Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका

Ashi Hi Banwa Banwi :चित्रपटातील लीलाबाई काळभोर यांचा बंगला नेमका आहे तरी कुठे?
मराठी चित्रपटसृष्टीतला बेस्ट विनोदी चित्रपट असं कुणी विचारलं की आपसुकच अशी ही बनवाबनवी हेच नाव येतं… आजही ३० वर्ष उलटून गेली तरी प्रेक्षक हा चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात… चित्रपटातील प्रत्येक संवाद हा आयकॉनिक आहे… अलीकडच्या काळात त्याचे मीम्सही फार व्हायरल झाले… १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रसिक-प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलंच, पण त्यासोबतच महाराष्ट्राला खळखळून हसवलं. चित्रपट तर आयकॉनिक आहेच पण तुम्हाला माहित आहे का या चित्रपटातील लीलाबाई काळभोर हा बंगला नेमका आहे तरी कुठे? चला तर जाणून घेऊयात…

तर, मराठीतील कल्ट चित्रपट या कॅटेगरीत समाविष्ट झालेल्या ‘अशी ही बनवा बनवी’चं शुटिंग पुण्यात झालं. आणि महत्वाचं म्हणजे हे चार अवलिया मित्र ज्या लीलाबाई काळभोर यांच्या पाषाण रोडवरच्या बंगल्यात भाडोत्री म्हणून राहायला गेले होते तो पाषाण रोड आजही पुण्यात आहे. पण, ज्या बंगल्यात शुटिंग झालं, तो लीलाबाई काळभोर यांचा बंगला हा खरा बंगला नाही तर सेट होता…
================================
=================================
शिवाय, अशोक सराफ आणि अश्विनी भावेंची लव्हस्टोरी ज्या दुकानात फुलली, ते दुकान मात्र खरंखुरं अस्तित्वात होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते सचिन पिळगांवकरांच्या मित्राचं ते दुकान होतं. इतकंच नाही तर, चित्रपटातील काही सीन्स हे पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मुख्य बिल्डिंगमध्ये शूट केले होते. आजही ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आजच्या भाषेत सांगायचं झालं तर Stress Buster आहे… या चित्रपटाने बरेच रेकॉर्ड मोडले…आणि कायमस्वरुपी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi