हृतिक-फरहान-अभय देओलची पुन्हा गट्टी जमणार! ZNMD चा सीक्वल कन्फर्म

Bigg Boss Marathi 6 च्या घरातून Omkar Raut बाहेर; आता घरात होणार मोठे बदल
Bigg Boss Marathi 6 च्या चौथ्या आठवड्यात प्रेक्षकांना जबरदस्त धक्का बसला आहे. या आठवड्यात डबल एलिमिनेशन जाहीर झालं असलं, तरी प्रत्यक्षात एकामागोमाग एक दोन दिवसांत दोन स्पर्धकांचा प्रवास थांबला. शुक्रवारी दिव्या शिंदे (Divya Shinde) घराबाहेर पडली आणि त्यानंतर रविवारच्या एपिसोडमध्ये ओमकार राऊतची ?(Omkar Raut) एक्झिट झाली. रविवारच्या एलिमिनेशनमध्ये ओमकार राऊतला प्रेक्षकांची तसेच घरातील स्पर्धकांची अपेक्षित मतं मिळाली नाहीत. त्यामुळे त्याला बिग बॉसच्या घरातून निरोप घ्यावा लागला. डेंजर झोनमध्ये ओमकारसोबत आयुष संजीव (Ayush Sanjeev) देखील होता, मात्र आयुषला तुलनेने अधिक मतं मिळाल्याने तो सेफ ठरला.(Bigg Boss Marathi 6)

एलिमिनेशनचा हा टास्क प्रचंड तणावपूर्ण ठरला. रितेश भाऊंनी दोन वेगवेगळ्या गटांमधील स्पर्धकांना पुढे बोलावलं. पहिल्या गटात अनुश्री, प्रभू, राकेश आणि आयुष यांचा समावेश होता. प्रत्येकासमोर एक बॉक्स ठेवण्यात आला होता. ज्याच्या बॉक्समध्ये स्वतःचं नाव नसेल, तो थेट डेंजर झोनमध्ये जाणार – अशी अट होती. या गटातून आयुष संजीव डेंजर झोनमध्ये गेला. यानंतर दुसऱ्या गटातून ओमकार, सचिन, दिपाली आणि रोशन यांना बोलावण्यात आलं. या टप्प्यात ओमकार राऊत डेंजर झोनमध्ये गेला. शेवटी आयुष आणि ओमकार या दोघांमधून एकाला घराबाहेर जाण्याचा निर्णय झाला आणि कमी मतांमुळे ओमकारचा प्रवास इथेच थांबला.

आयुष संजीव मात्र सुरक्षित असून तो पाचव्या आठवड्यातील खेळात कायम राहणार आहे. विशेष म्हणजे, येत्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात एका वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे नेमका कोण येणार, यावर प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.(Bigg Boss Marathi 6)
=============================
=============================
ओमकारच्या एक्झिटनंतर घरातील समीकरणं पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा अधिक निर्णायक ठरणार असून, कोण सुरक्षित राहील आणि कोण धोक्यात येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. नवे वाद पेटणार की नवी मैत्री तयार होणार? आणि पुढचा मोठा ‘राडा’ नेमका कोण घालणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच बिग बॉस मराठीच्या आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत