Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या

Mumtaz : बी ग्रेड सिनेमाच्या नायिकेचा सुपरस्टार पदापर्यंतचा थक्क करणारा

Tumbadchi Manjula Movie Poster: कोकणाच्या गूढ कथेचा अनोखा अनुभव घेऊन

‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा

Mamta Kulkarni चे २५ वर्षांनंतर दमदार कमबॅक; टीव्ही शोमध्ये येण्यामागचे

Bigg Boss Marathi 6 च्या घरात लागली राखीच्या केसांची बोली;

Bigg Boss Marathi 6 घरात होणार होणार शॉकिंग एलिमिनेशन; ‘या’

“सलग ५ दिवस सुरूच होतं आणि सहाव्या दिवशी मी रुग्णालयात

Lata Mangeshkar आणि साहिर लुधियानवी यांच्यात का मतभेद झाले होते?

Nana Patekar आता ओटीटी गाजवणार; ‘संकल्प’ वेब सीरीज लवकरच येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या स्पर्धकांची एंट्री होताच रेवा -रुचिता मध्ये वादाची ठिणगी…

 Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या स्पर्धकांची एंट्री होताच रेवा -रुचिता मध्ये वादाची ठिणगी…
Bigg Boss Marathi 6 Update
टीव्ही वाले मिक्स मसाला

Bigg Boss Marathi 6: ‘डोन्ट टच मी…Get Lost’ घरात नव्या स्पर्धकांची एंट्री होताच रेवा -रुचिता मध्ये वादाची ठिणगी…

by Team KalakrutiMedia 02/03/2026

Bigg Boss Marathi 6 चा  सिझन सध्या प्रेक्षकांमध्ये जबरदस्त चर्चेचा विषय बनला आहे. घरात रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येक स्पर्धकाच्या हालचालींवर चाहत्यांचे लक्ष टिकले आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यांनंतर घरातून रोशन भजनकर बाहेर पडला, पण त्यानंतर घरात आणखी एक थरारक बदल घडला आहे. या सिझनमध्ये तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे, ज्यांनी घरातील वातावरण पूर्णपणे उलथून टाकले आहे. या नव्या स्पर्धकांची नावं आहेत रेवा कौरासे (Reva Kaurase), संकेत पाठक (Sanket Pathak) आणि संस्कृती साळुंके (Sanskruti Salunkhe). त्यांच्या आगमनामुळे घरातील सदस्यांच्या रणनीतीत बदल झाला आहे आणि प्रत्येकाला या नव्या स्पर्धकांचा अंदाज घेणे आव्हानात्मक ठरत आहे. (Bigg Boss Marathi 6)

Bigg Boss Marathi 6 Reva-Ruchita Fight
Bigg Boss Marathi 6 Update

पहिल्याच दिवशीच घरात रेवाच्या आणि रूचिताच्या मध्ये तिखट वाद पाहायला मिळाले. रेवाने रूचिताला म्हटले, “रुचिताचा आवाज अजून ऐकायचा नाहीये असं झालंय…” त्यावर रुचिता तिने उत्तर दिले, “मी तुला विचारलंच नाहेय… आली मोठी शहाणी”. हे पाहून घरातील वातावरण अधिक तणावपूर्ण झाले, कारण रेवाने पुन्हा विचारले, “तुम्हाला काय वाटतंय हे सगळं करून तू छान दिसतेस?” रुचिता थेट म्हणाली, “मी छान दिसते, वाईट दिसते मला या सगळ्याचं काहीही देणंघेणं नाहीये. डोन्ट टच मी…Get Lost!” या संवादामुळे घरातील इतर सदस्य आणि प्रेक्षक दोघांनाही या संघर्षाची तग धरणी पडली.

Bigg Boss Marathi 6 Reva -Ruchita Fight
Bigg Boss Marathi 6 Update

या वाइल्ड कार्ड एन्ट्रीनंतर घरात थरार आणखी वाढला आहे. रूचिताचे बोलणे आणि तिचा आत्मविश्वास अनेकांना आवडला आहे, तर काहींना तिचा तिखट स्वभाव चिढवणारा वाटत आहे. प्रेक्षकांनी सोशल मीडियावरही प्रतिक्रिया दिल्या आहेत, जिथे अनेकांनी रुचिताच्या खेळाचं कौतुक करत कमेंट्समध्ये सांगितले की, ती नेहमी भाऊच्या धक्क्यावर सॉरी बोलून मोकळी होते, किती वाइल्ड कार्ड आले तरी ती सर्वांना पुरून उरेल, आणि रेवाला सपोर्ट म्हणून भिडणे अपेक्षित आहे. काही प्रेक्षकांनी तर म्हटले की, “रेवाला सपोर्ट तू भिड रुचिताला,” ज्यातून घरातल्या नाट्यमय परिस्थितीचे अंदाज घेतले जाऊ शकतात. (Bigg Boss Marathi 6)

=============================

हे देखील वाचा: ‘Lagnanantar Hoilach Prem’ मालिकेची दिमाखदार वरात लालबागच्या राजाच्या दरबारात; चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

=============================

या वाइल्ड कार्ड ट्विस्टमुळे घरातील रणनीती बदलण्यास सुरुवात झाली आहे. पूर्वीची गटबांधणी, दोस्ती आणि धोरणे आता नव्या स्पर्धकांच्या आगमनानंतर पुन्हा नव्याने आकार घेत आहेत. संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके यांचा खेळ देखील पाहणाऱ्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे, कारण त्यांची उपस्थिती घरातील संतुलन बदलून टाकू शकते. बिग बॉस मराठीच्या या सिझनमध्ये नवे वाद, नवे गेम, आणि स्पर्धकांमध्ये तणावाची वाढ ही आगामी आठवड्यांमध्ये प्रेक्षकांसाठी मोठा आकर्षण बनणार आहे. या सिझनमुळे बिग बॉसचे चाहते प्रत्येक दिवशी घरातील हालचालींची उत्सुकता बाळगून पाहत आहेत. वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरात निर्माण झालेला थरार, प्रेक्षकांचे अपेक्षित प्रतिसाद आणि स्पर्धकांची रणनीती ही सर्व गोष्टी सिझनला अविस्मरणीय बनवत आहेत. आता प्रेक्षकांसाठी हे पाहणे महत्वाचे ठरेल की, नव्या स्पर्धकांच्या आगमनानंतर घरात कोणत्या नवनवीन वाद, खेळ आणि उत्कंठावर्धक क्षण घडतात.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bigg Boss 2026 bigg boss marathi 6 Bigg Boss Marathi Drama Bigg Boss Marathi Latest Episode Bigg Boss Marathi twists Bigg Boss Marathi wild card entry Celebrity Entertainment marathi reality show Reva vs Ruchita clash Reva wild card entry Ruchita fiery clash
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.