Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Perfect Family Series Trailer: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक च्या

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना

Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ayushmann Khurrana व्हिजे ते राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता!

 Ayushmann Khurrana व्हिजे ते राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता!
कलाकृती विशेष

Ayushmann Khurrana व्हिजे ते राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता!

by रसिका शिंदे-पॉल 14/09/2025

अभिनेता, गायक, डान्सर, व्हिडिओ जॉकी, आर.जे, होस्ट असे सगळेच गुण ज्या कलाकारात आहे तो म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana)… आज (१४ सप्टेंबर) आयुष्यमानचा वाढदिवस… लहानपणापासूनच अभिनेता होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आयुष्यमानचा फिल्मी प्रवास सोप्पा नव्हता… मुळचा चंदीगढचा असल्यामुळे भाषेत पंजाबी भाषेचा लहेजा येणाऱ्या खुरानाला बऱ्याच रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे… मात्र, आज बॉलिवूडमधल्या टॉप कलाकारांमध्ये त्याची गणना केली जात असून हटके विषय आपल्या अनोख्या अभिनयशैलीतून मांडण्याचं कसब त्याच्यात हे हे नक्की… जाणून घेऊयात आयुष्यमान खुरानाचा प्रवास….

आयुष्मानचे वडील ज्योतिषी होते तर आई गृहिणी आहे… आयुष्यमानचे आधीचे नाव निशांत असे होते… मात्र, नंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव आयुष्यमान असे ठेवले आणि वडिलांच्या सांगण्यावरुन त्याने आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्येही बदल केला… आयुष्यमान लहानपणापासूनच अभिनयात पुढे होता… शाळेतील कार्यक्रमांमध्ये भाग घेत असायचा.. त्याला त्याच्या आजीकडून प्रोत्साहन मिळत होतं… आयुष्यमानची आजी राजकपूर आणि दिलीपकुमार यांची मिमिक्री करत असत… त्यामुळे तेव्हापासूनच अभिनयाची गोडी त्याला लागली होती… त्याने वयाच्या ५व्या वर्षी आई-वडिलांसबोत पहिला चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होता तो होता माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरचा तेजाब… तेव्हापासूनच नकळतपणे त्याचं आणि थिएटरचं नातं जोडलं गेलं…

आयुष्यमान २००२ मध्ये लाइमलाइटमध्ये आला… तेव्हा तो चॅनेल व्हीवर येणाऱ्या रिएलिटी शो ‘पॉपस्टार्स’मध्ये सहभागी झाला होता… त्यावेळी तो फक्त १७ वर्षांचा होता. त्या शोमध्ये सहभागी होणारा सर्वात कमी वयाचा तो स्पर्धक होता… त्यानंतर २००४ मध्ये आयुष्यमान एमटीव्हीचा रियालिटी शो ‘रोडिज सीझन 2’ चा विजेता बनला…  पुढे एमटीव्हीबरोबर त्याने व्हिडिओ जॉकी म्हणून काम करण्यास सुरुवात केली… ‘पेप्सी एमटीवी वास्सप’ आणि ‘द व्हाइस ऑफ यंगिस्तान’ या शोमध्ये त्याने व्हिजेचं काम केलं…

कलर्सवर आलेल्या ‘इंडिया गॉट टॅलेंट’ या शोचा पहिला सीझन आयुष्यमानने होस्ट केला होता… त्यानंतर स्टार प्लसवरील गाण्याचा रियालिट शो ‘म्युझिक का महामुकाबला’ हा देखील त्यानेच होस्ट केला होता… याव्यतिरिक्त  ‘जस्ट डान्स’ या शो चंही अँकरिंग त्यानेच केलं होतं.. टेलिव्हिजिनवर होस्ट म्हणून आपलं स्थान बळकट केल्यानंतर आय़ुष्यमानने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला…

खरं तर आज ज्या स्थानी आयुष्मान आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने फार मेहनत घेतली आहे… एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये आयुष्मानने सांगितले होते की, जेव्हा तो पश्चिम एक्सप्रेस आणि पंजाब मेलने आपल्या ग्रुपसोबत चंदीगड ते मुंबई असा प्रवास करायचा तेव्हा तो गाणी म्हणायचा आणि लोकं त्याला आनंदाने पैसेही द्यायचे… इतकंच नाही तर टीसी स्वत: त्याच्याकडे येऊन, फर्स्ट क्लासमध्ये गायला बोलावलं आहे असे सांगायचा. तिथे त्याला भरपूर पैसे मिळायचे…

====================================

हे देखील वाचा : Stree to Thama :  बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स!

====================================

विक्की डोनर चित्रपटापासून आयुष्यमान खुराना याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला.. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलंच नाही… ‘नौटंकी साला’, ‘हवाईजादा’, ‘दम लगा के हैशा’, ‘मेरी प्यारी बिंदु’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभ मंगल सावधान’, ‘अंधाधुन’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘ड्रिम गर्ल’, ‘बाला’ असे विविध विषय मांडणारे चित्रपट आयुष्यमान याने आजवर केले… लवकरच मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिवर्समध्ये त्याची एन्ट्री होणार असून रश्मिका मंदानासोबत तो ‘थामा’ (Thama Movie) या चित्रपटात दिसणार आहे…

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: article 15 ayushmann khurrana Ayushmann Khurrana birthday Ayushmann Khurrana debut movie Ayushmann Khurrana movies Bollywood News madoock universe rashmika amndana thama vicky donar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.