Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ashwini Bhave : खेळ, लग्न आणि अभिनय यांची सांगड घालताना….

 Ashwini Bhave : खेळ, लग्न आणि अभिनय यांची सांगड घालताना….
कलाकृती तडका

Ashwini Bhave : खेळ, लग्न आणि अभिनय यांची सांगड घालताना….

by रसिका शिंदे-पॉल 07/05/2025

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अश्विनी भावे (Ashwini bhave) यांचा आज (७ मे) वाढदिवस. अष्टपैलू अभिनेत्री असणाऱ्या अश्विनी भावे यांना एकेकाळी अभिनयापेक्षा खेळात त्यांना जास्त रस होता. मात्र, एका नाटकामुळे त्यांचं जीवन बदललं आणि खेळाडू होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अश्विनी भावे यांनी मनोरंजनसृष्टीत आपली ओळख निर्माण केली. (Ashwini bhave birthday special)

अश्विनी भावे यांना देशासाठी ऑलंम्पिकमध्ये गोळाफेक करुन सुवर्णपदक मिळवून देण्याची इच्छा होती. पण मधुकर तोरडमल यांच्या एका नाटकामुळं त्यांच्या आयुष्याला पुर्णपणे कलाटणी मिळाली. अश्विनी यांचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. शाळेत असताना त्या प्रत्येक स्पर्धेतअगदी हिरिरीने भाग घेत होत्या. पारितोषिक मिळो अथवा न मिळो खेळापासून ते कला क्षेत्रातील प्रत्येक स्पर्धेत त्यांचं नाव अग्रस्थानी असायचं. (Bollywood news)

खेळासोबतच अश्विनी यांना अभिनयाची देखील आवड होती. शाळेत असताना ‘चंद्रलेखा’चे जगन्नाथ कांदळगावकर यांनी एका शालेय नाटकात काम करताना त्यांना पाहिलं. अश्विनी यांचा अभिनय त्यांना आवडला आणि गगनभेदी या नाटकात त्यांना संधी मिळाली. त्या नाटकाचं दिग्दर्शन मधुकर तोरडमल यांनी केलं होतं. शाळेत असतानाच नाटकात मिळालेल्या संधीमुळे पुढे कॉलेजमध्ये असताना अश्विनी यांना थेट चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. मात्र, अभ्यासाला पुरेसा वेळ मिळत नसल्याकारणाने त्यांनी चित्रपट नाकारले. त्यापैकी एका चित्रपटात अश्विनी ऐवजी माधुरी दीक्षितने काम केलं होतं.

कालांतराने १९८६ मध्ये ‘शाबास सुनबाई’ या मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ‘धडाकेबाज’, ‘वजिर’, ‘गोलात गोल’, ‘एक रात्र मंतरलेली’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केली. मात्र, अश्विनी भावे हे नाव खऱ्या अर्थानं ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटामुळे घराघरांत पोहोचलं. माधुरी ही भूमिका आणि लिंबू कलरची साडी ही आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मराठीत आपल्या अभिनयाचं शिखऱ गाठत असताना अश्विनी यांनी हिंदीतही आपला जम बसवण्यास सुरुवात केली. ‘नया सावन’, ‘शास्त्र’, ‘गर्दीश’, ‘परंपरा’, ‘कायदा कानुन’, ‘मोहब्बत की आरजू’, ‘पुरुष’, ‘मीरा का मोहन’, ‘जज मुजरिम’, ‘जुर्माना’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अश्विनी भावे झळकल्या. (Ashwini bhave movies)

मराठीसह हिंदीतही करिअर जोमात असतानाच अश्विनी यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्या थेट अमेरिकेत कायमच्या स्थायिक झाल्या. याबद्दल एका मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, भारतातून अमेरिकेत जाणं हे आव्हानात्मक होतंच. खरं तर लग्न करणंच मुळात मोठं आव्हान आहे. आई-वडिलांकडील आयुष्य मागं ठेवून दुसरं घर आपलं मानायचं हेच मोठं आव्हान असतं. पण हा मी घेतलेला निर्णय होता. मला हे माहीत होतं की मला हे करायचं आहे. मी जे ठरवते तशी मी वागते. घेतलेला निर्णय निभावणं महत्त्वाचं असतं.(Entertainment)

======================================

हे देखील वाचा: Amitabh Bachchan : ….आणि नीना कुळकर्णींसाठी संपूर्ण टीमला बच्चन साहेबांनी समजावलं!

=======================================

लग्न करणं माझं स्वप्न होतं असं म्हणताना अश्विनी म्हणाल्या की, “मी १५ वर्षांची असताना पहिलं नाटक केलं. त्यामुळे माझं लग्नापर्यंतचं करिअरही यशस्वी झालं होतं. मला संसार करायचा आहे हे माझं स्वप्न होतं. अमेरिकेत गेल्यावर सांस्कृतिकदृष्ट्या वेगळा अनुभव मिळाला. मी चाळीत जन्माला आले. नवीन फ्रॉक आणला तरी मी सगळ्या घरांमध्ये जाऊन पाया पडून यायचे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये शेजारपाजारातील अलिप्तपणा तेव्हा जाणवला. मात्र हा त्या संस्कृतीचा भाग आहे हे मी मान्य केलं. तो एक तडजोडीचा काळ होता”. मात्र, अश्विनी भावे यांचं खेळाडू होण्याचं स्वप्न जरी पुर्ण झालं नसलं तरी त्याच खेळाडू वृत्तीने त्यांनी अभिनय क्षेत्रात इतकी वर्ष आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. (Bollywood tadaka)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ashi hi banavabanavi ashwini bhave Bollywood Chitchat bollywood movies Celebrity News Entertainment News gharat ganpati marathi movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.