Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

Ashok Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अँटी हिरो’ ट्रेण्ड सेट करणारे ‘दादामुनी’
भारतीय चित्रपटसृष्टीत एकाहून एक सुपरस्टार होऊन गेले… त्यापैकीच एक नाव म्हणजे कुमुद कुमार गांगूली… कन्फ्युज झालात? अहो म्हणजे आपले अशोक कुमार (Ashok Kumar) अर्थात दादामुनी… ‘अँटी हिरो’ अशी ओळख इंडस्ट्रीत निर्माण करणाऱ्या अशोक यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य कायमच प्रेक्षकांना भावलं… मुळ बंगाली असणाऱ्या अशोक यांनी हिंदीत मत्र ८०-९०चं दशक आपल्या उत्कृष्ट अभिनयानं गाजवलं… आज त्यांच्या पुण्यतिथी दिनी जाणून घेऊयात काही खास किस्से…
अशोक कुमार यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९११ मध्ये बिहारच्या भागलपूरमध्ये एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. अशोक यांचे वडिल कुंजलाल गांगुली वकिल होते… परंतु, वकीली पेशा न निवडता अशोक यांनी कॅमेरा निवडला आणि अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं… अशोक कुमार यांनी १९३६ मध्ये ‘जीवन नैय्या’ या चित्रपटातून फिल्मी दुनियेत एन्ट्री घेतली… (Entertainment News)

अशोक कुमार यांच्याबद्दल सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी एका मुलाखतीत किस्सा सांगितला होता… किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी या मुलाखतीत आपले मोठे बंधु अशोक कुमार हेच त्यांच्य अभिनयासह गायनाची प्रेरणादेखील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं… कारण बालपणीपासूनच अशोक यांनी किशोर यांना गायनाचे धडे दिले होते… विशेष म्हणजे अशोक, किशोर आणि अनुप कुमार या तिन्ही भावांनी ‘चलती का नाम गाडी’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं…

परंतु, तुम्हाला माहित आहे का अशोक कुमार यांना अभिनेता नाही तर दिग्दर्शक व्हायचं होतं… चित्रपटात डेब्यु करण्याआधी अशोक यांनी १९३४ मध्ये मुंबईच्या न्यू थिएटरमध्ये लॅबोरेटरी सहायक म्हणून अर्थार्जनाची सुरुवात केली होती. त्यानंतर शशिधर मुखर्जी यांनी त्यांना बॉम्बे टॉकीज स्टुडिओमध्ये काम करण्यासाठी बोलावले आणि तिथूनच त्यांच्या फिल्मी करिअरचा श्रीगणेशा झाला.. पण ‘जीवन नैय्या’ हा चित्रपट मिळण्यामागेही एक किस्सा आहे… तो असा की आधी या चित्रपटात मुख्य नायक नज्म उल हसन होते… मात्र, ते अचानक आजारी पडल्याने अशोक कुमार यांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. पुढे अशोक कुमार यांनी ‘कंगन’, ‘बंधन’ आणि ‘झूला’, ‘पडोसन’, ज्वेल थीफ’, ‘बंदीनी’, ‘किस्मत’, मिली’, ‘महाल’, ‘छोटी सी बात’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली…
================================
================================
अशोक कुमार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली नायिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देविका राणी ते मीना कुमारीपर्यंत (Meena Kumari) अनेक नायिकांसोबत काम केलं. शिवाय, बॉलिवूडमध्ये स्वत:ची खास शैली विकसित करणाऱ्या अशोक कुमार यांनी ‘अँटी हिरो’च्या पात्रांचा ट्रेंड सुरु केला. १९४३ मध्ये रिलीज झालेल्या ‘किस्मत’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा ‘अॅंटी हिरो’ची भूमिका साकारली होती… अशोक यांनी मालिकेतही काम केलं असून अनेक चित्रपटांची निर्मितीही केली आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi