Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jai Jai Swami Samarth: गर्भवती कावेरीच्या संकटावेळी दिसणार स्वामींची अद्भुत

Virosh Wedding: Rashmika-Vijay च्या रिसेप्शनला प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची हजेरी; समोर

सचिन तेंडूलकरची सून Saaniya Chandhok आहे Business Women!

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

B Merwan चे सिनेमावाल्याशी नाते….

 B Merwan चे सिनेमावाल्याशी नाते….
कलाकृती विशेष

B Merwan चे सिनेमावाल्याशी नाते….

by दिलीप ठाकूर 26/12/2025

साधारण दादर, सायनपासून कुलाब्यापर्यतची मुंबई ही जुनी मुंबई म्हणून ओळखली जाते. तशा अनेक खाणाखुणाही दिसतात. विशेषतः मुंबई सेंट्रलपासून पुढे गेल्यावर इंग्रजकालीन मुंबईच्या अनेक खाणाखुणा पाहायला मिळतात आणि त्यात इराणी हॉटेलचे आपली एक वैशिष्ट्यपूर्ण व स्वतंत्र व्यक्तिमत्त्व. जुन्या पिढीतील अनेक चित्रपट रसिक एव्हाना त्या इराणी हॉटेलमधील ब्रून मस्का‌ पाव आणि गरम चहा या आठवणीत गेले असतील.

असेच एक वैशिष्ट्यपूर्ण इराणी हॉटेल म्हणजे ग्रॅन्ड रोड स्टेशन पूर्व येथील बी. मेरवान. ते बंद होत असल्याचे वृत्त व्हॉट्सअॅपवर वाचले. तसं पाहिलं तर काही वर्षांपूर्वीही म्हणजे २०१४ सालीही अशाच प्रकारचे वृत्त सोशल मीडियात व्हायरल होत असतानाच अनेकांनी अतिशय प्रेमाने विनंती करुन तसं होऊ दिलं नाही आणि बी. मेरवान पुन्हा खव्वय्याची भूक भागवत राहिला. आताही तसेच व्हावे अशीच खव्वय्याची भावना नक्कीच असावी. हे बी. मेरवान इराणी हॉटेल १९१४ साली सुरू झाले. याचाच अर्थ त्याला १११ वर्षे पूर्ण झाली आहेत. आज येथील चविष्ट पदार्थांनी ‘मेरवान ब्रॅण्ड’ एस्टाब्लिश केला आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबईतील अनेक बदल या वास्तूने पाहिलेत.

मी गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील अनेक इराणी हॉटेलमधील केक खाल्ले आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. बी. मेरवान मावा केक, खारी बिस्किट, ब्रून मस्का‌ पाव व चहा आणि पॅटीस यासाठी विशेष प्रसिद्ध होता.‌ येथे खिमा पाव खाणारे बरेच. आणि विशेषतः सकाळी लवकर तेथे मावा केकसाठी रांग लागे आणि ते लवकरच संपत. त्या केकभोवतीचा कागद आणि त्याचा विशिष्ट वास हेदेखील वैशिष्ट्यपूर्ण. आपल्या चित्रपटसृष्टीचेही या बी. मेरवानशी विशेष नाते. विजू खोटे याच मेरवान इराणी हॉटेलपासून साधारण दहाच्या मिनिटांच्या अंतरावर पश्चिमेकडील गावदेवी येथे राहत आणि अनेकदा तरी याच मेरवान इराणी हॉटेलमधील मोठ्या आकाराची खारी बिस्किट, मावा केक आणि पॅटीस घेऊन सेटवर जात. त्या काळातील मराठी व हिंदी चित्रपटांच्या सेटवर अनेक कलाकार आपापल्या विभागातील वैशिष्ट्यपूर्ण असं खायला असणारी गोष्ट घेऊन येत असे. त्या काळात चित्रपटाच्या सेटवर कौटुंबिक आणि मित्रत्वाचे नातं असे. ते दिवसच वेगळे होते.

याच बी. मेरवान इराणी हॉटेलमध्ये सकाळच्या वेळेस हिंदी चित्रपटात भूमिका साकारत असलेल्या अनेक ज्युनिअर आर्टिस्टचे दर्शन घडे. सत्तर व ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटात ज्युनिअर आर्टिस्टची भूमिका करणारे अनेक जण जवळच्याच खेतवाडी, कुंभारवाडा परिसरात राहत. ते बी. मेरवान येथे भेटून पानी कम चाय पिऊन समोरच्या ग्रॅन्ड रोड स्टेशनला लोकल ट्रेन पकडून दादरला रुपतारा स्टुडिओत जात आणि तेथे त्यांना आज मुंबईतील कोणत्या स्टुडिओत आपल्याला जायचेय याची माहिती मिळत असे.

बी. मेरवान इराणी हॉटेलमध्ये माणिक इराणीही दिसत असे. तो अप्सरा थियेटरमागे राह्यचा.  याच अप्सरा थियेटरसमोरच्या गिल्डन मैदानावर अनेकदा तरी रविवारी दिग्दर्शक मनमोहन देसाई टेनिस चेंडूवर क्रिकेट खेळायला येत. क्रिकेटवर त्यांचे भारी प्रेम. कधी डाव रंगला की याच बी. मेरवान इराणी हॉटेलमधील डझनभर पॅटीस आणायला कोणाला तरी पाठवत. याच बी. मेरवानकडून एकिकडे मिनर्व्हा आणि अप्सरा चित्रपटगृहाकडे जावे लागे, आणि दुसरीकडे नाॅव्हेल्टी, ड्रीमलॅण्ड या एकेकाळच्या चित्रपटगृहाकडे जावे लागे आणि यापैकी कोणत्याही चित्रपटगृहात पिक्चर एन्जॉय केल्यावर याच बी. मेरवान इराणी हॉटेलमध्ये बसून मित्रांसोबत त्याच पिक्चरवर भरभरून गप्पा मारत बसणं ठरलेलेच. अधूनमधून चहा मागवत राहिले आणि समोरच्या आरशात स्वतःला पाहून पाहिलेल्या पिक्चरमधील हिरो अथवा व्हीलनपेक्षा आपण फार फार दूर आहोत हे पटेल.

असो. अगदी काही वर्षांपूर्वीच डॉ. श्रीराम नेने यांनी आपल्या हातात खारी बिस्किटचे भलं मोठं पॅकेट घेऊन मुंबईतील सर्वात जुन्या इराणी बेकरीबाहेर आपण उभे आहोत असा एक वेगळाच फोटो एक्स (ट्विट) केल्याचे पाहिले आणि विलक्षण सुखावलो. नेने हे जवळच्याच प्रार्थना समाज येथील रिलायन्स इस्पितळात (हरकिसनदास इस्पितळ) येथे कार्यरत होते, त्यांनी आजूबाजूच्या गोष्टीतही विशेष रस घेतला असं म्हणता येईल.‌ काय सांगावे, माधुरी दीक्षितने‌ त्यांना ही सवय लावली असावी….

================================

हे देखील वाचा : Multiplex चा रंग काही वेगळाच!

================================

असो. जुन्या काळातील मुंबईतील अनेक गोष्टी वा स्थळे एकेक करत काळाच्या पडद्याआड जाताहेत हे अधूनमधून आपल्याला दिसते. बी. मेरवान आणि कंपनी मात्र अनेक वर्षे सुरूच रहावं. ग्रॅन्ड रोड स्टेशनला उतरताना समोरच दिसत असलेल्या या इराणी हॉटेलमध्ये जाऊन ब्रून मस्का पाव आणि बिनसाखरेचा चहा याची लागलेली सवय अशीच कायम राहू देत…. काही आवडीनिवडी वा सवयी अशाच कायम राहाव्यात असं मनोमन वाटते…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: b merwans Bollywood bollywood news tadka Entertainment News grant road Viju Khote
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.