बप्पी लहिरी : हिंदी सिनेमा संगीताच्या दुनियेतील गोल्ड मॅन
हिंदी सिनेमा संगीताच्या दुनियेत युवा पिढीने ज्यांच्या संगीतावर अक्षरशः जान कुरबान केली ते मागच्या पिढीचे संगीतकार म्हणजे आर डी बर्मन. आज इतक्या वर्षानंतर देखील पंचमच्या संगीताची जादू अबाधित आहे. पंचम नंतर प्रमुख नाव येते ते संगीतकार बप्पी लहिरी. त्यांची सांगीतिक कारकीर्द आर डी बर्मन यांना समांतर अशीच होती. आर डी शी साधर्म्य असूनदेखील एक वेगळी ओळख बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्या संगीताने रसिकांना करून दिली.
डिस्को संगीतासाठी बप्पी (Bappi Lahiri) खास आठवले जातात. ऐंशीच्या दशकात जितेंद्र, श्रीदेवी आणि जयाप्रदाच्या साउथ कडील मूवीसाठी त्यांनी प्रचंड काम केले. १९८७ साली तर वर्षभरात तब्बल १५ हून अधिक सिनेमांना संगीतबध्द केल्याबद्दल त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये रेकॉर्ड झाले होते असे म्हणतात. २७ नोव्हेंबर १९५२ रोजी कलकत्याला जन्मलेल्या बप्पी लहरी यांचं सोन्यावरील (गोल्ड) प्रेम देखील खूप चर्चेत असायचे.
आज बप्पी लहिरी हिंदी सिनेमा संगीताच्या दुनियेतील गोल्ड मॅन (Bappi Lahiri) आपल्यात नाहीत. पण आजही बप्पी लाहीरी म्हटलं की पहिल्यांदा त्यांचा सोन्याने मढलेला देह आपल्यासमोर येतो. गळ्यात, हातात, कानात आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे सगळीकडे सोनं ते घालत असायचे! सोन्यावर त्यांचे विलक्षण प्रेम होतं.. ‘गोल्ड माझ्यासाठी लक्की आहे’ असं ते नेहमी म्हणत. त्यांचं हे गोल्ड प्रेमप्रकरण कधी सुरू झालं याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे.
बप्पी लहिरी हिंदी सिनेमा संगीताच्या दुनियेतील गोल्ड मॅन (Bappi Lahiri) यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ रोजी झाला. घरात संगीतमय वातावरण. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांनी तबला शिकायला सुरुवात केली. त्याचा म्युझिक सेन्स पाहून त्यांच्या पालकांनी त्याला संगीतकार बनवायचे ठरवले. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी मुंबईला प्रयाण केले. शंभू मुखर्जी यांचा ‘शिकारी’ या चित्रपटाला त्यांनी पहिल्यांदा संगीत दिले. हा सिनेमा काही चालला नाही. त्यांना खऱ्या अर्थाने पहिला ब्रेक मिळाला १९७५ साली आमीर खानचे वडील ताहीर हुसेन यांच्या ‘जखमी’ या चित्रपटातून. या सिनेमातील प्रत्येक गाणं जबरदस्त गाजलं. यात लता मंगेशकर यांनी ‘जिंगल बेल जिंगल बेल‘ गायलं होतं. यातील किशोर कुमार यांनी गायलेलं ‘जलता है जिया मेरा भीगी भीगी रातो मे…’ हे गाणं खूप गाजलं होतं. या सिनेमाला व्यावसायिक यश जरी कमी मिळालं असलं तरी यातली गाणी प्रचंड गाजली.
या संगीताचे यश पाहून बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांच्या आईने त्यांना पहिल्यांदा सोन्याची साखळी सप्रेम भेट दिली. ही भेट त्यांच्यासाठी खूप लक्की ठरली. कारण त्याच्या पुढच्या वर्षी आलेला ‘चलते चलते’(१९७५) हा चित्रपट त्यातील गाण्यांमुळे आज देखील आठवला जातो. ‘चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा न कहना कभी अलविदा न कहना’, ‘प्यार में कभी कभी ऐसा हो जाता है ‘, ‘जाना कहां है’. बप्पीचे ‘गोल्ड लव्ह’ याच काळात सुरु झाले.
१९७८ साली बप्पी लहिरी हिंदी सिनेमा संगीताच्या दुनियेतील गोल्ड मॅनयांचं लग्न झालं. या लग्नात त्यांच्या पत्नीकडून त्यांना दोन मोठ्या गोल्ड चेन मिळाल्या. एका गोल्ड चेनच्या लॉकेटमध्ये बी हे अक्षर कोरलेलं होतं बी फॉर बप्पी आणि दुसरी एक चेन त्यांच्या पॅनल मध्ये गणपती होता. या दोन गोल्ड चेननंतर बप्पी लहरी यांचे भाग्य खूपच फळफळले. ऐंशीचे दशक हे बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे दशक होत. यातील सर्वाधिक हिट सिनेमा होता ‘डिस्को डान्सर’. तिथून पुढे बप्पी लहरी प्रत्येक सिनेमा गणित आपल्यासाठी गोल्ड घेत गेले. आणि संपूर्ण शरीरावर सोन्याचे आभूषण घालत फिरू लागले. गोल्डमॅन ही त्यांची इमेज सिनेमाच्या दुनियेत बनली.
तुम्हाला वाटत असेल एकूण बप्पी लहरीकडे गोल्ड किती होतं? २०१४ साली बप्पी लहिरी यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळेला त्यांना आपले ॲसेट डिक्लेअर करायचे होते. निवडणूक आयोगाला दिलेला तपशीलात त्यांनी असे सांगितले होते की त्यांच्या स्वतःकडे साडेसातशे ग्रॅम गोल्ड आणि त्यांची पत्नी याच्याकडे साडेनऊशे ग्रॅम गोल्ड आहे!
बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) कायम डिस्को गीतांसाठी आठवला जातो पण त्यांनी अस्सल भारतीय अभिजात संगीतातील गाणी देखील दिली होती. खरं तर अतिशय प्रतिभावान संगीतकार होता; पण बप्पी लहरी यांनी कायमच आपल्या प्रतिभेपेक्षा प्रवाहाला जास्त महत्त्व दिल्यामुळे त्यांच्यातील चांगलं संगीत बाहेर येऊ शकलं नाही असं माझं स्पष्ट मत आहे.
=============
हे देखील वाचा : …आणि संगीतकार खय्याम यांच्या ‘उमराव जान’च्या संगीताने इतिहास घडवला!
=============
त्यांची काही गाणी आज देखील क्लास गाणी म्हणून ओळखली जातात. जिद ना करो अब तो रुको (लहू के दो रंग) (राग: यमन) धीरे धीरे सुबह हुई जग उठी जिंदगी: (हैसियत) (राग:अहिर भैरव’), गाओ मेरे मन चाहे सूरज चमके रे चाहे लगा हो ग्रहण (अपने पराये), सैय्या बिना घर सुना (आंगन कि कली), माना हो तुम बेहद हंसी(टूटे खिलौने), मौसम मस्ताना है दिल दिवाना है(लालच), मंजिले अपनी जगह है(शराबी), भीगा भीगा मौसम भीनी भीनी खुशबू (सुराग), जाना कहा है प्यार यहां है(चलते चलते),चंदा देखे चंदा (झूठी) ही दहा गाणी या gold man ची गोल्डन मेलडी व्यक्त करायला पुरेशी आहेत! (Bappi Lahiri)