Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Big Boss 19: ‘आता बघूच कोण जातंय…’ Pranit More साठी अंकिता वालावलकरने बसीर

Nana Patekar एक्स गर्लफ्रेंड मनिषा कोईरालाबद्दल काय म्हणाले?

Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

अनुराधा : Hrishikesh Mukherjee यांची भावरम्य कविता!

Amitabh Bachchan यांचं खरं नाव ‘हे’ असतं; भाऊ अजिताभने केला

Crew 2 चित्रपटाची तयारी सुरु; पुन्हा ३ अभिनेत्रींचं त्रिकुट धम्माल

स्त्री आणि भेड़ियाच्या जगात नवीन सुपरहिरो Thama ची एन्ट्री!

Bappi Lahiri ने संगीत दिलेल्या गाण्याला किशोर कुमारने कसे इम्प्रोवाइज केले?

‘मनाचे श्लोक’मधून Leena Bhagwat – मंगेश कदम मोठ्या पडद्यावर प्रथमच

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bobby Deol करियरच्या २८ वर्षांनी, वयाच्या ५३ व्या वर्षी चमकले बॉबी देओलचे नशीब मिळाले अफाट यश

 Bobby Deol करियरच्या २८ वर्षांनी, वयाच्या ५३ व्या वर्षी चमकले बॉबी देओलचे नशीब मिळाले अफाट यश
कलाकृती विशेष

Bobby Deol करियरच्या २८ वर्षांनी, वयाच्या ५३ व्या वर्षी चमकले बॉबी देओलचे नशीब मिळाले अफाट यश

by Jyotsna Kulkarni 27/01/2025

अनेकदा बॉलिवूडमध्ये होणारे नेपोटिसम आणि स्टार किड्स यांना मिळणारे प्राधान्य यावर वाद होताना दिसतात. यावर अनेक मतेमतांतर देखील आहेत. मात्र काही कलाकार स्टार किड्स असूनही बॉलिवूडमध्ये मिळणाऱ्या खास अटेंशनसाठी अपवाद ठरले. स्टार किड्स असूनही काही कलाकारांना या क्षेत्रात टिकण्यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर त्यांना अपेक्षित मोठे यश मिळाले. (Bollywood)

याचे अगदी उत्तम आणि समर्पक उदाहरण म्हणजे अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol). अभिनेता बोली देओलने २८ वर्षाच्या कारकिर्दीत केवळ बोटावर मोजण्याइतकेच हिट सिनेमे दिले आणि तो फ्लॉप अभिनेता ठरला. हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते हीमॅन धर्मेंद्र यांचा मुलगा असूनही बॉबी हळूहळू सिनेविश्वातून गायब झाला. मात्र २०२३ साली वयाच्या ५३ व्या वर्षी त्याला जे यश मिळाले त्याची त्याने कधीच कल्पना देखील केली नव्हती. आज बॉबी देओल त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे. वडील सुपरस्टार, भाऊ सुपरस्टार असूनही बॉबीला बॉलिवूडमध्ये यश मिळवण्यासाठी तब्बल २८ वर्ष वाट पाहावी लागली. आज बॉबीच्या वाढदिवसाच्या त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती. (Bobby Deol)

Bobby Deol

बॉबी देओलने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी बालकलाकार म्हणून त्याच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात केली होती. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या धर्मेंद्र यांच्या धरम-वीर (Dharam-Veer) या चित्रपटात तो बालकलाकार म्हणून झळकला. त्यानंतर पुढे काही वर्षांनी १९९५ मध्ये, बॉबी देओलने बरसात (Barsaat) या चित्रपटाद्वारे मुख्य नायक म्हणून हिंदी सिनेविश्वात पदार्पण केले ज्यामध्ये ट्विंकल खन्ना त्याची अभिनेत्री होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि सिनेमाची गाणी देखील तुफान गाजली. सिनेमाचे बजेट १० कोटी रुपये होते तर त्याची कमाई १९.५६ कोटी रुपये होती. बॉबीला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देखील बरसात सिनेमाने मिळवून दिला. (Bobby Deol Birthday)

‘बरसात’ चित्रपटानंतर बॉबीचे ‘गुप्त’, ‘सोल्जर’ आणि ‘बादल’ हे तिन्ही सिनेमे हिट ठरले. मात्र तरीही बॉलिवूडमध्ये त्याला अपेक्षित यश मिळत नव्हते. तो सिनेमे तर करत होता, मात्र त्याला सूर गवसत नव्हता. मध्ये मध्ये बॉबी मल्टीस्टारर सिनेमांमध्ये झळकत होता. पण तरीही तो खुश नव्हता. हळूहळू तो बॉलिवूडमधून गायब झाला. अशातच त्याला नैराश्याने ग्रासले आणि तो दारूच्या ड्रग्सच्या आहारी गेला. (Entertainment Mix Masala)

काम नसल्याने बॉबीने दिल्लीमध्ये हायप्रोफाइल नाईटक्लब आणि पबमध्ये डीजे म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र तिथेही त्याचे मन रमेना. तो पुन्हा मुंबईला आला. अशातच त्याची आणि सलमान खानची भेट झाली. सलमानने त्याला नैराश्यातून बाहेर काढण्यास मोठी मदत केली. सलमानने बॉबीला फिटनेस ट्रेनिंगमध्ये खूप मदत केली आणि त्याला कायम प्रोत्साहन दिले. अशातच सलमानने त्याला रेस ३ सिनेमाची ऑफर दिली. २०१८ मध्ये ‘रेस 3’ फ्लॉप ठरला, पण त्याचा मोठा फायदा बॉबीला झाला. बॉलिवूडचे त्याच्यासाठी बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडले. (Bobby Deol Journey)

Bobby Deol

रेस सिनेमानंतर बॉबी काही चित्रपटांमध्ये दिसला, मात्र तरीही त्याला यश मिळत नव्हते. याच वेळेस त्याच्याकडे एक मोठी संधी आली. २०२० साली तो प्रकाश झा यांच्या ‘आश्रम‘(Ashram) या सिरीजमध्ये झळकला. या सिरीजमध्ये त्याने निराला बाबाची नकारात्मक भूमिका साकारली. ही भूमिका आणि सिरीज खूपच गाजली. या सिरीजचे तीन सिझन देखील आले. तिन्ही तुफान हिट झाले. या सिरीजने त्याला कमालीची प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर २०२३ साली आला ‘ॲनिमल‘ (Animal) सिनेमा आला आणि बॉबीचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. (Ankahi Baatein)

बॉबी देओलच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाद्वारे त्याला त्याच्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाला. या चित्रपटात बॉबीने केवळ १५ मिनिटांची छोटीशी नकारात्मक भूमिका साकारली होती. असे असूनही त्याला जी लोकप्रियता मिळाली ती आजवर त्याने कधीच पाहिली नव्हती. ॲनिमलचे यश पाहून आणि त्याच्या भूमिकेला मिळालेले प्रेम पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू देखील आले होते. (Bollywood Masala)

आज बॉबीकडे बॉलिवूड, साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि ओटीटीचे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. यात तो ‘कांगुवा’ बॉबी या सिनेमातून तमिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात साऊथ स्टार सूर्या मुख्य भूमिकेत आहे तर बॉबी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच NBK109 या एका तेलगु सिनेमात देखील झळकणार आहे. यासोबतच बॉबी आश्रमच्या चौथ्या सीझनमध्ये देखील दिसणार असून शाहरुखचा मुलगा आर्यनचे दिग्दर्शन असलेल्या ‘स्टारडम‘ नावाच्या वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. (Bobby Deols Upcoming Projects)

Bobby Deol

आज बॉबी देओल इंडस्ट्रीमधील मोठे नाव झाले असून, कमाईच्या बाबतीत देखील तो खूपच पुढे गेला आहे. एका रिपोर्टनुसार बॉबीच्या एकूण संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर ६६ कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. एका चित्रपटासाठी तो ४ ते ६ कोटींची फी घेतो. तर एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी त्याला १ कोटी रुपये मिळतात. (Bobby Deols Property)

यासोबतच बॉबीला लक्झरी कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे रेंज रोव्हर स्पोर्ट, लँड रोव्हर फ्रीलँडर 2, रेंज रोव्हर वोग, पोर्शे केयेन, मर्सिडीज बेंझ सारख्या कार आहेत. बॉबीचे मुंबईत दोन चायनीज रेस्टॉरंट आहेत. एकाचे नाव समप्लेस एल्स आहे, जे २००६ पासून सुरू आहे. याशिवाय दुसऱ्या रेस्टॉरंटचे नाव ‘सुहाना’ आहे. याशिवाय पंजाबमध्येही त्याचे फार्महाऊस आहे.

Bobby Deol

बॉबीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्याने व्यावसायिक तान्यासोबत १९९६ साली लग्न केले. तान्या आणि बॉबीच्या प्रेमकथेबद्दल सांगायचे तर, बॉबीने तिला पहिल्यांदा एका पार्टीत पाहिले आणि तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडला. यानंतर बॉबीने मित्रांच्या मदतीने तान्याचा फोन नंबर शोधला आणि त्यांच्या भेटी वाढल्या. मग काही काळाने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज या दोघांना धरम आणि आर्यमन असे दोन मुलं आहेत.

=======

हे देखील वाचा : Shreyas Talpade मराठीसोबत हिंदी चित्रपट गाजवणारे मराठमोळे नाव श्रेयस तळपदे

=======

दरम्यान तान्याचा स्वतःचा ‘द गुड अर्थ’ नावाचा स्वतःचा फर्निचर आणि होम डेकोरेशनचा व्यवसाय आहे. अनेक बॉलीवूड स्टार आणि बिझनेसमन त्यांचे क्लायंट आहेत. यासोबतच तान्याने २००५ मध्ये आलेल्या ‘जुर्म’ आणि २००७ मध्ये आलेल्या ‘नन्हे जैसलमेर’ चित्रपटासाठी कॉस्च्युम डिझायनिंगही केले आहे. शिवाय तान्याने ट्विंकल खन्नाच्या ‘व्हाइट विंडो’ स्टोअरमध्ये तान्याने डिझाइन केलेले फर्निचर आणि इंटिरिअर डेकोर ॲक्सेसरीज आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor bobby Deol Bobby Deol birthday Bobby Deol information Bobby Deol journey Bobby Deol life Bobby Deol lifestyle Bobby Deol movie Bobby Deol personal life Bobby Deol professional life Bobby Deol sucess Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Featured happy birthday Bobby Deol hindi OTT actor बॉबी देओल बॉबी देओल प्रवास बॉबी देओल प्रेमकहाणी बॉबी देओल माहिती बॉबी देओल वाढदिवस बॉबी देओल वैयक्तिक आयुष्य
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.