Govinda : “जेम्स कॅमरॉनच्या चित्रपटाला ‘अवतार’ नाव मीच दिलं”

Ashok Saraf : “आजही लक्ष्यावर केलेला ‘तो’ चित्रपट मी नाकारल्या खंत…”
ठराविक चित्रपट किंवा कॅरेक्टर हाच कलाकार करु शकतो अशी कल्पना आपण करतो. उदाहरणार्थ खलनायकाच्या भूमिकेत Nilu Phule, कुलदीप पवार, सदाशिव अमरापूरकर किंवा नागेश भोसले यांनाच आपण इॅमेजिन करतो. तसंच, विनोदी चित्रपटांचा काळ म्हटलं की समोर येतात दोन चेहरे लक्ष्मीकांत बेर्डे आणि Ashok Saraf. या दोघांनी ५० पेक्षा अधिक चित्रपटात एकत्र काम करुन प्रत्येक चित्रपट हिट दिला आहे. पण तुम्हाला माहित आहे का एका गाजलेल्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेंऐवजी अशोक सराफ एका महत्वाच्या भूमिकेत दिसले असते. कोणता आहे तो चित्रपट जाणून घेऊयात… (Marathi movies)
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांच्या चित्रपटांतील एक काळ गाजवला. ऐतिहासिक, राजकीय, तमाशा तसाच विनोदी चित्रपट. आणि विनोद म्हटलं की जिगरी दोस्त सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आणि अशोक सराफ ही नाव आलीच. या चौकोनातून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी फार लवकरच एक्झिट घेतली. आजपर्यंत आपण या चौघांच्या मेत्रीचे किंवा अशोक-लक्ष्मीकांत यांचे अनेक किस्से ऐकले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशोक सराफ यांच्यासोबत जुळवलेल्या विनोदाच्या टायमिंगला तोडच नाही.

लक्ष्मींकात यांनी गंभीर भूमिका देखील तितक्याच ताकदीने निभावली आहे.याच पठडीतील त्यांचा एक चित्रपट म्हणजे ‘एक होता विदूषक’ (Ek Hota Vidisha). पु. ल.देशपांडे लिखित या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय पाहून प्रेक्षक आजही त्यांचं कौतुक करतात. हा चित्रपट खरं तर आधी अशोक सराफ करणार होते,पण काही कारणास्तव त्यांना ते शक्य झालं नव्हतं.(Untold stories)

अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी एका कार्यक्रमात याबद्दलचा किस्सा सांगितला होता. सराफ म्हणाले, “’पु. ल. देशपांडे यांच्या ‘एक होता विदूषक’ या चित्रपटाविषयीबहुतेकांना माहीतच असेल. एक अतिशय चांगली कलाकृती असणाऱ्या या चित्रपटात खरं तर मुख्य भूमिका मी साकारणार होतो. पण, काहीकारणामुळे या वेळी मला हा चित्रपट करता आला नाही. पुढं तो लक्ष्यानं (Laxmikant Berde) केला. त्यानं त्याची भूमिका अतिशय उत्तम साकारली. पण, एवढा चांगला चित्रपट आणि विशेषतः ‘पुलं’च्या लेखणीतून साकारलेला हा चित्रपट मला करता आला नाही आणि ही सुवर्णसंधी माज्याकडून हुकली याची रुखरुख मला आजही वाटते”. (Nostalgic Marathi films)
पुढे पु. लं बद्दल बोलताना सराफ म्हणाले, “”भाईंच्या विनोदाची एक वेगळीच मजा होती. त्यांच्या विनोदात संवादी विनोद किंवा शाब्दिक विनोद फार कमी आहेत. त्यांचा विनोद हा कल्पनेवर आणि निरीक्षणांवर आधारलेला असल्यामुळे तो शोधावा लागतो. भाईंचा विनोद ‘बिटवीन द लाइन्स’ असल्यामुळे दरवेळी तो तुम्हाला नवी जागा मिळवून देतो. हीच जागा शोधण्यात एक विनोदी अभिनेता म्हणून माझे आयुष्य गेलं”. (Films update)
===========
हे देखील वाचा : Indian Cinema : शुटींगसाठी लागली २३ वर्ष; वर्ल्ड रेकॉर्ड आणि बरंच काही….
===========
जब्बार पटेल (Jabbar Patel) दिग्दर्शित ‘एक होता विदूषक’ या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर, निळू फुले, मोहन आगाशे, मधू कांबीकर, दिलीप प्रभावळकर असे अनेक दिग्गज कलाकार होते. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार देखील पटकावला होता. मात्र, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी उल्लेखनीय काम केलेल्या या चित्रपटासाठी त्यांना एकही पुरस्कार मिळाला नव्हता याची खंत सगळ्यांना आजही आहे.