हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची अद्भुत कहाणी!
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळ्या आशयांवर आधारित चित्रपट येत असून प्रेक्षकही त्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत…आणि आता लवकरच मराठीत मर्डर मिस्ट्री या प्रकारातील ‘असंभव’ हा चित्रपट भेटीला येणार आहे… नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या रहस्यपटात प्रिया बापट, मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत… महत्वाचं म्हणजे ‘आम्ही दोघी’ (२०१८) चित्रपटानंतर प्रिया आणि मुक्ता एकत्र झळकणार आहेत…

दरम्यान, ‘असंभव’ या चित्रपटाचं दिग्दर्शन सचित पाटील आणि पुष्कर सुधाकर श्रोत्री यांनी केलं असून क्षणभर विश्रांती नंतर हा सचित पाटीलचा दुसरा दिग्दर्शकीय चित्रपट असणार आहे… या चित्रपटाचं चित्रीकरण नैनीतालच्या थंडीमध्ये करण्यात आलं असून नैनितालमध्ये चित्रीत झालेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. तसेच, या चित्रपटाची निर्मिती सचित पाटील, नितीन वैद्य, शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई करणार आहेत… या चित्रपटाच्या दिग्दर्शकिय अनुभवाबद्दल बोलताना सचित म्हणाला की, “‘असंभव’ ही अशी एक कथा आहे, जी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल. यात थरार आहे, भावना आहेत, प्रेमकहाणी आहे आणि गूढतेने भरलेली रचना आहे. हा चित्रपट लोकांच्या मनात खोलवर उतरावा, यासाठी आम्ही प्रत्येक फ्रेमसाठी मेहनत घेतली आहे.”
================================
=================================
तसेच,या चित्रपटात मराठीतील नामंवत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे,प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी अनुभवण्याची संधी या चित्रपटात प्रेक्षकांना मिळणार आहे. असंभव चित्रपट २१ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे… दरम्यान, गेले अनेक वर्ष मराठी चित्रपटापासून लांब झालेल्या प्रिया बापट हिचा ‘बिन लग्नाची गोष्ट’ चित्रपटानंतर हा दुसरा मराठी चित्रपट असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi