Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट; दार उघडणार आणि नशिब उल्टा-पुल्टा होणार !
कलर्स मराठीवरील ‘Bigg Boss Marathi 6’च्या घरात सध्या प्रचंड घडामोडी घडताना दिसत आहेत. रोज नव्या वादांना, मजेशीर क्षणांना आणि बदलत्या नात्यांना प्रेक्षक साक्षीदार ठरत आहेत. खेळ जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आव्हान अधिक कठीण होत चालले आहे. अशातच आता घरात असा एक मोठा ट्विस्ट येणार आहे, जो संपूर्ण खेळाची दिशा बदलू शकतो. आजच्या भागात प्रेक्षकांना एक अत्यंत धक्कादायक बदल पाहायला मिळणार आहे. ‘उल्टा-पुल्टा’ नावाच्या खास रूमची घरात एन्ट्री होणार असून, या रूमकडे संपूर्ण गेम पलटवण्याची ताकद असल्याचं बिग बॉसने स्वतः जाहीर केलं आहे. “या आठवड्यात सदस्यांसाठी अडचणी दुप्पट होणार आहेत,” असा इशाराही बिग बॉसने दिला आहे. या नव्या रूममुळे घरातील समीकरणं ढवळून निघणार असून, कोणासाठी ही संधी ठरेल तर कोणासाठी मोठी अडचण ठरू शकते. (Bigg Boss Marathi 6)

या ट्विस्टमुळे घरातील वातावरण अधिकच तापल्याचं दिसून येत आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, आजच्या भागात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, आणखी एका प्रोमोमध्ये अनुश्री आणि राकेश बापट (Rakesh Bapat) यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे. वादाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसले तरी अनुश्रीच्या काही शब्दांमुळे राकेश प्रचंड संतापलेला दिसतो. संतापाच्या भरात राकेश घरात तोडफोड करताना आणि घर सोडण्याची भाषा करताना दिसतो. “मला या घरात अजिबात राहायचं नाही,” असं तो ठामपणे सांगतो. तर दुसरीकडे अनुश्रीने केलेल्या आरोपांवर राकेश तीव्र प्रतिक्रिया देतो, ज्यामुळे हा वाद अधिकच पेटतो.

‘बिग बॉस मराठी’ला सुरुवात होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. नुकताच ‘भाऊंचा धक्का’ हा खास एपिसोड पार पडला, ज्यामध्ये यावेळी कोणतीही नामांकन प्रक्रिया झाली नाही. मात्र येत्या आठवड्यात नक्कीच नॉमिनेशन होणार असून, एक स्पर्धक घराबाहेर जाणार असल्याचं रितेश देशमुखने आधीच स्पष्ट केलं आहे. (Bigg Boss Marathi 6)
============================
============================
आता ‘उल्टा-पुल्टा’ रूम, वाढते वाद आणि होणारी नॉमिनेशन प्रक्रिया यामुळे हा आठवडा अधिकच निर्णायक ठरणार आहे. कोणाचा खेळ बहरणार आणि कोणाचा प्रवास इथेच संपणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रोचक ठरेल.