
Bigg Boss OTT 4 : सलमान खानच्या ‘शो’चा लवकरच होणार प्रीमियर !
Big Boss या लोकप्रिय रिअॅलिटी शोबद्दल कायम चर्चा रंगत असतात. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की ‘बिग बॉस ओटीटी सीजन 4’ रद्द होणार आहे. मात्र, आता या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. ‘बिग बॉस तक’ या अधिकृत पेजने सोशल मीडियावर ‘बिग बॉस ओटीटी 4’ ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यात जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार असल्याचं जाहिर केलं आहे. आणि सलमान खान हाच पुन्हा एकदा होस्टिंग करताना दिसणार आहेत.(Bigg Boss OTT 4)

गेल्या काही ओटीटी सीजनमध्ये करण जोहर, सलमान खान आणि अनिल कपूर यांनी सुत्रसंचलन केलं होतं. ओटीटी 1 मध्ये करण जोहर ओटीटी 2 मध्ये सलमान खान आणि ओटीटी 3 मध्ये अनिल कपूर हे सूत्रसंचालक होते. आता पुन्हा सलमान खान ओटीटी 4 साठी परतणार आहे. अपेक्षा आहे की सलमान जून अखेरीस शोचे प्रोमो शूटिंग सुरू करेल.

यंदाच्या सीजनमध्ये केवळ सेलेब्रिटी सहभागी असतील. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यावेळी शोचा भाग असणार नाहीत. टीव्हीवरचा ‘बिग बॉस 19’ पुढे ढकलण्यात आला असून त्याचा प्रीमियर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 दरम्यान होण्याची शक्यता आहे. बिग बॉस 18 – करणवीर मेहराने ट्रॉफी जिंकली होती, तर विवियन डीसेना आणि रजत दलाल अनुक्रमे फर्स्ट आणि सेकंड रनर-अप होते. बिग बॉस ओटीटी 3 सना मकबूल विजेती ठरली होती. बिग बॉस ओटीटी 2 – एल्विश यादव याने विजेतेपद पटकावले होते. बिग बॉस ओटीटी 1 – दिव्या अग्रवाल विजेती झाली होती.(Bigg Boss OTT 4)
==============================
==============================
जरी शोच्या स्ट्रीमिंग तारखेची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसेल, तरीही ‘बिग बॉस तक‘ च्या एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हा शो प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे सलमान खानच्या फॅन्सना आणि बिग बॉस प्रेमींना हे पर्व पाहण्याची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.