Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Rajkumar Rao : ‘भूल चुक माफ’ चित्रपटाला उच्च न्यायालयाचा दणका!
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती काही अंशी स्थिरावली असली तरी देशात तणावाचे वातावरण आहेच. अशा परिस्थितीत राजकुमार राव आणि वामिका गब्बी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘भूल चुक माफ’ (Bhool Chuk Maaf) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करता ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, उच्च न्यायालयाने मेकर्सना दणका देत ओटीटी प्रदर्शन थांबवलं आहे. या निर्णयामागे PVR आणि INOX या मल्टिप्लेक्स साखळीने ६० कोटी रुपयांचा खटला दाखल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Bollywood tadaka)

राजकुमार राव (Rajkumar Rao) आणि वामीका गब्बी (Wamiqua Gabbi) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘भूल चुक माफ’ हा चित्रपट देशातील युद्धजन्य परिस्थिती पाहता थिएटरमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, PVR आणि INOX या मल्टिप्लेक्स साखळीने कोर्टात असा दावा केला आहे की, थिएटर आणि OTT रिलीजच्या दरम्यानच्या ८ आठवड्यांच्या अंतराच्या नियमांचे चित्रपट उल्लंघन यामुळे करत आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास मल्टिप्लेक्स साखळ्यांना आर्थिक नुकसान होऊ शकतो. त्यामुळे उच्च न्यायालयाने ओटीटीवरील चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं आहे. (Entertainment)
===================================
हे देखील वाचा: अक्षया हिंदळकर मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज; P.S.I. Arjun सिनेमात सुपरस्टार अंकुश चौधरीसोबत झळकणार!
===================================
दरम्यान, ‘भूल चुक माफ’ (Bhool Chuk Maaf) चित्रपटाचं दिग्दर्शन करण शर्मा यांनी केले असून दिनेश विजन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा वाराणसीतील एका छोट्या गावातील प्रेमकथेवर आधारित असून, यात राजकुमार राव आणि वामीका गब्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. थिएटरऐवजी हा चित्रपट Amazon Prime Video वर 16 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे आता चित्रपट कुठे आणि कधी रिलीज होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (Bollywood news)