Kurla To Vengurla Trailer: ग्रामीण वास्तवाला विनोदी रंग देणारा कौटुंबिक

Better Half Chi Love Story Teaser: “सुबोध भावे, रिंकू राजगुरू,प्रार्थना बेहरे २२ ऑगस्टपासून सिनेमागृहात उडणार करमणुकीचा तडका!
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ (Better Half Chi Love Story) या नावापासूनच एक वेगळी उत्सुकता निर्माण होते. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याने प्रेक्षकांच्या मनात रहस्य, विनोद आणि प्रेमाची अनोखी त्रयी मांडली आहे. अल्ट्रा आणि सुशीलकुमार अग्रवाल यांच्या निर्मितीत तयार झालेला हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. टीझरची सुरूवातच इतकी दमदार आहे की, प्रेक्षक एक क्षणही नजर हटवू शकत नाहीत.(Better Half Chi Love Story Teaser)

या कथेचा केंद्रबिंदू आहे सुबोध भावे (Subodh Bhave) यांचं पात्र. त्याची पत्नी या जगात नसली तरी त्याला ती आजही आसपास असल्याचा भास होत असतो. या भासांपासून सुटण्यासाठी तो काय काय करतो, त्यातून निर्माण होणारे हास्यप्रसंग आणि त्यामागे लपलेलं एक गूढ ही याची खरी गोष्ट आहे. शेवटच्या फ्रेममध्ये टाकलेला प्रश्न “त्यादिवशी नेमकं काय घडलं?” प्रेक्षकांच्या मनात अनेक शंका निर्माण करून जातो.

चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि छायाचित्रण संजय अमर यांनी केलं असून निर्मिती केली आहे रजत अग्रवाल यांनी. संगीत साजन पटेल आणि अमेय नरे यांचं आहे. कलाकारांच्या बाबतीत बघायचं झालं तर मराठीतील आघाडीचे कलाकार सुबोध भावे, रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) , प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) आणि अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.(Better Half Chi Love Story Teaser)
==============================
हे देखील वाचा: Ujjwal Nikam Biopic: उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झळकणार !
==============================
दिग्दर्शक संजय अमर यांच्या मते ही गोष्ट आधुनिक प्रेक्षकांच्या भावविश्वाला भिडणारी आहे. विनोदाच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर निर्माते रजत अग्रवाल सांगतात की, हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देणारा आहे. २२ ऑगस्ट रोजी ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आणि सध्या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात या सिनेमाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.