
Ashok Saraf : ३२ वर्षांनी ‘अशी ही जमवा जमवी’ मध्ये ‘हे’ तीन कलाकार एकत्र
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) ५० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांशी हसवण्यासाठी ते सज्ज झाले असून लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ (Ashi hi jamva jamvi) या चित्रपटात ते अभिनेत्री वंदना गुप्तेंसोबत धमाल करताना दिसणार आहेत. अशोक सराफ यांचं विनोदाचं टायमिंग भन्नाट आहे आणि त्यात वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांची पुन्हा एकदा त्यांना साथ लाभल्यामुळे नक्कीच प्रेक्षकांना हा चित्रपट पाहताना हसू अनावर होणार हे निश्चितच.
अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून यात अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) देखील दिसत आहेत. टीझरमध्ये दिसतं की, सुनील बर्वे पेपर वाचत असताना टेबलवरील फोन वाजतो. ते म्हणतात की आई फोन वाजतोय, तर वंदना गुप्ते कोण आहे विचारतात, तर सुनील बर्वे सांगतात की सुधा मावशी आहे. हे नाव ऐकताच वंदना गुप्ते यांच्या हातातील भांडी खाली पडतात. त्या फोन घेतात, तर अशोक सराफ त्यांच्याशी बोलत असल्याचे पाहायला मिळतं. आता सुधा जोशी कोण आहे? आणि वंदना गुप्ते का थबकल्या हे पाहण्यासाठी चित्रपट नक्कीच पाहावा लागेल. (Marathi upcoming films)

‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटात फक्त तरुणांचीच नव्हे तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार गोष्ट अनुभवायला मिळणार आहे. थोडी खट्याळ, थोडी गोंडस, थोडी हळवी अशी चित्रपटाची कथा आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्यासह सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे असे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ’अशी ही जमवा जमवी’ चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. (Entertainment masala)
============
हे देखील वाचा : Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द
============
यापूर्वी अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी ‘आंधळी कोशिंबीर’, ‘लपंडाव’ या चित्रपटात एकत्र कामं केली होती. तर अशोक सराफ, वंदना गुप्ते यांच्यासोबत ‘लपंडाव’ चित्रपटात सुनील बर्वे देखील झळकले होते. त्यामुळे जवळपास ३२ वर्षांनी हे तिन्ही कलाकार एकाच चित्रपटात दिसणार आहेत हे विशेष. (Bollywood update)

आजवर अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘पांडू हवालदार’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चौकट राजा’, ’प्यार किया तो डरना क्या’ अशा अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय अशोक-लक्ष्या (Laxmikant Berde) या जोडगोळीने कायमस्वरुपी लक्षात राहणाऱ्या कलाकृती प्रेक्षकांना दिल्या आहेत. ‘अशी ही जमवा जमवी’ नंतर अशोक सराफ पुन्हा एकदा साडे मांडे तीन चित्रपटातही दिसणार आहेत. (Marathi celebrities)