Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ajay Devgan ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत!

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला;

अहंकारातून भूमिका नाकारली आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागले!

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत

Aandhi चित्रपटाच्या रिलीजला ५१ वर्ष पूर्ण; राजकारण बदलले पण चित्रपटाचा

“मरण पत्करेन पण माफी मागणार नाही”; बिग बॉसच्या घरातून बाहेर

Big Boss Marathi Season 6 : टोळीत प्रेमाची खळी खुलणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला; वडिलांच्या आठवणीत झाली भावुक !

 Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला; वडिलांच्या आठवणीत झाली भावुक !
Bigg Boss Marathi 6 Anushri Mane
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला; वडिलांच्या आठवणीत झाली भावुक !

by Team KalakrutiMedia 12/02/2026

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सध्या राखी सावंतच्या तुफान एन्ट्रीनंतर ड्रामा आणि टाकाऊ वादांची गडबड सुरु आहे. पण या रंगीत वादांमध्ये एक शांत, भावूक क्षणही पाहायला मिळाला. जे प्रेक्षकांना थक्क करणारे होते. घरात दिलेल्या एका टास्कने अभिनेत्री अनुश्री माने च्या (Anushri Mane ) मनातील एका खोल व दुःखद आठवणीला उघडून दिले आणि तिला कॅमेऱ्यासमोरच रडणे थांबवता आले नाही. बिग बॉसने काही दिवसांपूर्वी घरातील सदस्यांना जोड्यांमध्ये बांधण्याचा टास्क दिला होता. या साखळीच्या जोडीत अनुश्रीची जोडी राकेश दादा सोबत झाली. पण योगायोग असा की, त्या वेळी राकेशच्या प्रकृतीची अवस्था अत्यंत नाजूक होती. त्याला किडनी स्टोनचा त्रास होता आणि पायातही दुखत होते. साखळीने बांधलेली असल्याने जिथे राकेश जाईल, तिथे अनुश्रीलाही जावं लागत होतं.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Anushri Mane

या साखळीच्या जोडीनेच अनुश्रीच्या मनातील वडिलांच्या आठवणी पुन्हा जाग्या केल्या. टास्क पूर्ण करताना राकेशच्या वेदनेतून अनुश्रीला स्वतःच्या वडिलांची आठवण येऊ लागली. ज्यांना ती नेहमीच आजारी अवस्थेत पाहायची.टोळीसोबत गप्पा मारताना अनुश्रीने आपल्या आयुष्यातील त्या काळाचा उल्लेख केला, ज्यावेळी तिच्या वडिलांची प्रकृती नेहमीच ढासळत असे. ती म्हणाली की, राकेशची अवस्था पाहून तिला असं वाटत होतं की ती पुन्हा आपल्या वडिलांच्या मागे फिरतेय आणि त्यांची काळजी घेत आहे.

Bigg Boss Marathi 6
Bigg Boss Marathi 6 Anushri Mane

तिच्या आठवणींचा भाग म्हणून ती एक प्रसंग सांगते. जो ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी येतं. ती म्हणाली की, वडिलांच्या उपचारासाठी ती आणि तिची आई गावोगावी फिरायच्या. एकदा टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी मुंबईला येताना ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. बसायला जागा नाही, प्रवासही कष्टदायी होता. तरीही तिने वडिलांना मांडीवर झोपवून त्यांना हलक्या हाताने थोपटत, ती संपूर्ण प्रवास पार केला. अनुश्री पुढे म्हणाली की, राकेशला त्रास होत असताना तिची तब्येतही थकलेली होती. पण वडिलांची आठवण तिला “नाही” म्हणण्याची परवानगी देत नव्हती. माणुसकी आणि प्रेमामुळे तिने तो त्रास सहन केला. (Bigg Boss Marathi 6)

===========================

हे ही वाचा: Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत रुचिताचा राखीशी पंगा

===========================

अनुश्रीची ही कथा ऐकून घरातील रोशनदेखील भावूक झाला. त्याने अनुश्रीला सांत्वन करत एक अतिशय मोलाचा आणि अर्थपूर्ण वाक्य दिले, “बापाचं छत्र हरपलं की माणसाला काहीच सुचत नाही. बाप कसाही असला तरी चालेल, पण घरात बाप असायलाच हवा.” या वाक्याने घरातील वातावरण अधिक गंभीर आणि भावूक बनवले. घरात सध्या जिथे बाहेरून येणारा ड्रामा, टोमणे आणि वाद लोकांना मनोरंजन देत आहेत, तिथे अनुश्रीच्या या क्षणाने मानवी भावना आणि माणुसकीची आठवण करून दिली.एकूणच, बिग बॉस मराठी 6 मध्ये मनोरंजनाबरोबरच मानवी भावनांचा देखील एक वेगळाच प्रवाह आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीनमुळे घरातली रंगत वाढली असली, तरी अनुश्रीचा हा भावनिक प्रसंग प्रेक्षकांना फार काळ स्मरणात राहणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anushree tears Bigg Boss Marathi 6 Bigg Boss Marathi 6 Anushree Bigg Boss Marathi Anushree tears Bigg Boss Bigg Boss Marathi emotional moment Bigg Boss Marathi 6 latest episode Bigg Boss Marathi 6 Promo Bigg Boss Marathi Drama Celebrity Entertainment Marathi reality show Bigg Boss Marathi news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.