Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Avinash Narkar : “लहानपणी आईकडून परवानगी घेण्यासाठी ‘ही’ अनोखी युक्ती वापरायचो”

 Avinash Narkar : “लहानपणी आईकडून परवानगी घेण्यासाठी ‘ही’ अनोखी युक्ती वापरायचो”
मिक्स मसाला

Avinash Narkar : “लहानपणी आईकडून परवानगी घेण्यासाठी ‘ही’ अनोखी युक्ती वापरायचो”

by रसिका शिंदे-पॉल 02/05/2025

आई वडिलांकडून आपल्याला हव्या असणाऱ्या वस्तु मागण्यासाठी आपण सगळ्यांनीच काही ना काही हटके क्लुप्त्या आजमावल्या असणार. आणि त्यात जर का आई-वडिल फारच कडक शिस्तीचे असतील तर मग नाकी नऊच येत असतील नाही का? हट्टाने किंवा प्रेमाने आपल्याला हवी असणारी गोष्ट पालकांकडून करवून घेण्याचं टॅलेंट प्रत्येकात असतंच. असंच काहीसं वेगळं टॅलेंट अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) यांच्याकडे लहानपणी होतं. आईकडून कोणत्याही गोष्टीसाठी परवानगी हवी असेल तर एक खास आयडिया ते वापरत होते. कोणती होती ती आयडिया जाणून घेऊयात… (Marathi celebrities untold story)

अभिनेते अविनाश आणि ऐश्वर्या नारकर (Aishwerya Narkar) हे मराठी इंडस्ट्रीतील सगळ्यांचं आवडतं कपल आहे. वय झालं असलं तरीही तरुणाईची लाईफ जगण्याची व्याख्या आणि आधुनिक सोशल मिडिया लाईफ त्यांनी स्वीकारली आहे. इन्स्टाग्रामवर व्हायरल गाण्यांवरील त्यांच्या रील्सची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. आता नुकत्याच एका मुलाखतीत अविनाश नारकर यांनी लहानपणी ते आईला कसे मनवत होते याचा किस्सा त्यांनी सांगितला आहे. (Marathi films)

अविनाश नारकरांनी आरपारला दिलेल्या मुलाखतीमध्ये लहानपणी आईकडून परवानगी कशी घ्यायचे? याबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. अविनाश म्हणाले की, “आम्ही चाळीत राहायचो आणि तेव्हा आमची आई तंबाखूची मशेरी लावायची. तर मी हे हेरून ठेवलं होतं की ज्यावेळेस आई मशेरी घेऊन बसेल त्यावेळी आईला काहीतरी मागायचं किंवा कबूल करायचं. कारण आई मशेरी लावायची तेव्हा तंद्रीत असायची.” (Entertainment tadaka)

पुढे आईची नक्कल करत ते म्हणाले की, “आई मशेरी लावताना मी तिला ‘राम और शाम’ चित्रपट आहे तर जाऊ का? असं विचारायचो. तर आई सुरुवातीला नाही म्हणायची. मग मी तिला जाऊदे म्हणून हट्ट करायचो. त्यावर ती बाबा ओरडतात मला असं म्हणायची. मग मी पुन्हा लता आणि साधनाला घेऊन जातो असं म्हणायचो. मग ती लवकर ये. उशीर उशीर नको. कडी वाजवू नको असं सांगायची.”. (entertainment news)

===============================

हे देखील वाचा: पाठवणीला ऐश्वर्यासोबत अविनाश नारकर देखील रडले, जाणून घ्या त्यांच्या लग्नाचा किस्सा

===============================

अविनाश नारकर ३० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. १९९४ साली ‘मुक्ता’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. ‘पुत्रवती’, ‘पैंज लग्नाची’, ‘खतरनाक’, ‘मला जगायचंय’, ‘नातीगोती’, ‘धुडगूस’, ‘वादळवाट’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘गोळा बेरीज’, ‘लेक माझी लाडकी’ अशा अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ते स्टार प्रवाहवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेत काव्या आणि नंदिनीच्या सासऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत. तर रंगभूमीवर त्यांचं ‘पुरुष’ हे नाटकही सुरू आहे. (Avinash Narkar movies and daily soaps)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor actress aishwerya narkar avinash narkar bollywood update celebrities stories marathi couple marathi entertainment news Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.