)

संजीवकुमार व लीना चंदावरकर जोडी छान जमलेली. त्यातून काही गाॅसिप्सदेखिल. त्यांच्या नात्यात जवळीक वाढतेय वगैरे. जोडीचा राजा नवाथे दिग्दर्शित ‘मनचली’ ( १९७४) चित्रपटात लोकप्रिय. म्हणून ‘अपने रंग हजार’ चित्रपट रसिकांनी स्वीकारायला हवा असेच काही नाही. चित्रपटात पाहण्यासारखे काही ‘रंग’तदार हवे ना? त्याचाच या चित्रपटात अभाव. (Entertainment news)

चित्रपटाच्या पहिल्याच दृश्यात पार्टी. आणि त्यात नायक ( संजीवकुमार) नायिकेला ( लीना चंदावरकर) सांगत असतो, अनेक युवती माझ्या सहवासात येतात, पण मला मात्र प्रश्न पडतो, त्या माझ्या श्रीमंतीकडे पाहतात की माझ्याकडे? त्यांना माझा पैसा महत्वाचा वाटतो की मी? तुझ्याकडे पाहून मला वाटते, तू मला समजून घेशील…. आणि मग चित्रपटाची श्रेयनामावली सुरु होते. के. के. शुक्ला यांच्या पटकथेवरील हा नाट्यमय चित्रपट फार रोमांचक ठरत नाही.आणि संजीवकुमार व लीना चंदावरकर जोडीच्या नावावर आणखीन एक फ्लॉपचित्रपट जमा झाला. पद्मनाभ दिग्दर्शित ‘इमान’हा या जोडीचा आणखीन एक फसलेला चित्रपट. (Bollywood tadaka)

‘अपने रंग हजार’ची एकच गोष्ट लोकप्रिय ठरली. अंजान यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत.मेरी काली कलुटी के नखरे बडे ( पार्श्वगायक किशोरकुमार) हे संजीवकुमार लीना चंदावरकरची छेड काढणारे गाणे खूपच लोकप्रिय झाले.दोघांच्या छान जमलेल्या रुपेरी केमिस्ट्रीने गाण्यात रंगत आली. किशोरकुमार अशा उडत्या गाण्यात खूपच मोकळीक घेई. त्यामुळेच त्यात जास्त रंग भरे. गंगा मे डूबा ना जमूना मे डूबा ( पार्श्वगायिका लता मंगेशकर) गाण्यात लीना चंदावरकरने प्रेम भावना उत्तम साकारल्या. (Lata Mangeshkar)

दिग्दर्शक रवि टंडनच्या कामाची क्षमता एकदम भारी होती. ( रवि टंडन म्हणजे रविना टंडनचे पिता) त्यांचे एकाच वर्षी दोन चित्रपट पडद्यावर आणण्याची क्षमता तर बघा, १९७४ साली मजबूर ( अमिताभ बच्चन, परवीन बाबी, प्राण) आणि निर्माण ( नवीन निश्चल व अनुपमा). यातील ‘मजबूर’ हा सलिम जावेद यांच्या पटकथेवरील उत्तरोत्तर रंगत आलेला चित्रपट. १९७५ साली अपने रंग हजार व खेल खेल मे ( ऋषि कपूर, नीतू सिंग, राकेश रोशन, इफ्तेखार, देवकुमार). (Entertainment trending news)

त्यानंतरही आपली ही खासियत त्यांनी कायम ठेवली. आणखीन एक विशेष, खेल खेल मे या रहस्यरंजक म्युझिकल सुपरहिट चित्रपटानंतर त्यातीलच कलाकाराना घेऊन त्यांनी झूठा कहीं का ( १९७९) हा चित्रपट पडद्यावर आणला, पण नाही हो खेल खेल मे चित्रपटाची सर. आपल्या सुपरहिट चित्रपटातील जोडी पुन्हा घेऊन चित्रपट निर्माण करण्याचा मोह रवि टंडन का टाळू शकले नाहीत? येथे दिग्दर्शक दिसतो असे मुळीच म्हणता येणार नाही. बरं असे करणारे रवि टंडन एकटेच दिग्दर्शक नाहीत, तर आणखीनही आहेत. जमलेली टीम कायम ठेवावी अशी त्यामागची व्यावसायिक रणनीती असते आणि ती कधी यशस्वीही ठरते… (Bollywood)

========

हे देखील वाचा : काय तर म्हणे, सैफ व कुणाल कपूरचा “ज्वेल थीफ”

========

सगळेच रंग सारखेच नसतात.काही फक्त नावापुरतेच असतात. अपने रंग हजारसारखे. या चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यावर फोकस हवाच…. मुंबईत हा चित्रपट २५ एप्रिल १९७५ रोजी प्रदर्शित झाला.मेन थिएटर अप्सरामधून काही मोजक्याच आठवडय़ात या चित्रपटाचा ‘रंग’ उडाला. (old movies untold stories)

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor apne rang hazaar Bollywood Bollywood Chitchat bollywood classsic movies bollywood update Entertainment leena chandavarkar sanjeev kumar untold stories
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.