‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Ashok Saraf : “कोल्हापूरकरांनी मला डोक्यावर घेतलं नसतं तर….”
पद्मश्री अशोक सराफ यांचे जगभरात चाहते आहेत… त्यांच्याबद्दल जितकी बोलू तितकं कमी आहे…अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारत मराठी चित्रपटसृष्टीत आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे… रंगभूमीपासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आजही अशोक सराफ यांच्या स्मरणात आहे… नुकत्याच कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी कोल्हापूरकरांचे विशेष आभार मानले… तुम्ही डोक्यावर घेतलं नसतं तर मी कुठेतरी पडदा ओढत बसलो असतो असं ते म्हणाले… नेमकं कोल्हापूरचं कौतुक करत ते काय म्हणाले जाणून घेऊयात…

अशोक सराफ म्हणाले की, “तुम्ही जर मला डोक्यावर घेतलं नसतं तर मी कुठंतरी पडदा ओढत बसलो असतो. कोल्हापूर सारखी प्रेमळ माणसं कुठंच पहिली नाहीत. आजही मला वाटतं की महिन्यातील ८ दिवस कोल्हापुरात येऊन राहावं. माझी कला कोल्हापूरकरांनी वाढवली हे मी कायम आठवणीत ठेवीन असे सराफ म्हणाले. माझ्याचं लोकांनी माझ्यात घरात केलेला हा सत्कार महत्वाचा आहे”, असं सराफ म्हणाले. (Marathi Entertainment News)
================================
हे देखील वाचा : अशोक सराफ…. एक आदर्शवत कलाकार!
=================================
अशोक सराफ यांच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वीच त्यांनी वंदना गुप्ते यांच्यासोबत ‘अशी ही जमवाजमवी’ हा चित्रपट केला होता… तसेच, सध्या ते ‘अशोक मा.मा’ या मालिकेतही काम करत आहेत… शिवाय लवकरच त्यांचा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट येणार असून यात त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव दिसणार आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi