Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ajay Devgan ‘शतक’साठी निवेदकाच्या भूमिकेत!

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख

Mahashivratri Vishesh: कलर्स मराठीवर रंगणार महाशिवरात्रीचा विशेष सोहळा; प्रकटणार बारा

Bigg Boss Marathi 6 च्या घरात अनुश्रीच्या अश्रूंचा बांध फुटला;

अहंकारातून भूमिका नाकारली आणि आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागले!

Vishal-Akshaya Wedding: मुंबई-पुणे नाही तर गंगा घाटाच्या कुशीत असलेल्या त्रियुगीनारायणमध्ये

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत

Aandhi चित्रपटाच्या रिलीजला ५१ वर्ष पूर्ण; राजकारण बदलले पण चित्रपटाचा

“मरण पत्करेन पण माफी मागणार नाही”; बिग बॉसच्या घरातून बाहेर

Big Boss Marathi Season 6 : टोळीत प्रेमाची खळी खुलणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत रुचिताचा राखीशी पंगा

 Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत रुचिताचा राखीशी पंगा
Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6 च्या घरात नवा रणसंग्राम; ‘टरमाळी’ म्हणत रुचिताचा राखीशी पंगा

by Team KalakrutiMedia 12/02/2026

Bigg Boss Marathi 6 मध्ये राखी सावंतच्या (Rakhi Sawant) धमाकेदार एन्ट्रीनंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. तिच्या आगमनापासूनच घरात नवा ड्रामा, टोलेबाजी आणि वादांची मालिकाच सुरू झाली आहे. आता अपकमिंग भागाच्या प्रोमोमुळे राखी आणि रुचिता (Ruchita) यांच्यातील संघर्ष विशेष चर्चेत आला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखी खास ‘मस्तानी’ लूकमध्ये दिसते. पारंपरिक अंदाजात सजलेली राखी मात्र स्वतःला ‘मस्तानी’ नव्हे तर ‘चुस्तानी’ म्हणत सगळ्यांनाच इशारा देते. “मी मस्तानी नाही, चुस्तानी आहे… सगळ्यांचं रक्त चुसणार,” असा डायलॉग टाकत ती घरातल्या सदस्यांना चांगलंच घाबरवण्याचा प्रयत्न करते. तिचा आत्मविश्वास आणि बिनधास्त शैली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरते.(Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6
Rakhi and Ruchita Fight

यानंतर राखी घरातील सदस्यांना आदेश देताना दिसते. कुणाला भांडी घासायला सांगते, तर कुणाला कपडे धुवायला. या सगळ्यात ती थेट रुचितालाच तिचे कपडे धुवायला सांगते आणि इथूनच वादाला सुरुवात होते. राखीचा हा हुकूमशाही अंदाज रुचिताला अजिबात पसंत पडत नाही. रुचिता देखील तितक्याच ठामपणे प्रत्युत्तर देते. ती राखीला सुनावत, “कपडे धुवेन, पण परत घालायला काही उरणार नाही,” अशा शब्दांत इशारा देते. तिच्या या प्रत्युत्तरामुळे घरातील वातावरण आणखी तापतं. दोघींमध्ये शब्दांची चकमक रंगते आणि इतर सदस्यही हा प्रसंग पाहत स्तब्ध होतात.

Bigg Boss Marathi 6 Rakhi Sawant

प्रोमोमध्ये पुढे रुचिता राखीचे कपडे घेऊन थेट स्विमिंग पूलजवळ जाताना दिसते. “हेच धुवायचे आहेत का?” असा सवाल करत ती परिस्थितीला आणखी रंगत आणते. या दृश्यामुळे आगामी भागात काय घडणार याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण राखीच्या एंटरटेनिंग आणि बेधडक स्वभावाचं कौतुक करत आहेत, तर काहींना रुचिताची ठाम भूमिका आणि आत्मविश्वास भावला आहे. दोघींच्या या वादामुळे घरातील समीकरणांमध्ये बदल होणार का, याबद्दलही चर्चा रंगली आहे.(Bigg Boss Marathi 6)

==============================

हे देखील वाचा: ‘कानात बोटं घालून गप बस!’ अनुश्रीचा राखी सावंतला सल्ला; आता घरात उडणार का वादाचा भडका?

==============================

एकूणच, राखी सावंतच्या एन्ट्रीनंतर बिग बॉस मराठी 6 अधिकच रंगतदार झाला आहे. आगामी भागांमध्ये राखी आणि रुचिता यांच्यातील हा संघर्ष आणखी तीव्र होणार का, की दोघी पुन्हा मैत्रीच्या वाटेवर येणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी निश्चितच रोचक ठरणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bigg Boss Marathi fights Bigg Boss Marathi Latest Episode Bigg Boss Marathi Promo Bigg Boss Marathi Updates Celebrity Entertainment marathi reality show rakhi ruchita fight rakhi sawant controversy Rakhi Sawant new entry Ruchita clash
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.